नमस्कार मित्रांनो,
हिंदू धर्मशास्त्रानुसार बुधवारच्या दिवशी जी व्यक्ती मनोभावे गणपती बाप्पांचे मनोभावे पूजन करते, त्या व्यक्तीच्या आयुष्यातील मोठ्यात मोठी संकटे बाप्पा दूर करतात. आपल्या मनातील कोणत्याही प्रकारच्या इच्छांची पूर्ती करण्यासाठी, एखादी इच्छा अपूर्ण आहे त्यासाठी आपण बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांचे पूजन अवश्य करावं. बुधवारी बाप्पाची पूजा केल्याने चौसष्ट कलांचा अधिपती आणि देवांमध्ये प्रथमेश असणारे श्री गणेश आपली ही अपूर्ण असणारी इच्छा नक्की पूर्ण करतात.
बुधवार या दिवशी बुध ग्रहाचा प्रचंड प्रभाव असतो. तसेच दुर्गामातेचा हा दिवस आहे आणि म्हणूनच काही विशिष्ट कार्य या बुधवारच्या दिवशी आपण चुकूनही करू नये. त्याने आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतात. बुधवारच्या दिवशी म्हणूनच आपण कन्येचा अपमान चुकूनही करू नये. आपल्याकडून कोणत्याही कन्ये बद्दल अपशब्द बोलले जाणार नाहीत याची काळजी घ्या.
मित्रांनो बुधवारी जर आपल्याला एखादा किन्नर दिसला तर त्याचा अपमान करू नये. याउलट किन्नर दिसला तर शृंगाराच सामान त्यांना दान अवश्य करावे. त्याने आपल्या भाग्यतील मोठ्यात मोठे दोष दूर होतात. या दिवशी केसांशी संबंधित कोणतीही वस्तू खरेदी करू नये. बुधवारच्या दिवशी दूध असेल किंवा खीर असेल तर अशा प्रकारचे पदार्थ आपण बनवू नये. कारण हे पदार्थ बनवताना दूध जळले जाते. तसेच शक्य असल्यास दूध उकळू नका.
मित्रांनो या दिवशी शक्यतो कोणाला पैसे उधार देऊ नयेत. त्यामुळे पैसे तर परत येतील मात्र त्या संबंधित अनेक प्रकारच्या समस्या आणि परेशानी आपल्याला त्रासदायक ठरू शकेल. बुधवारच्या दिवशी उप वास केल्याने आणि गणपती बाप्पांच दर्शन घेतल्याने बुद्धीची प्राप्ती होते. बुधवार किंवा शुक्रवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र असेल तर या वेळी कोणतेही शुभ कार्य चुकूनही करू नये.
बुधवारच्या दिवशी नवीन बुट असतील, नवीन कपडे असतील या गोष्टी नवीन घालणे टाळावे कारण आपलं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. जर तुमच्या घरातील कन्या सतत आ जारी असेल, तर अशा वेळी बुधवारच्या दिवशी त्या मुलीच्या आईने एक उपाय करायचा आहे .ज्या घरातील मुली आ जारी असतात तर अशा मुलींच्या आईने, मातेने आपल्या डोक्याचे केस कापू नये.
मित्रांनो बुधवारच्या दिवशी जर तुमचं ईशान्य दिशेला एखादे महत्त्वाचे काम असेल किंवा या दिशेला विशेष यात्रा किंवा प्रवास करणार असाल तर या ईशान्य दिशेला शक्यतो प्रवास करू नका. कारण बुधवारच्या दिवशी या दिशेला दिशा शूल असतो आणि त्यामुळे केलेली यात्रा पूर्ण होत नाही, यात्रेमध्ये अनेक अडथळे येतात. आपली यात्रा अशुभ मानली जाते. या सोबतच बुधवारी उत्तर आणि पश्चिम या दिशांना सुद्धा यात्रा करू नये. जर यात्रा खूपच महत्त्वाची असेल तर अशा वेळी थोडेसे धने किंवा थोडेसे तीळ आपण खावेत आणि त्यानंतरच आपण या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडावं.
मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार बुधवारच्या दिवशी पान खाल्ल्याने पाने खाणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात मोठ्या प्रमाणात धनहानी होते. कोणत्याही कारणास्तव पैसा वायफळ खर्च होतो. अशा प्रकारे बुधवारच्या दिवशी ही काळजी घेतल्यास तुम्हाला कोणत्याही अडचणी येणार नाहीत.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.