नमस्कार मित्रानो
मित्रानो हिंदू दिनदर्शिकेनुसार भाद्रपद पौर्णिमेपासून पितृ पक्षाची सुरवात होते. यावर्षी २० सप्टेंबर पासून ६ ऑक्टोबर पर्यंत पितृपक्ष असणार आहे. मित्रानो या पितृ पक्षात आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्ती आहेत ज्यांना आपण पितर म्हणतो अशा पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण केले जाते. जेणेकरून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील आणि आपल्या जीवनातील सर्व समस्यांचा आणि संकटांचा नाश होईल.
या पितृ पक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना तर्पण केले जाते. त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना खाऊ घातले जातात सोबतच अनेक उपाय देखील केले जातात. परंतु मित्रानो अशी काही कामे आहेत जी आपण या पितृ पक्षात चुकून सुद्धा करू नयेत. ज्यामुळे पितर आपल्यावर नाराज होतात आणि आपल्या कुंडलीत देखील पितृदोष होतो.त्यामुळे या चुका पितृ पक्षात चुकून सुद्धा करू नयेत.
मित्रानो या काळात जर आपल्या दारावर एखादी गरजू व्यक्ती आली तर त्या व्यक्तीचा अपमान करू नका. कारण मित्रानो पितर आपल्या घरात कोणत्याही रूपात येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक जीवाचा आदर करा. तसेच या दरम्यान कोणत्याही पशु पक्षांना त्रास देऊ नये त्यांना जखमी करू नये. विशेष करून गाईचा अपमान करू नका.
मित्रानो गाईला आपल्या हिंदू धर्मात मातेचं स्थान दिलेले आहे. त्यामुळे या गाईचा अपमान चुकून सुद्धा होणार नाही याची काळजी घ्या. शक्य असेल तर या पितृ पक्षात पशु पक्षांना अन्न पाणी द्या. त्याचबरोबर या महिन्यात मद्यपान आणि मांसाहार टाळावा. सोबतच ब्रम्हचर्याचं देखील पालन करावं. मित्रानो या पितृ पक्षात झाडांची छाटणी देखील करू नका.
आपल्या घरा मध्ये आपण छोटी छोटी झाडे लावली असतील , फुल झाडे असतील किंवा अन्य प्रकारची झाडे असतील तर या दिवसांत त्याची छाटणी किंवा कापणी करू नका. कारण यामुळे पितर नाराज होऊ शकतात. तसेच मित्रानो या पितृ पक्षात नवीन वस्त्र धारण करू नका , नवीन वस्त्र , नवीन जमीन खरेदी करू नका.
या पितृ पक्षात कोणत्याही शुभ कामाची सुरवात किंवा शुभ कार्ये करणे निषिद्ध मानले गेले आहे. म्हणून या पितृ पक्षात कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी , जमीन खरेदी , वस्तू खरेदी अशा प्रकारची शुभ कामे करू नका.
मित्रानो अनेक लोक आपल्या पितरांचे श्राद्ध दुसऱ्यांच्या घरी घालतात. आपल्या घरी काही अडचण असेल , काही समस्या आल्या तर आपल्या पितरांचे श्राद्ध चुकून सुद्धा दुसऱ्यांच्या घरी करू नका. मित्रानो स्वतःच्या घरात अडचण असेल तर प्रयाग , बद्रीनाथ किंवा इतर स्थळी तुम्ही श्राद्ध करू शकता.
या दिवसांत खोटे बोलणे , अनैतिक कार्य करणे , कोणा बद्दल वाईट विचार मनात ठेवणं हे सुद्धा चुकीचं आहे. मित्रानो तुम्हाला जर पितरांना खुश करायच असेल त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावे असे वाटत असेल तर या गोष्टी आपण कटाक्षाने टाळणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतील आणि तुमच्या घरात सुख शांती टिकून राहील.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.