30 एप्रिल मोठी संकष्टी चतुर्थी गणपतीला दाखवा हा नैवद्य, तुमचे सगळे विघ्न दूर होतील…

0
276

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो चतुर्थीचा दिवस हा श्री गणेशाचा मानला जातो. या दिवशी बरेच लोक व्रत करतात, उपवास करतात, पूजा पाठ करतात तसेच गणपती बाप्पांचे नामस्मरण सुद्धा करतात. मित्रांनो अशीच चतुर्थी उद्या म्हणजेच 30 एप्रिल ला येत आहे.

मित्रांनो या दिवशी गणपती बाप्पाना हा विशेष नैवद्य तुम्ही दाखवा. नैवैद्यामध्ये हा पदार्थ तुम्ही बाप्पांना दाखवा. श्री गणेश अत्यंत प्रसन्न होतील.

तुमचे सर्व विघ्न विघ्नहर्ता गणेश दूर करतील. तुमच्या इच्छा पूर्ण करतील. घरात सुख समृद्धी नांदेल सोबतच कोणत्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही. म्हणून मित्रांनो या संकष्ट चतुर्थीला गणपतीला प्रसन्न करण्यासाठी हा नैवद्य तुम्ही गणेशाला नक्की दाखवा.

मित्रांनो संकष्टी चतुर्थीला बऱ्याच जणांचे उपवास असतात. तर याच दिवशी संध्याकाळी जेवणाच्या आधी गणपती बाप्पांना नैवद्य दाखवायचा आहे. आणि तोच नैवद्य ज्यांचा उपावास असेल किंवा ज्यांचा नसेल त्या सर्वानी वाटून खायचा आहे.

मित्रांनो तुम्हाला नैवैद्यामध्ये मोदकांचा नैवद्य दाखवायचा आहे. पण हे मोदक काहीतरी वेगळे आणि विशेष असणार आहेत. तर मित्रांनो बरेच लोक मोदक वेगवेगळ्या पद्धतीने करतात. उकळीचे, खोबऱ्याचे, साखरेचे किंवा पुरणाचे असे बऱ्याच पद्धतीचे मोदक बनवता येतात.

मित्रांनो तुम्ही कोणतेही मोदक करा पण तुम्ही मोदक बनवताना जे सारण बनवाल त्यात तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे. ती वस्तू म्हणजे एक छोटासा गुळाचा खडा त्यात टाकायचा आहे. नखाच्या आकाराचा छोटासा तुकडा तुम्हाला प्रत्येक मोदक मध्ये टाकायचा आहे.

मित्रांनो मोदकाचे सारण बनवताना साखरे ऐवजी गूळ वापरला तरी चालेल. पण लक्षात असुद्या सारणात गूळ टाकणे अत्यंत आवश्यक आहे. हा चतुर्थीचा खास आणि विशेष नैवेद्य आहे.

ज्यांना मोदकाचा नैवद्य करणे शक्य नसेल त्यांनी खोबऱ्याची एक वाटी घ्यायची आणि त्यावर गूळ ठेवून बाप्पांना तो नैवद्य दाखवायचा आहे. तर मित्रांनो उद्या संकष्टीच्या दिवशी श्री गणेशाला हा नैवद्य दाखवायला तुम्ही अजिबात विसरू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here