नवरा बायकोचे पटत नसेल, सतत वाद विवाद होत असतील तर पत्नीने या वस्तू दान कराव्यात…

0
879

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो जर पती पत्नीमध्ये पटत नसेल, सारखेच वाद विवाद, भांडण होत असेल अशा घरामध्ये सुख समृद्धी कधीच येत नाही. त्या घरात कधीच लक्ष्मी वास करत नाही. ज्या घरात सतत भांडणे होतात अशा घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही.

अशा घरात लक्ष्मीची कृपा नसल्याने घरातील अडचणी वाढत जातात. एकामागोमाग एक संकटे येऊ लागतात. पैसा टिकून राहत नाही. सुखाची आणि आनंदाची भरभराट कधीच होत नाही.

अशा घरात कोणीच सुखी राहत नाही. म्हणून जर घरात वाद विवाद होत असतील तर ते लगेच मिटवून टाकावेत. पती पत्नी मध्ये भांडण होऊ नये, सुखाने संसार करावा असे वाटत असेल तर पत्नीने या काही वस्तू दान कराव्यात.

या वस्तू दान केल्याने सौभाग्याची प्राप्ती होते आणि संसार सुखाचा होतो. जर महिलांना त्यांचा संसार सुखी करायचा असेल तर सुखी आणि समृद्ध जीवन जगायचं असेल तर या वस्तू नक्की दान कराव्यात.

तर या वस्तू कोणत्या आहेत? तर मित्रांनो या वस्तू सौभाग्याच्या आहेत आणि या वस्तू तुम्हाला सौभाग्यवती म्हणजेच विवाहित महिलांनाच दान करायच्या आहेत. तुम्ही कोणत्याही शुभ दिवशी चतुर्थी, एकादशी, पौर्णिमा, गुरुवार, शुक्रवार, सोमवार कोणताही शुभ दिवस निवडायचा आहे.

अशा एखाद्या शुभ दिवशी तुम्ही या वस्तू सौभाग्यवती महिलांना दान करायच्या आहेत. तुमच्या घरातील महिला असेल तरी चालेल. पण तुम्ही विवाहित महिलेलाच सौभाग्याचा वस्तू दान करायच्या आहेत.

कुंकुवाची डबी, मेहंदीचे कोन, लाल टिकली, हिरव्या बांगड्या, आणि अशा अनेक शृंगाराच्या वस्तू विवाहित महिलांना दान करायच्या आहेत. एका किंवा एकापेक्षा अनेक महिलाना दान करू शकता. घरातील लग्न झालेली महिला असेल तरी चालेल.

दान करताना त्या सौभाग्यवतीला देवा समोर बसवावे. हळदी कुंकू लावावे व त्यानंतर या सौभाग्याचा काही वस्तू तिच्या पदरात दान कराव्यात. तिचा आशीर्वाद घ्यावा, मग ती लहान असेल किंवा मोठी असेल तिचा आशीर्वाद घ्यावा.

हा उपाय केल्याने तुमचे सौभाग्य सुखी होते, संसार सुखी व्हायला लागतो आणि भांडण वाद विवाद कमी व्हायला लागतात. तर मित्रांनो हा उपाय नक्की करून बघा. नक्कीच तुम्हाला लाभ होईल. श्री स्वामी समर्थ.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here