नमस्कार मित्रानो,
मित्रानो प्रत्येकाला नवीन कपडे घेण्याची खूप आवड असते. विशेषतः पुरुषांपेक्षा स्त्रियांना कपड्यांचे फार आकर्षण असते. कुठे सेल लागलाय, सध्या कोणता ट्रें ड आहे तो आपल्या कपाटात असायलाच हवा असे करून आपण नवीन नवीन कपड्यांची खरेदी करत राहतो आणि कपाटात कपड्यांचा ढीग तयार होत राहतो.
इतके कपडे जमा होतात कि त्यांचा वापर काही होत नाही. नव नवीन फॅ शन किंवा आवड म्हणून हे कपडे घातले जातात व फॅ शन जुनी झाली कि तसेच ते कपडे कपाटात एका कोपऱ्यात पडून राहतात. असे करून कपाट कपड्याने गच्च भरते व नंतर गरज वाटते ते जुने कपडे बाहेर काढण्याची.
त्यानंतर आपण आपल्याला न आवडणारे किंवा जुनी फॅशन झालेले, व्यवस्थित फिटिंग न बसणारे, फाटलेले, शिलाई निघालेले असे बऱ्याच प्रकारचे कपडे बाजूला काढतो. मग आपल्यापुढे एक प्रश्न पडतो कि या कपड्यांचे आता काय करावे? आज आपण हेच जाणून घेणार आहोत कि जुन्या व फाटक्या कपड्यांचे काय करायचे?
मित्रानो फाटलेले कपडे कधीही घालू नयेत. बहुतेकदा असे होते कि ढीगभर कपडे असले देखील आपला जीव एखाद्या ड्रे स वर अडलेला असतो. तो आपला आवडता ड्रेस असल्याने तो जुना झाला, फाटला तरी त्याला आपल्याला टाकून द्यावेसे वाटत नाही आणि मग तो ड्रेस तसाच घातला जातो.
परंतु मित्रांनो फटके कपडे घातल्याने आपल्या आजारात वाढ होते. आपल्याला दुःख व त्रासाचा सामना करावा लागतो आणि याचे खूप अनिष्ट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. म्हणून कितीही आवडता ड्रेस असुद्या फाटला असेल तर तो टाकून द्यावा किंवा शिवून घालावा.
काही व्यक्तींचे वरचे कपडे अगदी छान आणि टापटीप असतात. परंतु अंडरगारमेंट्स फाटले तरीही ते तसेच वापरले जातात. बनियनला अनेक ठिकाणी छि द्र पडलेली असतात व ते तसेच वापरले जातात. फाटलेले किंवा शिवलेले अंडरगारमेंट्स वापरल्याने मानसि क आ जार होऊ शकतात.
तसेच कपड्यांचा संबंध हृ दयाशी असल्याने हृ द्य संबंधी आजा रांचा सामना करावा लागू शकतो. फाटलेले कपडे घातल्याने आपल्या ऊर्जेचा क्षय होतो. तसेच कंबरे खालील कपडे फाटलेले असतील तर आपल्याला शनिदोषाचा देखील सामना करावा लागू शकतो. म्हणून फाटलेले कपडे कधीही घालू नयेत.
मित्रानो आपण जे कपडे वापरत नाही परंतु ते व्यवस्थित आहेत फाटलेले नाहीत असे कपडे आपण गरजू व्यक्तींना देऊ शकतो. परंतु आपले जुने कपडे इतरांना देताना धुवून आणि व्यवस्थित घडी घालूनच द्यावेत. आपण कपडे अंगावरून काढून न धुता तसेच कधीच कोणाला देऊ नये. जुने कपडे केवळ गरजूंनाच द्यावेत.
ज्यांच्याकडे भरपूर आहे, ज्यांना कशाची कमतरता नाही अशा व्यक्तींना जुने कपडे कधीही देऊ नयेत. ज्यांना खरोखर या कपड्यांची गरज आहे, जे या कपड्यांचा वापर करतील अशाच लोकांना हे कपडे द्यावेत. जुने कपडे शुक्रवारी किंवा शनिवारीच घराबाहेर काढावेत. कोणालाही जुने कपडे देताना शुक्रवारी किंवा शनिवारीच द्यावेत.
आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट करायची असेल तर शनिवारी जुने कपडे घराबाहेर काढणे सर्वश्रेष्ठ ठरते. आपण जुने कपडे घराबाहेर काढले कि त्यांतून घरात काही स्वछतेसाठी नरम, मऊ सुती कपडे काढून बाजूला ठेवतो. परंतु अशा कपड्यांची गाठोडी करून ठेऊ नये. ते घडी करून एका ठिकाणी मांडून ठेवावेत.
सोबतच अशा कपड्यांना वरचे वर उन्हात ठेवावे म्हणजे त्या कपड्यांवर नकारात्मक ऊर्जा निर्माण होणार नाही. कारण आपण 3 महिने ज्या वस्तूला हात लावत नाही त्या ठिकाणी नकारात्मकता व दारिद्य निर्माण होते.
हिवाळ्यात वापरले जाणारे कपडे जसे कि रजई, गाद्या, स्वेटर, ब्लॅं केट यांना सुद्धा थोड्या थोड्या दिवसांत उन्हात ठेवत चालावे. म्हणजे हे कपडे खराब सुद्धा होत नाहीत आणि त्यावर नकारात्मक ऊर्जा देखील जमा होत नाही.
जुने झालेले, फाटलेले, वापरात नसलेले आतील कपडे हे कधीच कोणाला देऊ नयेत. असे सर्व कपडे एकत्र करून जाळून टाकावेत किंवा कचरा कुंडीत टाकून द्यावेत. आपण जेव्हा नवीन कपड्यांची खरेदी करतो तेव्हा ते वापरायला काढण्यासाठी शक्यतो सण, वार, शुभदिवस, बुधवारी, गुरुवारी किंवा शुक्रवारी हे नवीन कपडे घालायला सुरवात करावी.
हे दिवस नवीन कपडे घालण्यासाठी शुभ मानले जातात. मित्रानो आतापर्यंत आपल्याला लक्षात आलेच असेल कि जुन्या कपड्यांचे काय करावे. ते कोणाला द्यावेत व कशा प्रकारे त्यांचा नायनाट करावा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.