बेडरूम मध्ये चुकूनही ठेवू नका ही 1 वस्तू… पती-पत्नीमध्ये सतत भांडणे होतील…

0
551

नमस्कार मित्रानो,

आपल्या घरातील प्रत्येक वस्तू आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असते. काही वस्तूंचा प्रभाव सकारात्मक असतो किंवा चांगला असतो, तर काही वस्तू मात्र आपल्या जीवनावर आपल्या भाग्यावर विपरीत परिणाम करत असतात.

जर वेळीच या वस्तू घराबाहेर काढल्या नाही तर कालांतराने ह्या वस्तूंच्या अनिष्ठ प्रभावाने आपल्या घरात वाद विवाद होणे, अशांती पसरणे, दुःखाचं साम्राज्य पसरणे, अशा नकारात्मक गोष्टी घडू लागतात.

मित्रानो पती पत्नी मधील प्रेम जर कमी होतअसेल , त्यांच्यात सातत्याने भांडणे होत असतील, अगदी किरकोळ गोष्टींचे रूपांतर हे मोठ्या वादात होत असेल तर अशावेळी आपल्या बेडरूमकडे आपण कटाक्षाने लक्ष दयावे. वास्तू शास्त्रात सांगितलेल्या काही नियमांचं आपण नक्की पालन करा.

अशा काही वस्तू जर आपल्या बेडरूम मध्ये असतील ज्या आपल्या दाम्पत्य जीवनावर विपरीत परिणाम घडवत आहेत तर अशा वस्तू तात्काळ हटवणं हे आपल्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरेल. अनेक लोक आपल्या बेडरूम मध्ये शोभेच्या वस्तू म्हणून काटेरी झूडपे ठेवतात.

हि झाडे दिसायला अत्यंत सुंदर आणि आकर्षक असतात. मात्र यांचा ठेव संबंध पती पत्नीच्या सुखी जीवनावर पडतो आणि म्हणून कोणत्याही स्वरूपात काटेरी झाडे आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या परिसरात किंवा आणि विशेष करून बेडरूम मध्ये चुकून सुद्धा ठेवू नये. याला गुलाब मात्र अपवाद आहे.

आपल्या बेडरूम मध्ये जर आपण चित्र विचित्र आकाराच्या वस्तू ठेवलेल्या असतील काही धारदार वस्तू ठेवलेल्या असतील, याचा आपण शो म्हणून उपयोग करत असतो पण यांचा सुद्धा थेट प्रभाव पती पत्नीच्या व्यक्तिगत आयुष्यावर नक्की पडतो. जर तुमच्या बेडरूम मध्ये एखादी भिंत ओली होत असेल, घरात ओल पकडत असेल तर त्याने सुद्धा नकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात पसरते. घरात रोगराई निर्माण होते.

मित्रानो आपल्या बेडरूमचा जो रंग आहे तो कोणत्याही स्वरूपात भडक नसावा. भडक रंग शक्यतो टाळावेत. आपल्या बेडरूमचा दरवाजा किंवा मुख्य दार, घरात लावलेले पंखे हे जर करकर असा आवाज करत असतील तर त्यांना त्वरित तेल घालून हा करकर करणारा आवाज आपण बंद करा.

घरामध्ये भांड्यांचे धक्के लागून आवाज होत असतील, भांडी वारंवार पडत असतील तर असे होणार नाही याची काळजी घ्या. या सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा पसरवतात.पती पत्नी मधील प्रेम भाव कमी करतात.

गृहिणींनी एक गोष्ठ लक्षात ठेवा त्यांच्या स्वयंपाक घरात किचनमध्ये जी गॅस शेगडी असते आणि जो पाण्याचा साठा माठ, हंडा, मडके इत्यादी. असेल त्यांच्या मध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवा. या दोन गोष्टी परस्पर विरुद्ध कार्य करत असतात. अग्नी आणि जल हि दोन तत्व जेव्हा जेव्हा एकत्र येतील तेव्हा तेव्हा घरात विसंवाद होणं, भांडणे होणं या गोष्टी नक्कीच घडून येतात.

आपल्या घरात आपल्या बेडरूम मध्ये योग्य प्रकारचा उजेड येत आहे ना? हवा खेळती आहे ना? याची सुद्धा आपण खबरदारी घेतली पाहिजे. विशेष म्हणजे जर हवा उत्तर पूर्वेकडून म्हणजेच ईशान्य दिशेकडून येणारी असेल तर ती अति उत्तम मानली जाते पती पत्नीमधील प्रेम भाव वृद्धिंगत करण्यासाठी. नवीन बांधकाम करताना या गोष्टींची विशेष काळजी घ्या.

आपल्या बेडरूम मध्ये कोणत्याही प्रकारे पाण्याचा मोठा साठा असता कामा नये. पाण्याचा ग्लास किंवा बाटली चालेल पण मोठा साठा म्हणजेच हांडा, माठ, पाण्याची टाकी असे काही ठेवू नका. वास्तूशास्त्रानुसार बेडरूम मध्ये फिश टॅंक ठेवणे सुद्धा हानिकारक मानले जाते.

हा फिश टॅंक पती पत्नी मधील वाद इतका विकोपास नेतो कि शेवटी घटस्पोटापर्यंत गोष्टी जाऊ शकतात. आपल्या बेडरूम मध्येच नाही तर आपल्या घरात कुठेही अडगळ ठेवू नका. घरातील जे काही स्क्रॅप आहे भंगार आहे त्यांची वेळच्या वेळी व्हिलेवाट लावा. आपले घर हे एक मंदिर आहे याची नेहमी काळजी घ्या.

आपल्या या वास्तू मध्ये सर्व देवी देवता वास करत असतात आणि हे गृहीत धरून आपण मोठं मोठ्याने बोलणं, वाद विवाद करण, भांडणे करणं या गोष्टी टाळाव्यात. कर्कश आवाज संगीत लावणं हि सुद्धा गोष्ट अमान्य आहे.

मित्रानो अनेक बेडरूम मध्ये कपाट किंवा आरसे असे लावलेले असतात कि त्या आरशातून बेड वर असलेल्या व्यक्तीच प्रतिबिंब थेट दिसत असत. मित्रानो असे जर असेल तर हि एकच गोष्ट पती पत्नी मध्ये दुरावा निर्माण करण्यात पुरेशी आहे. म्हणजे हि एक गोष्ट सुद्धा पती पत्नी मधील नाते संपुष्टात आणू शकते.

अशावेळी आपण त्या कपाटाची जागा बदलावी जर हे शक्य नसेल तर त्या कपाटाला एखादा पडदा लावून प्रतिबिंब पडण्यापासून अडथळा आणू शकता. जर आधी सांगितले कि भडक रंग आपल्या बेडरूम मध्ये नसावेत. अगदी त्याच प्रकारे सौम्य गुलाबी रंग आपल्या बेडरुमला असेल तर त्याचा खूप चांगला प्रभाव पती पत्नीच्या संबंधांवर पडतो.

आपला जो बेड असतो त्या बेडच्या वर बीम म्हणजेच तुळई नसावी. असे बीम असतील तर सातत्याने त्या बेडरूम मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत राहत. झोप व्यवस्थित लागत नाही. पती पत्नी मध्ये अनबन सुरु राहते. पती पत्नीचा एखादा हसरा फोटो बेडरूम मध्ये फ्रेम करून अवश्य लावावा. फक्त पती पत्नीचा त्यांत मुलांचा समावेश नसावा.

परंतु मित्रानो ही फ्रेम चुकूनही त्रिकोणी नसावी. किंबहुना त्रिकोणी आकाराची कोणतीच फ्रेम आपल्या घरात असता कामा नये. झोपताना पती आणि पत्नीने दक्षिणेकडे आपले डोके करा त्यानंतरच झोपा. झोप शांत लागेल आणि वादविवाद सुद्धा कमी होतील. ज्या बेडवर तुम्ही झोपता त्या बेडवरील गाद्या एकमेकांना जुळवलेल्या नसाव्यात.

म्हणजे एक अखंड गादी त्या बेडवर असावी. दोन गाद्या जुळवून बेड तयार केलेला नसावा. अशा गाद्या देखील पती पत्नी मध्ये दुरावा निर्माण करतात. अनेकजण प्रेम पक्षांचा फोटो जोडीचा फोटो घरात लावतात. मित्रानो हा फोटो बेडरूम मध्ये लावणे अतिउत्तम मानले जाते. असा फोटो जर बेडरूम मध्ये असेल तर पती पत्नी मध्ये आकर्षण कायम राहत.

वरील माहिती हि वास्तुशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. कुठल्याही निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी वास्तू तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक.

अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here