रोज रात्री दाबा पतीचे हे अंग… धन प्राप्तीचे मार्ग उघडतील… लवकरच व्हाल करोडपती…

0
365

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो स्त्रियांना हिंदू धर्म शास्त्रात माता लक्ष्मी चा दर्जा देण्यात आलेला आहे. ज्या प्रकारे स्त्रिया आपल्या पतीला पती परमेश्वर मानतात. आपल्या पतीची सेवा  करतात.

अगदी त्याच प्रकारे हिंदू धर्म शास्त्र हे मानते की पुरुषांनी सुद्धा आपल्या पत्नीला लक्ष्मी चा दर्जा देऊन तिचा योग्य तो आदर सत्कार करावा.

मित्रांनो ज्या घरात स्त्रियांचा अपमान होतो, स्त्रियांना प्रताडीत केलं जातं, त्यांना किंमत दिली जात नाही अशा घरात माता लक्ष्मी कधीच टिकत नाही.

ज्या घरात माता लक्ष्मीची कृपा बरसणार असते त्या घरात महिलांकडून काही विशेष संकेत मिळत असतात.

मित्रांनो महिलांनी पतीची सेवा करताना रोज रात्री हे एक छोटंसं काम अवश्य करायला हवं. तुमच्याकडे जितका वेळ असेल तितका वेळ तुम्ही हे अगदी छोटंसं काम अवश्य करा.

हिंदू धर्म शास्त्र असं मानतं की ज्या स्त्रीचे तळवे मुलायम असतात, बोटे सुंदर असतात, नखे गुलाबी असतात अशी स्त्री भाग्यवान असते.

अशा स्त्री च्या पतीला त्याच्या नशिबाची साथ मिळते. आणि त्या स्त्रीला सुद्धा आपल्या पती सोबत सर्व सुखांचा उपभोग घ्यायला मिळतो.

मित्रांनो ज्या स्त्रियांच्या तळव्यांना घाम येत नाही, तळवे मुलायम, कोमल असतात अशी स्त्री राणी समान असते. आणि ती आपल्या पतीसाठी अत्यंत भाग्यवान असते.

त्याच बरोबर ज्या स्त्री चे केस सुंदर, लांब, मुलायम, चमकदार असतात अशा स्त्री ला भाग्याची साथ मिळतेच मिळते.

मित्रांनो ज्या स्त्रीचे तळहात मऊ, मुलायम कमळाप्रमाणे असतात अशी स्त्री नशिबवान असते.

त्याच बरोबर ज्या स्त्री चे दात एक समान आणि सुंदर पांढरे शुभ्र असतात आणि बोलणं हे कोकिळे सारखे मधुर असते अशी स्त्री ज्या घरात जाते त्या घरासाठी अत्यंत नशिबवान ठरते.

मित्रांनो पती पत्नीने एकमेकांशी नेहमी मधुर संबंध ठेवावेत. कधीही आपल्या मुलाबाळांसमोर भांडणे करू नयेत. कारण आपण जसं वागतो तेच पाहून आपली मुलं शिकतात.

पती पत्नीने एकमेकांवर पूर्ण विश्वास टाकावा. आणि एकमेकांवर मनापासून प्रेम करावे. एकमेकांची सेवा करावी.

पतीने आपल्या पत्नीचा कधीच अपमान, अनादर करू नये. इतरांसमोर अपमान करू नये. स्त्री ही घराची लक्ष्मी आहे, आणि लक्ष्मी समान पत्नीचा पती कडून योग्य सन्मान राखला गेला तर अशा घरात माता लक्ष्मी सदैव वास करते.

याचप्रमाणे पत्नीने सुद्धा आपल्या पतीला पती परमेश्वर मानून त्याचा योग्य तो मान राखून त्याची सेवा करावी.

मित्रांनो आपल्याला माहीत असेल क्षीरसागरामध्ये शेष नागाच्या शय्येवर भगवान श्री विष्णू विराजमान असतात. आणि माता लक्ष्मी त्यांच्या पायाजवळ बसून त्यांचे पाय चेपत असतात, दाबत असतात.

ज्योतिष शास्त्र असं मानते की पुरुषाच्या तळपाया पासून त्यांच्या पिंढऱ्या पर्यंत च्या भागावर शनी देवाचा प्रभाव असतो.

त्याच प्रमाणे स्त्रियांच्या मनगटापासून ते त्यांच्या बोटांपर्यंत च्या भागावर शुक्राचा प्रभाव असतो.

आणि जेव्हा जेव्हा शनी देवांवर शुक्राचा प्रभाव पडतो तेव्हा तेव्हा धन प्राप्तीचे नव नवीन मार्ग निर्माण होतात. मोठ्या प्रमाणात धनाची निर्मीती होते.

त्यामुळे माता लक्ष्मी ज्या प्रमाणे आपल्या पतीचे म्हणजे भगवान विष्णूचे चरण दाबत असतात त्याचप्रकारे स्त्रियांनी आपल्या पतीला परमेश्वर मानून त्यांचे चरण दाबले पाहीजेत.

ही छोटीशी गोष्ट आपल्या घरी माता लक्ष्मीला सदैव वास करण्यास भाग पाडते.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here