नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आपल्या घरात पाल फिरताना दिसली की किळस येते आणि भीतीदायक वाटते. आपल्या मनात शंका येते की एखाद्या खाद्य पदार्थात पडेल किंवा आपल्या अंगावर पडली तर काय करावे असे अनेक प्रकारचे विचार मनात निर्माण होतात.
आपण पालींना मारण्यासाठी किंवा बाहेर काढण्यासाठी बाजारातून अनेक वि षारी लि क्वि ड आणतो. पण असे केल्यास लहान मुलं आणि घरातील पाळीव जनावरांना सुद्धा धोकादायक ठरू शकतो. अशामध्ये आपण पाल पळविण्यासाठी काही घरगुती उपाय जर केले, ते ही आपल्या घरातील वस्तूचा वापर करून तर या उपायाने पाली बाहेर जाण्यास मदत होईल. मित्रांनो या उपायाचा कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होत नाही.
मित्रांनो आपल्याला या उपायासाठी पहिली वस्तु लागणार आहे ती म्हणजे डे टॉ ल. आपल्याला डे टॉ ल सहज कोठेही, कोणत्याही स्टो अरमध्ये उपलब्ध होऊ शकते. या डे टॉ लमध्ये भरपूर प्रकारचे के मिक ल्स असतात आणि उ ग्र वास हा पालीला सहन होत नाही म्हणून या उपायासाठी आपण डे टॉ ल घेणार आहोत.
आपल्याला एका ग्लासमध्ये हे घरगुती मिश्रण तयार करायचे आहे. त्यासाठी डे टॉ लचे दोन टोपण घेऊन त्यामध्ये कांद्याचा रस मिक्स करायचा आहे. कांद्याचा रस काढण्यासाठी तो किसनीच्या मदतीने बारीक करून घ्या.
असे हे दोन्ही मिश्रण एकजीव केल्यानंतर त्यामध्ये लिंबु सत्व काही प्रमाणात त्यामध्ये टाका. कारण लिंबू सत्व हे पालीसाठी एकदम घा तक समजले जाते, याची मात्रा एकदम थोडी घ्या कारण याचा उ ग्र वास हा पालीला सहन होत नाही तसेच याचा रस तिच्या अंगावर पडला तर पाल म रते.
हे एकजीव केलेले मिश्रण घरात पाल वावरत असलेल्या ठिकाणी टाकावे त्यामुळे पाली कायस्वरूपी निघून जातील. कारण या मिश्रणाचा वास हा अतिशय उ ग्र प्रकारचा येतो त्यामुळे पालीना तो सहन होत नाही. तसेच हे मिश्रण जर तिच्या अंगावर पडले तर ती लगेच निघून जाते.
मित्रांनो तसेच अंड्याचे कवच भिंतीवर लटकवून सोडावे त्यामुळे अंड्याला पाहून पालीला वाटते की हा कोणतातरी जीव आहे आणि तो तिला हानी पोहचवू शकतो. या भीतीमुळे पाल पळून जाते.
त्याच बरोबर कांद्याचा रस आणि पाणी भरुन एक स्प्रे बॉटलमध्ये घ्यावे आणि त्या पाण्यात लसणाचा रस मिसळा. जिथे जिथे पाल येते तिथे तो रस स्प्रे करा. असे हे उपाय करून पाहा. मित्रांनो हा घरगुती उपाय करताना लहान मुलांना यापासून दूर ठेवावे. या उपायांमुळे तुमची पाली पासुन सुटका होईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.