श्रीकृष्ण सांगतात, गरुड पुराणानुसार नरकात मिळणाऱ्या सगळ्यात भयानक नऊ शिक्षा..!

0
210

नमस्कार मित्रानो

मित्रानो भगवान श्रीकृष्ण सांगतात माणसाला त्याच्या कर्माची शिक्षा या जन्मा सोबतच नरकात पण भोगावी लागते. मनुष्याद्वारे केले गेलेल्या सर्व चांगल्या वाईट कर्माचा हिशोब माझ्या द्वारे बनवलेले स्वर्ग आणि नरक मध्ये द्यावाच लागतो. नरकाचे नाव ऐकूनच सर्वांना घाम फुटू लागतो.

कोणताही धर्म असू दे , नरक ही सगळ्यात वाईट जागा समजली जाते. जिथे मनुष्या द्वारे केलेल्या कर्मांची शिक्षा त्याला मिळते. नरकामध्ये मनुष्याच्या हातून झालेल्या छोट्या छोट्या पापांची सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्त शिक्षा दिली जाते. जेंव्हा की स्वर्ग लोकांमध्ये मनुष्य आपल्या कर्मामुळे मोठ्या आनंदाने आपले जीवन व्यतीत करत असतो.

श्रीकृष्ण यांनी गरुड पुराणामध्ये चौर्‍यांशी लाख शिक्षांविषयी विस्तार पणे सांगितले आहे. या सर्व शिक्षा माणसाला त्याच्या द्वारे केलेल्या पाप-पुण्याच्या कर्मामुळे मिळते. यमराज आणि त्यांचे यमदूत पापी आत्म्यांना नरकामध्ये शिक्षा देतात. आज आपण जाणून घेणार आहोत नरकात दिल्या जाणाऱ्या भयानक शिक्षां विषयी.

असितापत्रम

ही शिक्षा आपल्या जबाबदारी पासून पळून जाणाऱ्यांना दिली जाते. जेव्हा कोणती व्यक्ती आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडत नाहीत तेव्हा त्यांना ही शिक्षा दिली जाते. या शिक्षे मध्ये शरीरावर चाकूने अनंत घाव करून त्रास दिला जातो.

कुंभीपाकम

ही शिक्षा जनावरांवरती क्रूरता दाखवणाऱ्यांना दिली जाते. ज्या व्यक्ती शिकार करतात किंवा जनावरांना आपल्या स्वार्थासाठी मारून टाकतात त्यांना कुंभी पाकम ही शिक्षा दिली जाते. या शिक्षेमध्ये त्यांना गरम कढई मध्ये उकळले जाते.

वैतरणी

नरकामध्ये एक प्रकारची नदी असते. ही शिक्षा अत्यंत क्रूर आणि पापी लोकांना दिली जाते. जे लोकं आपल्या स्वार्थासाठी दुसर्या लोकांना त्रास देतात त्यांना नरकामध्ये आपले जीवन या नदीकिनारी असलेल्या घाटावर व्यतित करावे लागते. नदीमध्ये कुडा कचरा, मेलेले जनावरं, किडे, सडलेले मांस, मलमूत्र अशा जगातील सर्वांत घाणेरड्या गोष्टी असतात.

तमिश्रम

नरकातील सर्वांत भयानक शिक्षेपैकी एक अशी ही तमिश्रम शिक्षा आहे. ही शिक्षा दुसऱ्याचे धन किंवा संपत्ती हडप करणाऱ्या व्यक्तींना दिली जाते. या शिक्षेत मनुष्याला चाबकाने तोपर्यंत मारले जाते जोपर्यंत तो मुर्छित होत नाही. तो मनुष्य शुद्धीत आल्यानंतरही त्याला पुन्हा मारले जाते. गरुड पुराणानुसार या शिक्षा समाप्तीचा कोणताही अवधी नाही. ही शिक्षा काळाच्या अंतापर्यंत चालत राहते.

तप्तमुर्ती

जे लोकं आभूषणं, सोने-चांदी, रत्न, दागिने इत्यादींची चोरी करतात त्यांना तप्तमूर्तीची शिक्षा दिली जाते. या शिक्षे अंतर्गत त्या व्यक्तीला नरकातील अग्नीमध्ये अनंत काळासाठी जाळले जाते.

पुयोडकम

ही शिक्षा त्या व्यक्तींना दिली जाते जे परपुरुष किंवा परस्त्री सोबत अवैध संबंध बनवतात. या शिक्षे अंतर्गत मलमूत्र आणि घाणीने भरलेल्या विहिरीत शिक्षेस पात्र असलेल्या व्यक्तीला अनंत काळासाठी ठेवले जाते.

ललाभक्षम

ही शिक्षा बलात्कार किंवा महिलांवर अत्याचार करणाऱ्या पुरुषास दिली जाते. यात मांस खाणार्‍या पशुपक्षांना आणि पापी आत्म्यांना नरकात शरीर देऊन यावर सोडले जातात. हे पक्षी अनंत काळापर्यंत शरीरावरील मांस लचके तोडून तोडून खातात.

सुकरमुखम

हि शिक्षा त्या व्यक्तींना दिली जाते जे लोक दुसऱ्यांना अपमानित करतात आणि आपल्या इशाऱ्यांवर त्यांच्याकडून कामं करून घेतात. या शिक्षेमध्ये पापी माणसाच्या शरीरातील अवयव काढून मोठ्या मोठ्या सुयांच्या मदतीने एका धाग्याने गुंफले जातात. ही शिक्षा सुद्धा अनंत काळासाठी चालते.

अविसि

जी व्यक्ती आपल्या जीवनात आत्याधिक खोटं बोलते त्यास अविसि ची शिक्षा दिली जाते. यामध्ये मनुष्याला मोठ्या मोठ्या पर्वतावरून फेकले जाते. मनुष्य जीवनामध्ये जितक्या वेळा खोटं बोलतो त्याला तितक्या वेळा पर्वतावरून फेकले जाते.

श्रीकृष्ण सांगतात, मनुष्य जेव्हा कोणतेही कार्य करतो तेव्हा ते पूर्ण विचारपूर्वक केले पाहिजे. कारण तो जे काही काम करत आहे त्याचे परिणाम त्याला भविष्यात भोगावे लागणार आहेत.

मित्रानो चित्रगुप्त देवतेकडे सर्वांच्या कर्माचा हिशेब आहे. म्हूणन माणसाने परमेश्वरावर आस्था ठेवून केवळ सत्कर्म केले पाहिजे. वाईट कर्मा पासून दूर राहिले पाहिजे. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण यांनी नरकाचे वर्णन केले आहे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

वरील लेख गरुडपुराण आणि इंटरनेट वर मिळालेल्या माहितीवर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here