नमस्कार मित्रानो
मित्रानो पत्नीच्या हातात पतीचे नशीब असते. एक पत्नी आपल्या पतीचे नशीब पालटून त्याला पुढे घेऊन जाऊ शकते किंवा त्याला रस्त्यावर देखील आणू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि पत्नीने कोणत्या पाच चुका केल्या नाही पाहिजेत.
मित्रानो घरातील स्त्रीला गृहलक्ष्मी म्हटले जाते. स्त्रीने निश्चय केला तर घराला स्वर्ग बनवू शकते किंवा नरक देखील बनवू शकते. म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. हि गोष्ट १०० टक्के खरी आहे.
ज्या घरात स्त्री नसते ते घर घर राहत नाही. प्रत्येक घराची सुख व समृद्धी स्त्रीच्याच हातात असते. ज्योतिषशास्त्रानुसार कळत नकळतपणे घरच्या स्त्रीच्या हातून अशा काही चुका होतात , अशी काही जी कधी करू नयेत ती घडतात ज्यामुळे तिचा पती गरीब होतो.
स्त्रीने नेहमी लक्षात ठेवावे कि झाडूला कधी पाय लावू नये किंवा पायाने ढकलू नये. झाडूला आपण देवी लक्ष्मीचे प्रतीक मानतो. म्हणूनच तिची पूजा आपण लक्ष्मी पूजनाला करतो. अशी चूक आपल्या हातून होणार नाही याची काळजी घ्यावी. चुकून पाय लागला तर लगेच झाडूच्या पाया पडावे.
काही स्त्रियांना उष्टे खरकटे भांडे बेसिन मध्ये किंवा गॅस वर ठेवून तसेच पडू द्यायची सवय असते. यामुळे देखील घरात दरिद्रता येते. म्हणून कधीही उष्टे खरकटे भांडे बेसिन मध्ये तसेच पडू देऊ नयेत. जर भांडी घासण्यासाठी बाई येणार असेल तर उष्टे खरकटे काढून टाकावे व भांडी थोडी पाण्याने हिसळून ठेवावी.
सौभाग्यवती स्त्रीचा सर्वात मोठा शृंगार म्हणजे कुंकू. म्हणून स्त्रीने कधीही कुंकू लावताना ते खाली पडू देऊ नये. तसेच आपले कुंकू कोणाशी शेयर करू नये. सोबतच बांगड्या , टिकली , जोडवे अशा सौभाग्याचा वस्तू कधीही कोणाला देऊ नये. असे करणे खूप अशुभ समजले जाते.
असे करणे म्हणजे आपण स्वतःहून आपल्या पतीला दुसऱ्या स्त्रीच्या ताब्यात देण्यासारखे होते. म्हणून अशी चूक कधीही करू नये.
काही स्त्रियांना सकाळी खूप उशिरा पर्यंत झोपण्याची सवय असते. परंतु यामुळे घरात दरिद्रता येते. सकाळची कामे सकाळी व्हायलाच हवी. प्रत्येक काम वेळेत झाले तर त्या कामाला महत्व प्राप्त होते.
आपण जर उशिरा उठलो तर पुढे सर्वच कामांना उशीर होतो. मित्रानो लक्ष्मी घरात यायची वेळ सकाळची आणि संध्याकाळची असते. म्हणून लक्ष्मी घरात येण्यापूर्वी आपले घर स्वच्छ व नीट नेटके आवरून ठेवलेले असावे. नाही तर लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही यामुळे पतीला गरिबी येते.
स्त्रियांचे मन नेहमी शांत असावे. सतत चिडचिड करणे , रागावणे , ओरडणे यामुळे घरातील शांतात नष्ट होते आणि घरातील वातावरण बिघडते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा वाढते व देवी लक्ष्मी घरातून निघून जाते. म्हणून घरातील स्त्रीने नेहमी शांत असावे.
जर पत्नीने चूक केली तर त्याचे परिणाम पतीला देखील भोगावे लागतात. त्याच प्रमाणे पतीने चूक केली तर त्याचे परिणाम पत्नीला देखील भोगावे लागतात. म्हणूनच दोघांनी शांततेने , आनंदाने आपले जीवन जगावे. म्हणजे घरात देवी लक्ष्मीचा वास राहील व सकारात्मक ऊर्जा कायम घरात टिकून राहील.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.