नमस्कार मित्रानो
मित्रानो 9 सप्टेंबर 2021 रोजी हरितालिका आलेली आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला हरितालिका साजरी केली जाते. असं म्हणतात कि दाम्पत्य जीवन सुखी व्हावे यासाठी हे व्रत केले जाते. हे व्रत केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात. पती पत्नीमधील प्रेम वाढण्यासाठी या दिवशी काय उपाय करावेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.
हरितालिकेची विधिवत पूजा केल्याने वैवाहिक जीवनात आनंदी आनंद येतो. या दिवशी शिवपार्वतींची विशेष पूजा केली जाते. या पूजेमध्ये दुर्वा , आघाडा , बेलपत्र यांचे विशेष महत्व असते. सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी , तर कुमारिका चांगला किंवा मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी हे व्रत करतात.
जर पती पत्नींमध्ये सतत भांडण होत असतील , कटकट होत असेल , दोघांचे स्वभाव विरुद्ध असतील , घरात सतत भांडणामुळे तणावपूर्ण वातावरण राहत असेल तर हरतालिकेच्या दिवशी तुम्ही आजचा उपाय नक्की करून बघा. या उपायाने तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि प्रेम निर्माण होईल. स्वभाव जुळतील. घरात शांतता राहील.
स्त्रियांनी हरितालिकेची विधिवत पूजा अर्चा करावी. देवी हरितालिकेला व शिव शंकरांना आपले वैवाहिक जीवन सुखी रहावे अशी प्रार्थना करावी. पूजा झाल्यानंतर ओम गौरी शंकराय नमः या मंत्राचा जाप करावा. देवी हरितालिकेची आरती करून खिरीचा नैवैद्य दाखवावा आणि त्या नैवैद्यातील थोडीशी खीर आपल्या पतीला खाऊ घालावी.
असे म्हणतात कि यामुळे आपल्या पतीचे आपल्यावरील प्रेम वाढते. वैवाहिक जीवन सुखमय होते. हरितालिकेच्या दिवशी पाच सुवासिनींना एखादी सौभाग्य वस्तू भेट द्यावी. यामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभते. यासाठी तुम्ही कुंकू , बांगड्या , जोडवी यासारख्या वस्तू भेट म्हणून देऊ शकता.
तसेच या दिवशी आपल्या पतीच्या हातून आपल्या कपाळी कुंकू लावून घ्यावे. यामुळे दाम्पत्यांमध्ये प्रेम इतके वाढते कि तुमची जोडी पाहून लोकांची तुम्हाला नजर लागेल. तर तुम्ही देखील हरितालिकेच्या दिवशी हा उपाय नक्की करा. तुम्हा सर्वांना हरितालिकेच्या खूप खूप शुभेच्छा.माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. कमेंट बॉक्स मध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.