नमस्कार मित्रांनो
मित्रांनो झी मराठी वरील खूपच कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारी मालिका म्हणजे नवा गडी नवं राज्य. या मालिकेने थोड्याच दिवसांत आपली जागा निर्माण केली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचले आहेत.
एक वेगळीच थीम घेऊन मालिकेचे प्रसारण होत असल्यामुळे चांगलाच प्रतिसाद या मालिकेला मिळताना दिसत आहे. अनिता दाते रमाच्या भूमिकेत , पल्लवी पाटील आनंदीच्या भूमिकेत तर कश्यप परुळेकर राघवच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे.
दरम्यान शूटिंगच्या वेळी एक वेगळाच गोंधळ सेटवर उडाला. अनिता आणि पल्लवी मध्ये चांगलीच जुंपलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ कश्यप परुळेकरच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेयर झाला आहे.
यावर त्याने लिहिले आहे कि एखाद्या दिवशी लवकर उरकलं तर अशी मारामारी करायची ? बारीक पाहता असे दिसून येत आहे कि यांच्यात खरोखर मारामारी होत नसून निव्वळ मस्ती म्हणून टाईमपास करत आहेत.
हा व्हिडीओ फक्त चाहत्यांनाच नाही तर मोठं मोठ्या सेलिब्रेटींना पण आवडला आहे. अभिनेत्री श्रुती मराठे तर या हाणामारीला खरोखर समजून सेट वर धाव घेणार होत्या परंतु नंतर त्यांना समजले कि या दोघी फक्त मस्ती करत आहेत.
नवा गडी नवं राज्य मालिकेत चिंगी राघववर रागवून रमाच्या आई वडिलांकडे राहायला गेली होती. घर सोडून गेल्यानंतर चिंगीचा वाढदिवस असतो. ती घरात नाही त्यामुळे आधीच राघव चिंतेत असतो. त्यात तिला घरी परत आणण्यासाठी आनंदी धडपडत असते.
दरम्यान वाढदिवसाला वेश बदलून चिंगी घरात येते पण घरात सगळ्यांना समजते की ही चिंगी आहे. तिला आवडते म्हणून आनंदीने पाणीपुरी बनवली होती. त्यावर चिंगी ताव मारते आणि स्वतःचा वाढदिवस साजरा करते.
त्यानंतर तिचा रुसवा निघून जातो आणि ती पुन्हा राघवकडे राहायला येते. दरम्यान घरात राघवची बहिण आणि आनंदीची बहिण माई यांच्यात वाद होतो आणि माई रागाने तिथून निघून जाते. आता आनंदी तिचा गैरसमज कशी दूर करेल हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.