घरी घेऊन या हे फोटो… एका रात्रीत बदलेल भाग्य…

0
567

नमस्कार मित्रांनो,

आपल्या घरात लावलेले आकर्षक फोटो घराची सुंदरता वाढवतात. पण खूप कमी लोकांना माहीत असेल की, घरात आपण लावल्या जाणार्‍या फोटोंचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव घरात राहणार्‍यांना लोकांवर पडतो. वास्तूशास्त्राप्रमाणे आपल्या घरातील आपण  लावलेल्या फोटोचे खुप महत्त्व सांगीतले जाते.

व्यक्तीच्या आसपासच्या गोष्टींचा त्याच्या जीवनावर सकारात्मक व नकारात्मक प्रभाव पडत असतो, त्यामुळे बरेच लोक वास्तू शास्त्राद्वारेच घराची रचना करतात. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फोटो लावतात.

घरामध्ये वावरत असताना आपण त्या फोटोकडे पाहत असतो त्यामुळे त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर होत असतो. आपण लावलेल्या फोटोवर ठरते की त्याचा सकारात्मक की नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होणार आहे.

मित्रांनो घरात सर्वात आधी भगवान श्रीकृष्ण यांचा गाईसोबत बासरी वाजवताना असणारा फोटो असणे अत्यंत शुभ मानले जाते. हा फोटो पूजा घरामध्ये लावायचा आहे त्यामुळे सौभाग्यवती आणि धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो.

त्यानंतर राम दरबाराचा फोटो देखील शुभ मानला गेलेला आहे. हा फोटो आपल्या हॉलमध्ये लावला पाहिजे, त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये प्रेमभाव दृढ होतो. तसेच घरामध्ये समुद्र किनार्यावर धावणाऱ्या सात घोड्यांचा फोटो लावावा. कारण यामुळे आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी  होते तसेच नोकरीच्या कामात यश संपादन होते. हा फोटो ऑफिसमध्ये पूर्व दिशेला लावावा.

तसेच घरात जर गर्भवती महिला असतील तर यशोदा व कृष्णाचा फोटो लावला पाहिजे. अतिथी कक्षेत पाण्यात असलेला राजहंसचा फोटो लावल्यामुळे धन प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो, त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा वाढते.

मित्रांनो घरात कधीच महाभारताच्या यु द्धा चा फोटो लावू नये. त्याचा नकारात्मक प्रभाव घरावर व आपल्यावर पडत असतो, ते अशुभ मानले गेलेले आहे.

वाहणाऱ्या झऱ्याचा फोटो देखील अशुभ मानला जातो. कुठल्याही जलस्त्रोतांचा वाहणारा जलस्रोत त्याचा फोटो लावायचा नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात धनहानी होते.

आपल्या घरात दुर्गा मातेची रौद्र रूपात किंवा शंकराची नटराज रूपातील मूर्ती कधीच  लावू नये. भगवान धन्वंतरी यांचा हातामध्ये अमृतकलश घेतलेला फोटो घरामध्ये लावला पाहिजे, ते शुभ मानले जाते तसेच धनाविषयी अडचणी दूर होतात.

त्याचबरोबर माता लक्ष्मी चा उभ्या स्थितीतील फोटो लावण्याऐवजी कमळावर विराजित झालेला फोटो लावणे अधिक शुभ मानले जाते. तसेच आपण स्वयंपाक घरामध्ये माता अन्नपूर्णा यांचा फोटो लावल्यामुळे घरामध्ये धनधान्याची समृद्धी होते.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here