या दोन राशींचे एकमेकांशी लग्न म्हणजे दुधात साखर. जाणून घ्या तुमच्या राशी बद्दल.

0
642

नमस्कार मंडळी

मित्रानो एखाद्या व्यक्तीला जाणून घेण्यास बऱ्याच गोष्टी असतात जसं कि त्या व्यक्तीच आवडतं भोजन, आवडता रंग, गाणं बरंच काही आणि आपल्या आवडीच्या जोडीदाराची निवड करणे हे तर फारच अवघड काम आहे. पण ज्योतिषशास्त्रामध्ये राशींच्या अशा काही जोड्या सांगण्यात आल्या आहेत ज्यांची लग्न झाली आणि इतर कुठलीही अडचण नसेल तर अशी लग्न दीर्घकाळ टिकू शकतात किंवा ते एकमेकांचे उत्तम जीवनसाथी होऊ शकतात.

मित्रानो त्यातलीच पहिली जोडी म्हणजे तुळ आणि सिंह राशीची. तुळ आणि सिंह राशीच्या लोकांचा स्वभाव बराचसा सारखा असतो. हे दोघही सामाजिक असतात आणि लोकांना भेटणं, हसणं, बोलणं या दोघांचाही छंद असतो. त्यांना स्वतःला व्यक्त करायला आवडत. त्यामुळे या राशींचे लग्न झाले तर असे लग्न दीर्घकाळ टिकू शकते.

दुसरी जोडी आहे मेष आणि कुंभ राशीची. मंडळी या दोन्ही राशींचे लोकं एकमेकांचे जीवनसाथी झाले तर ते उत्तम निर्णय घेऊ शकतात. हे दोघही प्रेम आणि रोमांचाने भरलेले असतात आणि अशा गोष्टी पसंत करतात. तसेच हे दोघही सृजनात्मक असतात. स्वछंदता पसंद करतात. दोघेही आपल्या जोडीदाराला योग्य स्पेस देणे पसंत करतात.

मित्रानो यानंतरची जोडी म्हणजे मेष आणि कर्क राशीची. मेष राशीचे लोकं नेहमी बहादूर आणि निडर असतात आणि कर्क राशीचे लोक उर्जावान असतात. हे जोडीदाराला देखील उर्जावान ठेवतात.त्यामुळे या दोघांची जोडी उत्तम जोडी मानली जाते.

मित्रानो यानंतरची जोडी आहे राशी चक्रातील पहिली रास आणि राशी चक्रातील एक शेवटची रास. अर्थातच मेष आणि मीन राशीची जोडी. या राशींच्या लोकांचे देखील आपापसात प्रेमळ संबंध बनतात. एकमेकांसोबत दोघेही कर्तव्यनिष्ठ आणि एकनिष्ठ असतात. मेष रास अग्नीतत्वाची रास असल्यामुळे अर्थातच स्वभावाने थोडी तापट असते.

परंतु त्यांचे लग्न जलतत्वाच्या मीन राशीच्या शांत स्वभावाच्या व्यक्तीशी झाल्यास असं लग्न दीर्घकाळ टिकू शकत.आपल्याकडे म्हणतातच ना संसारात एकाने आग झालं तर दुसऱ्याला पाणी व्हावंच लागत. हाच प्रकार मेष आणि मीन यांच्यात आपोआप घडून येतो.

मित्रानो पुढची जोडी आहे वृषभ आणि कर्क राशीची. हे दोघेही एकमेकांना समान आदर देतात. एकमेकांची प्रशंसा देखील करतात. वृषभ आणि कर्क यांच्यात उत्तम ताळमेळ असतो. कर्क राशीचे लोकं हे खऱ्या मनाचे असतात तर वृषभ राशीचे लोक हे दुसऱ्यांना मदत करण्यास नेहमी तत्पर असतात. दोघेही घरपरिवारचे महत्त्व जाणून असतात. आणि मग उत्तम जोडीदारासाठी अजून काय हवं ?

मित्रानो वृषभ राशीचे आणखी एका राशीबरोबर चांगले पटते आणि ते म्हणजे मकर रास. हे दोघेही एकमेकांसोबत प्रेम आणि समजूतदारीने वागतात. वृषभ रास असणारे नेहमी मकर राशीच्या लोकांचे काम आणि प्रसन्नचित्त व्यवहाराची प्रशंसा करतात. तर मकर राशीचे लोकं वृषभ राशीच्या उदारता आणि समजदारीला पसंत करतात.

मित्रानो पुढची जोडी आहे मेष आणि धनु. धनु राशीचे लोक नेहमी आपल्या मनाचच ऐकतात. कुठल्याही प्रकारचे नखरे आणि नाटक यापासून ते दूर राहतात. हास्य विनोद करणे यांना पसंद असते. तसेच मेष राशीचे लोक हि सामाजिक दृष्ट्या सक्रिय असतात आणि वास्तवात जगणं त्यांना जास्त आवडत.

यानंतरची जोडी आहे त्या दोन्ही राशी जलतत्वाच्या राशी आहे. त्या म्हणेज कर्क आणि मीन. या दोन्हीही जलतत्वाच्या राशी आहेत. जे त्यांच्या आत्मिक आणि अध्यात्मिक संबंधांना दर्शवते. या दोन्ही राशींचे लोक फार भावुक असतात आणि एकमेकांना दुःख होणार नाही याची नेहमी काळजी घेतात.

पुढची राशी म्हणजे सिंह आणि धनु रास. सिंह राशीच्या लोकांचे धनु राशीच्या लोकांशी चांगले पटते. सिंह राशीचे लोक थोडे स्वभावाने जिद्दी असतात. पण धनु राशीच्या लोकांना यांचा आत्मविश्वास फार आवडतो. त्यामुळेच हे दोघ प्रत्येक समस्येचं समाधान काढण्यात यशस्वी होतात.

मित्रानो पुढची जोडी म्हणजे कन्या आणि मकर रास. कन्या राशीचे लोक काळजी करणारे असतात. ज्याने त्यांचा स्वभाव अंतर्मुख होऊन जातो. पण कन्या राशीचे लोक जेव्हा बोलतात तेव्हा अगदी मनमोकळेपणे बोलतात. आणि त्यांचा हाच स्वभाव मकर राशीच्या लोकांना आकर्षित करतो.

पुढची जोडी म्हणजे सिंह आणि मिथुन राशीची. सिंह राशीचे लोक मानसिक दृष्ट्या सशक्त जोडीदाराची इच्छा ठेवतात. तसेच मिथुन राशीचे लोक दुसऱ्यांना प्रेमाची जाणीव करून देण्याला प्राथमिकता देतात. मित्रानो मिथुन राशीचे कुंभ राशी सोबत सुद्धा जुळत. कुंभ आणि मिथुन या दोन्ही वायुतत्वाच्या राशी आहेत.या राशीचे लोक जीवनातील प्रत्येक चढ उतारात एकमेकांची साथ देतात. मिथुन राशीवाले चांगल्या कल्पनांची प्रशंसा करतात आणि कुंभ राशीचे जातक कलात्मक असतात. हि बाब दोघांमध्ये ताळमेळ घालण्यात मदत करते.

मित्रानो मिथुन राशीचे आणखी एका राशीसोबत पटते आणि ते म्हणजे तुळ राशीसी. या दोन्ही रास एकमेकांवर पुर्ण अधिकार दाखवणाऱ्या असतात. हीच गोष्ट दोघांमध्ये प्रेम वाढवण्यास मदत करते. या दोघांमधील नातं नेहमीच नवीन वाटते. दोघेही प्रत्येक समस्येवर शांततेने तोडगा काढतात.

मित्रानो पुढची जोडी म्हणजे वृषभ आणि वृश्चिक. या दोन्ही राशीचे लोक बऱ्याच बाबतीत एकसारखे असतात. दोघेही जोशिले आणि आवेशपूर्ण असतात. आपापसातील संबंधांमध्ये दोघेही समान व्यवहार करु शकतात. वृश्चिक राशीच्या लोकांचे सर्वात उत्तम जोडीदार म्हणून वृषभ राशीचे लोकच असतात.

मित्रांनो यानंतरची शेवटची जोडी आहे वृश्चिक आणि कर्क. या दोन्ही राशी जलतत्वाच्या राशी आहेत. म्हणून या दोन्ही राशींचे लोक एकमेकांना सहयोगात्मक पद्धतीने वागतात. या दोन्ही राशींचे लोकं संवेदनशील असतात आणि एकमेकांना समजून घेण्याचा चांगला प्रयत्न करतात.

मित्रानो या होत्या ज्योतिषशास्त्रानुसार राशींच्या काही जोड्या, ज्यांची लग्न झाली तर दीर्घकाळ टिकू शकतात. मित्रानो लग्न यशस्वी होण्यासाठी कुठलीही एक गोष्ट कारणीभूत असू शकत नाही तर त्यासाठी दोघांमध्ये सामंजस्य, आपुलकी आणि प्रेम असणे देखील गरजेचे आहे. त्याचबरोबर एकमेकांच्या कुटुंबामध्ये सुद्धा एकमेकांबद्दल आदर असायला हवा आणि हे सगळं जुळून आलं तर मग अर्थातच सगळेच तुम्हाला म्हणतात तुम्ही एकमेकांसाठीच बनले आहात.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here