पिक्चर मध्ये येण्याआधी हे काम करायचे पंकज त्रिपाठी उर्फ कालीन भैया… फोटो पाहून विश्वास नाही बसणार…

0
118

बॉलिवूडचे कालीन भैया म्हणजेच पंकज त्रिपाठी यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. तरुण पिढी पासून सर्वांना कालीन भैया परिचित आहेत.

असे बहुतेकच लोक असतील ज्यांना कालीन भैया आवडत नसतील. अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूर मध्ये काम करून तर त्यांनी चांगलीच बॅटिंग केली आणि नावारूपाला आले.

त्यांची ओळख आता पंकज त्रिपाठी राहिली नसून कालीन भैया म्हणून सगळे ओळखू लागले आहेत. बिहार मध्ये वाढलेले पंकज आज सुद्धा तिथल्या जमिनींशी त्यांची नाळ जुळलेली आहे. हल्लीच दिलेल्या एका इंटरव्यू मध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी शेयर केल्या.

आपल्या कले मध्ये पारंगत असलेल्या कालीन भैया ने सांगितले कि , मी गावात होणाऱ्या नाटकात महिलेचा रोल करायचो. त्यांचा अभिनय बघून लोकांनी तर तोंडातच बोट घातली. काहींनी तर सांगितले कि हे जर बॉलिवूड मध्ये गेले तर पूर्ण इंडस्ट्री हादरवून सोडतील.

हल्लीच पंकज त्रिपाठी नेहा धुपियाच्या शो मध्ये आले होते. तिथे त्यांनी बऱ्याच जुन्या गोष्टी अगदी मनमोकळे पणे ताज्या केल्या. तिथे त्यांनी सांगितले कि गावात मी महिलेचा रोल करायचो, एवढंच नव्हे तर मी आयटम सॉंग देखील केले आहेत.

त्यांनी सांगितले कि मी तेव्हा १० वीला होतो जेव्हा मी पहिल्यांदा मुलीचा रोल केला होता. आमचे डायरेक्टर राघव चाचा मला बोलले घरून वडिलांची परवानगी घेऊन ये.

कदाचित तुझे वडील हा रोल तुला करू देणार नाहीत. तू मुलीचा रोल करतोय हे जर त्यांना कळले तर त्यांचा डोक्याचा पारा चढू शकतो. ऐनवेळी तमाशा नको तेव्हा तू आधी त्यांना सांग. माझ्या वडिलांना मुलीचा रोल करण्यापासून मला अडवले नाही.

वडिलांनी मला सांगितले कि तुला जे योग्य वाटेल ते कर पण चुकीच्या मार्गाला जाऊ नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी असेन. वडिलांच्या या बोलण्यानंतर मी कधीच मागे वळून पाहिले नाही.

आज आपण पाहतोच आहे की कालीन भैय्या म्हणजेच आपले पंकज त्रिपाठी तरुणाईच्या गळ्यातील ताई त बनलेत.

पंकज सरांना त्यांच्या आगामी प्रोजेक्टसाठी मराठी धिंगाणा टीम कडून शुभेच्छा. त्यांची अशीच प्रगती होत राहूदे आणि त्यांच्या कडून आम्हाला अशाच दमदार अभिनयाची मेजवानी मिळत राहूदे.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा.

मनोरंजन दुनियेशी संबंधित अशाच भन्नाट पोस्ट मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here