अशा मुलीशी लग्न कराल तर जीवनात सर्व सुख मिळतील… – चाणक्य नीति…

0
414

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो लग्न करताना योग्य जोडीदार निवडावा लागतो. जर निवड चुकली तर आयुष्यभर त्याचे आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागतात. मित्रानो तुम्ही जर लग्न करण्याचा विचार करत असाल तर मुलगी पाहताना तिच्यामध्ये हे चार गुण नक्की पाहा.

1) जी मुलगी तुमच्यावर प्रेम करते

मित्रांनो जी मुलगी तुमच्यावर प्रेम करते अशा मुलीशी नक्की लग्न करा. मित्रांनो तुम्ही जिच्यावर प्रेम करता अशी मुलगी तुम्हाला मिळेल किंवा मिळणार हि नाही मात्र जी मुलगी तुमच्यावर प्रेम करते तिच्यावर अगदी निसंकोच विश्वास ठेवा आणि त्या मुलीशी लग्न करा.

अशा मुलीबरोबर भविष्यात तुमचे जरी संबंध बिघडले, तुमच्यात भांडणे झाली तरी सुद्धा ती मुलगी तुमच्यावर खरं प्रेम करत असल्यामुळे ती तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही. आणि तुमचा संसार सुखाचा चालेल.

2) दुसर्याशी लग्न करू इच्छित

मित्रांनो अशा कोणत्याही मुलीशी लग्न करू नका कि ज्या मुलीचं तुमच्यावर प्रेम नसून दुसर्या कोणावर तरी प्रेम आहे. बऱ्याच वेळा असं होत कि आपण अरेंज मॅरेज करतो आणि ज्या मुलीबरोबर आपण विवाह करतो ती मुलगी दुसऱ्याच कोणावर प्रेम करत असते.

आणि म्हणून लग्नापूर्वी जर तुम्ही अरेंज मॅरेज करत आहात तर समोरच्या मुलीची संमती घ्या. तिला खरोखर दुसऱ्या कोणावर प्रेम नाही ना याची खातरजमा करा. अशा मुलीशी जर तुम्ही लग्न केलं तर भविष्यात ती मुलगी तुम्हाला कधीच सुख देऊ शकत नाही.

3) सौंदर्य आणि स्वभाव

जी मुलगी तुमचं सौंदर्य न पाहता तुमच्या स्वभावाकडे पाहून तुमच्याशी लग्न करायला तयार झालेली आहे. लक्षात घ्या तुम्ही कितीही हँडसम असाल, सुंदर असाल मात्र काळानुसार तुमच्यातील हे सौंदर्य कमी होत असत.

आणि म्हणून तुमच्या सौंदर्यावर भाळून एखादी मुलगी तुमच्याशी लग्न करायला तयार झाली असेल तर लक्षात घ्या काळानुसार तीच प्रेम कमी होऊ लागेल. मात्र ज्या मुलीला तुमचा स्वभाव आवडलाय ती मुलगी अगदी शेवट पर्यंत तुमच्यावर तितकंच प्रेम करत राहील.

4) तुमच्यात वडील पाहते

जी मुलगी तुमच्यामध्ये स्वतःच्या वडिलांना पाहते. मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही मुलगी आपल्या पतीमध्ये आपल्या पित्याला पाहत असते. आणि म्हणून अशा मुलीशीच विवाह करा जी तिच्या वडिलांची तुलना तुमच्या बरोबर करत असते.

जी स्वतःच्या वडिलांचे गुण तुमच्यामध्ये पाहते. या वाक्याचा अर्थ असा आहे कि आपण अगदी तिच्या वडिलांसारखीच तिची काळजी घ्यायला हवी. जशी वडिलांनी तिला जपली तसेच आपण देखील तिला फुलाप्रमाणे जपावं.

तर मित्रांनो असे चार गुण असणारी मुलगी तुम्हाला मिळाली तर तुमचं जीवन खरोखरच समाधानी आणि सुखी असेल.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here