नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आपल्या जीवनावर सर्वात जास्त प्रभाव हा आपल्या वास्तूचा असतो. तुमचे घर जर वास्तूशास्त्रनुसार असेल तर घरात सुख-समृद्धी राहते.
आपल्या दररोजच्या काही चुकांचा परिणाम आपल्या जीवनामध्ये खूप दिसून येतो. पण त्या चुकांकडे दुर्लक्ष करू नये, कारण त्या चुका सतत चालू राहिल्या तर आपल्या घरात गरीबी आणि दारिद्र्य येण्याची शक्यता असते.
मित्रांनो दररोज आपण नित्यनियमाने देवी देवतांची पूजा आराधना करतो, परंतु यामध्ये काही चुका होतात पण आपण याकडे दुर्लक्ष करतो. ज्यामुळे त्या पूजेचे आपल्याला योग्य फळ मिळत नाही. त्यामुळे पूजा करताना संपूर्ण श्रद्धाभाव ठेवून कधीच आपण मां साहारचे सेवन करून पूजा करू नये.
मित्रांनो असे केल्याने देवीदेवतांचा कोप आपल्या घरावर होतो. तसेच ते एक प्रकारचे महापापच मानले जाते. तसेच एखादे धर्मग्रंथ वाचन, नामजप करतांना ही पवित्र व शुद्ध भावनेने अवश्य ध्यान करावे.
कधीही देवासमोर लावलेला दिवा फुंकर मारून विझवू नये. तसेच पूजा सामग्रीचा वास घेऊन व त्याची चव घेऊन ते देवाला अर्पण करण्यामुळे देवतांची अवकृपा होऊन दारिद्र्यचा शाप प्राप्त होतो. तसेच घरात रात्रीच्या वेळी नखे काढणे, नखे दातांनी काढून घरामध्ये इतरत्र टाकणे हे चुकीचे मानले जाते. या चुकीच्या सवयींमुळे राहू व केतू ग्रह आपल्याकडे आकर्षित होतात.
या सर्व चुकांमुळे आपल्या जीवनात आपली आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. तसेच कधीही आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याजवळ कचरा पेटी ठेऊ नये. आपल्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ व सुंदर ठेवावा कारण त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात कारण घराच्या मुख्य दरवाज्यातून माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते.
मित्रांनो माता लक्ष्मी ही चंचल स्वरूपाची मानली जाते, त्यामुळे लक्ष्मी घरामध्ये टिकून ठेवणे खूप कठीण असते. घरामध्ये सर्व सुख समृद्धी असताना पैशाचा लोभ करणे तसेच पैशाचा योग्य वापर न करणे, फाटके कपडे घालने, जुने कपडे घालून सारखे नशिबाला दोष देणे या गोष्टीमुळे घरामध्ये कधीही सुख समृद्धी जास्त दिवस टिकत नाही. या सर्वांमुळे घरामध्ये नकारात्मकता वाढून वाईट शक्तींचा प्रभाव वाढतो.
तसेच कधीही आपण आपल्या घरात पैशाच्या गर्वाने कोणाचाही अपमान करू नये, कारण त्या व्यक्तीच्या मनातून निघालेले वाईट शब्द आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. त्यामुळे ते आपल्या विनाशाचे आणि दारिद्र्यचे कारण ठरू शकते. त्याच बरोबर आपल्या दारात आलेल्या व्यक्तीचा कधीच अपमान करू नये. आपल्या इच्छेनुसार त्यांना काही तरी अन्नदान करावे किंवा त्यांना मदत करावी.
मित्रांनो घराच्या वास्तु शास्त्रानुसार त्या घराच्या उंबरठ्याला खुप महत्त्वाचा घटक मानला जातो. कारण उंबरा हा घराचा पाया मानला जातो. घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर बसणे, तसेच त्यावर पाय ठेवून घरामध्ये प्रवेश करणे किंवा बाहेर जाणे, उंबर्यावर बसून जेवण करणे हे घरांमध्ये दारिद्रयतेला आमंत्रण देते.
मित्रांनो शास्त्राच्या मान्यतेनुसार ज्या घराच्या दरवाजाला चौकट किंवा उंबरठा नसेल तर ते खुप अशुभ मानले जाते आणि असा घरात लक्ष्मी कधीच निवास करत नाही. त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजाबरोबरच घराचा उंबरठाही स्वच्छ असावा असे सांगितले जाते.
घराच्या उंबरठ्यावर च्या ठिकाणी कोणतेही अशुभ कार्य घडू देऊ नये ते माता लक्ष्मीच्या आगमनामध्ये अडसर ठरू शकते. तसेच घरामध्ये कसल्याही प्रकारची तुटलेल्या फूटलेली वस्तू ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.