कोणी कितीही मागु द्या… चुकून सुद्धा या 4 वस्तु कोणाला देऊ नका…

0
374

नमस्कार मित्रांनो,

आपण जीवन जगत असताना जीवनात जेव्हा खूप अडचणी येतात, दारिद्र्य येते, विनाकारण भांडणे होतात अशावेळी आपण देवाला दोषी ठरवतो. परंतु तुम्ही जर या चुका करत असाल तर त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमचे दारिद्र्य ओढवून घेताय.

मित्रांनो कळत नकळत काही वस्तू आपण इतरांना देत असतो. आपल्या ज्योतिष शास्त्रानुसार या वस्तू इतरांना देऊ नयेत.

काही अशा गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्या स्वतःच्या भाग्यात असतात, आपल्या नशिबाने आपल्याला दिलेल्या असतात. त्या गोष्टी आपली कितीही जवळची व्यक्ती असली तरी दुसऱ्या व्यक्तीला देऊ नये. मग ती व्यक्ती कितीही जवळची मैत्रीण, मित्र, जिवलग, पाहुणे असुदे कितीही काहीही झालं तरी या वस्तू कोणालाही देऊ नये.

मित्रांनो या वस्तू आपण जर कोणाला दिल्या तर माता लक्ष्मी घरातून निघून जाते, ती आपल्यावर रुसते.

पहिली वस्तू म्हणजे आपल्या लहान मुलांचे कपडे जर जास्त असतील, जुने झालेले असतील, फिट बसत नसतील तर ते आपण दुसऱ्यांना वापरायला किंवा गरिबांना दान म्हणून देतो.

पण मित्रांनो असे करू नका, तुम्हाला द्यायचे असतील तर नवीन घेऊन द्या. पण तुमचं मूल नऊ ते अकरा वर्षांचं होईतोवर ते कपडे कोणालाही देऊ नका.

असे केल्याने तुमचे मूल आ जारी पडते, कि रकि र करते, सतत रडते व अस्वस्थ राहते, पण त्याचे कारण मात्र स्पष्ट होत नाही.

मित्रांनो कारण ते कपडे दिल्याने त्याच्या भाग्यावर परिणाम होत असतो. जे मुलं अकरा वर्षांपेक्षा मोठे आहेत जर त्यांचे कपडे तुम्हाला द्यायचे असतील तर स्वच्छ धुवून घ्या. चोळामोला झालेले, तसेच उचलून देऊ नये.

दुसरी वस्तू म्हणजे विवाहित स्त्रियांनी त्यांचे सौभाग्य अलंकार असणाऱ्या पायातील जोडवी आणि मंगळसूत्र कोणालाही देऊ नये.

कितीही जवळच्या व्यक्तीने जरी मागितले तरी देऊ नये. हे अलंकार तुमचे स्वतःचे असतात, जे तुमच्या पती पत्नीच्या नात्यातील प्रेम वाढवतात. पण जर तुम्ही हे कोणाला देऊ केले तर तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो, वाद होऊ शकतात परिणामी माता लक्ष्मी दूर जाते.

मित्रांनो तिसरी वस्तू म्हणजे आपण पैसे आपल्या जवळच्या मित्रांना उधार देतो. पण मित्रांनो हे पैसे मंगळवारी कधीही उसने, उधार देऊ नयेत कारण त्यामुळे तुम्ही अडचणीत येता.

या दिवशी दिलेले पैसे परत येण्याची शक्यता कमी असते, त्यामुळे तुम्हाला त्रास होतो, जेव्हा ते पैसे परत मागण्याची वेळ येते.

चौथी वस्तू म्हणजे आपली चप्पल मग ती जुनी असो किंवा नवीन ती कधीही कोणालाही देऊ नये. आपली चप्पल तर देऊ नयेच, तसेच कोणाला नविनही घेऊन देऊ नये.

मित्रांनो त्याच प्रमाणे झाडू कुणीही कितीही मागितला तरी तो थोड्या वेळासाठी सुद्धा कोणाला देऊ नये. झाडूमध्ये माता लक्ष्मी वास करते त्यामुळे झाडू देणे म्हणजे साक्षात लक्ष्मी दुसऱ्यांना देणे होय.

जर तुम्हाला झाडू द्यायचा असेल तर दान करू शकता, कोणत्याही मंदिरात पहाटे लवकर तुम्ही झाडू दान देऊ शकता.

मित्रांनो या वस्तू नेहमीच लक्षात ठेवा जेणेकरून तुम्ही कोणालाही देणार नाही व तुमच्या घरात गरिबी येणार नाही.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here