जीव गेला तरी चालेल. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हि एक वस्तू चुकून सुद्धा कोणाला देऊ नका.

0
288

नमस्कार मित्रानो

मित्रानो नवीन वर्ष लवकरच सुरु होण्याच्या मार्गावर आहे. मित्रानो १ जानेवारी रोजी या काही ठराविक वस्तू कोणी कितीही मागुद्या, चुकूनही कोणाला देऊ नका. या वस्तू लक्ष्मी कारक आहेत , लक्ष्मी प्रधान आहेत. या वस्तूंचा माता लक्ष्मीची थेट संबंध येतो.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी या वस्तू तुम्ही जेव्हा दुसऱ्याला देता तेव्हा तुमच्या जीवनातील चांगली वेळ सुद्धा तुम्ही दुसऱ्याला देता. तुमचं सौभाग्य तुमच्या हाताने तुम्ही दुसऱ्याला प्रदान करता आणि मग सौभाग्याचं रूपांतर दुर्भाग्यात होत.

चांगली चाललेली वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते. आपल्या घरातील लक्ष्मी आपले घर सोडून दुसऱ्याच्या घरी जाते आणि आपल्या घरात मात्र लक्ष्मीच्या अभावाने अलक्ष्मी म्हणजेच दरिद्रता , कंगाली , गरिबी या सर्व नकारात्मक गोष्टी निर्माण होतात.

चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या वस्तू ज्या नववर्षाच्या प्रारंभी चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीयेत.

मित्रानो तुमचं घर , तुमचं कुटुंब ज्या कामावर अवलंबून आहे म्हणजेच ज्या कामातून तुम्हाला पैसा मिळतो , ज्या पैशांवर तुमचं सर्व घर चालत अशा त्या कामाशी संबंधित कोणतीही वस्तू आपण कोणालाही या दिवशी देऊ नका.

उदा. जर तुमचा टेलरिंगचा व्यवसाय आहे , तुम्ही शिवणकाम करता तर त्या शिवण कामाशी संबंधित ज्या ज्या वस्तू आहेत त्यातील कोणतीही वस्तू तुम्ही या दिवशी कोणालाच देऊ नका. कारण या कामातूनच तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. जर तुम्ही तुमच्या घरची लक्ष्मीचं इतरांना देत असाल तर लक्ष्मी नाराज होते , अप्रसन्न होते.

दुसरी गोष्ट म्हणजे नववर्षाच्या प्रारंभी पाण्याशी संबंधित कोणतीही वस्तू मग त्या ठिकाणी एखादे नदीचे चित्र असेल , धबधब्याचं पोस्टर असेल , एखाद ऍक्वेरियम असेल , फाउंटन असेल ज्यातून पाण्याचे कारंजे बाहेर पडतात अशी कोणतीही पाण्याशी संबंधित वस्तू आपण कोणालाही देऊ नका.

अन्यथा धनप्राप्तीचे योग कमी होतात. मित्रानो तुम्ही पहिले असेल कि काही ना काही काम करून तुमच्या घरात पैसा येतो. कधी खूप जास्त तर कधी खूप कमी येतो. हे सर्व धन प्राप्तीचे योग असतात. हे योग कमी होतात जर तुम्ही पाण्याशी संबंधित वस्तू दुसऱ्या कोणाला दिल्या तर.

मित्रानो तिसरी गोष्ट म्हणजे रुमाल. नववर्षाच्या प्रारंभी रुमाल तुम्ही कोणाला भेटवस्तू म्हणून किंवा दान म्हणून दिला तर ज्यांना आपण रुमाल दिला त्या व्यक्तीशी , त्या कुटुंबाशी आपले संबंध खराब होतात.

नववर्षाच्या प्रारंभी गणेश मूर्ती देखील कोणाला दान किंवा भेट वस्तू म्हणून देऊ नये. मित्रानो भगवान श्री गणेश बुद्धीची देवता आहे. ६४ कलांचे गणेश अधिपती आहेत. जी व्यक्ती गणेश मूर्ती कोणाला भेट म्हणून देते त्या व्यक्तीची बुद्धी विपरीत निर्णय घेऊ लागते. घेतलेले निर्णय चुकीचे ठरू लागतात.

गणेश मूर्ती प्रमाणेच माता लक्ष्मीची मूर्ती सुद्धा आपण कोणालाही भेट म्हणून देऊ नका. ती तर प्रत्यक्ष लक्ष्मी आहे आणि जर तिला आपण भेटू म्हणून दुसऱ्यांना देत असू तर अशा वेळी लक्ष्मी सुद्धा घरात टिकत नाही.

नववर्षाच्या प्रारंभी धारधार वस्तू म्हणजेच सुई , सूरी , कैची अशा धारधार आणि टोकदार वस्तू कोणाला देऊ नयेत. अन्यथा जीवनात दुर्भाग्याचा फेरा निर्माण होतो. नववर्षाचा पहिला दिवस आहे आणि अशा वेळी कोणाकडून देखील उसने पैसे किंवा उधार पैसे घेऊ नयेत.

तसेच कोणी कितीही मागितले तरी नववर्षाच्या प्रारंभी कोणालाही उधार पैसे देऊ नका. या दिवशी कोणालाही जामीन राहू नये. कर्ज घेऊ हि नये आणि कर्ज देऊ हि नये. या गोष्टींमुळे आपल्या घराची बरकत थांबते.

तर मित्रानो आपल्या सर्वांचं जीवन सुखी व्हावं , संपन्न व्हावं केवळ याच उद्देशाने हि सर्व माहिती आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचवत आहोत. नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप साऱ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. शुभ: भवतु.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here