नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ,
मित्रानो तुम्ही सुद्धा स्वामी समर्थांना किंवा इतर देवी देवतांना किंवा देव घरात नैवैद्य ठेवत असाल. जर तुम्ही नैवैद्य ठेवत असाल तर हि एक चूक अजिबात करू नका. नाही तर तुमच्या घरावर संकटे येतील, गरिबी येईल.
मित्रांनो आपण सकाळ संध्याकाळ देवतांना नैवैद्य दाखवत असतो आपण जेही आपल्या स्वतःसाठी करतो चपाती भाजी, वरण भात, खिचडी, चटणी भाकरी आपण खाण्या आधी देवतांना देवघरात ठेवत असतो.
नंतर तो नैवैद्य आपण प्रसाद म्हणून स्वतः खात असतो. परंतु मित्रांनो नैवैद्य दाखवताना बरेच लोक काही नियम पाळत नाहीत. मित्रांनो मुद्दाम करतात असे नाही पण नकळत आपल्या हातून काही चुका घडून जातात.
मित्रांनो दोन नियम आहेत जे आपण नैवैद्य दाखवताना पाळायला पाहिजेत. पहिला नियम म्हणजे आपण जेव्हा पण नैवैद्याचे ताट तयार करतो आणि देवघरात देवा समोर ठेवतो तेव्हा त्या ताटाच्या खाली पाण्याच्या चौकोन करावा. आणि त्यानंतर त्यावर ताट ठेवावे.
पण त्या आधी जेव्हा आपण ताट बनवतो तेव्हा आपण किती पदार्थ केले आहेत वरण भात, भाजी चपाती चटणी भाकरी जे काही असेल त्यावर एक एक तुळशीचे पान ठेवावे. आणि त्यानंतरच नैवैद्य देवतांना दाखवावा.
त्यासोबत तिथे एक पाण्याचा ग्लास ठेवावा. तर मित्रांनो हे दोन नियम म्हणजे तुळशीचे पान आणि ताटाखाली पाण्याचा चौकोन हे जर तुम्ही करत नसाल तर लक्षात ठेवा तुमच्या हातून चूक होत आहे.
तर मित्रांनो इथून पुढे या दोन गोष्टी लक्षात ठेवूनच देवी देवतांना नैवैद्य दाखवायचा आहे. मित्रांनो या नियमांचे पालन नक्की करा देवी देवता नक्कीच प्रसन्न होतील.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणाचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.