मुलगी प्रसिद्ध व्हावी हे बापाचं स्वप्न होतं, मात्र मुलगी लहानपणीच…

0
435

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो 90 च्या दशकात लोकांचे आयुष्य फक्त एका चॅनेल वर अडकले होते. काही ठराविक कार्यक्रम आणि जाहिराती पाहून भारतीय लोक आनंदी होते. आजही त्या काळातील कार्यक्रम आणि जाहिराती लोकांच्या मनात घर करून आहेत.

90 च्या दशकातील जाहिरातींबद्दल सांगायचं झालं तर निरमा वॉशिंग पावडरची जाहिरात आणि त्या जाहिरातीमधील गाणे आजही लोकांच्या तोंड पाठ आहे. त्याकाळी कपडे धुवायची पावडर म्हणजे फक्त निरमाच असा अनेकांनी समज करून घेतला होता.

पाहता पाहता निरमा ब्रँड लोकप्रिय झाला आणि त्या जाहिरातीतील गाणे आजही लोक पुट्पुटतात. तुम्हाला जर लक्षात असेल तर निरमा पावडरच्या पॉकेट वर एक पांढरा ड्रेस घातलेली एक मुलगी आहे. पण हि मुलगी नेमकी कोण आहे हे तुम्ही कधी जाणून घेतले आहे का?

मित्रानो 1969 मध्ये गुजरातचे कर्सनभाई यांनी वॉशिंग पावडर बनवायला सुरवात केली. कर्सनभाई यांना एक मुलगी होती. आपल्या मुलीवर ते जीवापाड प्रेम करायचे. त्यांच्या मुलीचे नाव निरुपमा. कर्सनभाई लाडाने आपल्या मुलीला निरमा म्हणायचे.

कर्सनभाई आपल्या मुलीला कधीच आपल्या नजरेपासून दूर जाऊ देत नसत. पण नशिबापुढे कोणाचे काही चालत नाही हेच खरे. एक दिवस प्रवास करता असताना निरुपमाचे अपघाती निधन झाले. कर्सनभाईना या धक्क्यातून सावरण्यास वेळ लागला.

कर्सनभाईची इच्छा होती कि निरमा ने मोठे होऊन खूप नाव कमवावे. पण तिच्या अकाली निधनाने त्याचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. पण त्यांनी निरमाला अमर करण्याचा दृढ निश्चय केला. व त्यांनी पॉकेट वर निरुपमाचा फोटो लावला.

पण हा प्रवास एवढा सोप्पा नव्हता. कारणं त्या काळात सर्फ सारख्या पावडरचा सुद्धा गाजावाजा होता. त्याकाळी सर्फची किंमत तब्बल १५ रुपये किलो होती. पण कर्सनभाई फक्त साडेतीन रुपये किलोच्या दराने निरमाची विक्री करत होते.

कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना निरमा हा चांगला पर्याय वाटला. त्यानंतर लोक निरमाला ओळखू लागले. निरमा साठी कर्सनभाईनी चक्क सरकारी नोकरी सोडली होती. जेव्हा ते सरकारी नोकरी करत होते तेव्हा दररोज कामावर जाताना सायकल वरून निरमा पावडरची घरो घरी जाऊन विक्री करत असत.

त्याकाळी अहमदाबादला निरमाला चांगलीच पसंती मिळाली. भाईंनी 3 वर्षानंतर वॉशिंग पावडरचा फॉर्मुला तयार केला. पावडर बनवण्यापासून ते विकण्यापर्यंत सर्व काम भाई करत होते. कालांतराने त्यांनी सरकारी नोकरी सोडून निरमा वर सर्व लक्ष केंद्रित केले.

त्यानंतर त्यांनी पुढे जाऊन निरमा साठी एक वेगळी टीम तयार केली. ती टीम जवळपासच्या दुकानांत जाऊन निरमा पावडरची विक्री करत असत. नंतर कर्सनभाईंनी निरमाची जाहिरात बनवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निरमाची जाहिरात शानदार जिंगल सोबत टीव्ही वर झळकली.

निरमा ने एका रात्रीतच संपूर्ण देशाचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले. वॉशिंग पावडर निरमा हे गाणे लोकांच्या ओठी आले. निरमा आता फक्त अहमदाबाद नव्हे तर पूर्ण देशभरात प्रसिद्ध झाली होती. कर्सनभाई मागील चुकांमधून बरच काही शिकले होते. त्यांनी उधारीवर माल देणे बंद केले.

अखेर कर्सनभाईंनी निरुपमा म्हणजेच निरमाला अमर बनवण्याचे स्वप्न पूर्ण केले. माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा.

अशाच माहितीपूर्ण आणि मनोरंजक पोस्ट रोज वाचण्यासाठी आमच्या मराठी धिंगाणा फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here