नमस्कार मित्रानो
मित्रांनो, नख शरीराचा असा भाग आहे जो अनेक शक्तीने परिपूर्ण असतो. अनेक लोक या माहिती पासून वंचित आहेत की नखांच्या माध्यमातून तंत्र मंत्र,काळी विद्या, वशीकरण केल जाऊ शकत.
अनेक लोक नख कापून कचरा पेटीत टाकतात. ज्यामुळे त्यांच्या जीवनात दुर्भाग्य येते. आज आम्ही तुम्हाला अशीच एक खास माहिती देणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमचे दुर्भाग्य सौभाग्य मध्ये बदलू शकता.
तुमच्या जीवनात धनसंबंधी समस्या असतील तर नखांच्या माध्यमातून ती देखील दूर करता येईल. शत्रूला देखील पराजित करता येते. नखं शरीराचा असा भाग आहे की ज्यामध्ये त्या व्यक्तीच अस्तित्व वास करत असते.
काळ्या जादूमध्ये नखांच्या मदतीने कोणत्याही व्यक्तीचे अस्तित्व जाणून घेतले जाऊ शकते. अशा जादू टोण्यांमध्ये , काळ्या विद्ये मध्ये नखांचा अथवा केसांचा वापर निश्चित होत असतो. नखं कापल्यानंतर ते तुम्ही कचरापेटीत टाकल्यावर तुमचे स्वतःचे अस्तित्व तुम्ही खराब करत असता.
कारण त्याचा सरळ परिणाम तुमच्या जीवनावर होत असतो. असे केल्याने व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडू शकते. तणतण, नैराश्य, विनाकारण भिती वाटणे अशा काही विपरीत गोष्टी त्या व्यक्तीच्या जीवनात घडू लागतात.
मित्रानो कचरापेटीत नकारात्मक ऊर्जा असते. तिकडे नख फेकल्याने त्याचा प्रभाव तुमच्यावर जीवनावर पडत असतो. अशामुळे मनातील विचारांचं संतुलन बिघडते. याआधी तुम्ही देखील ही चूक केली असेल परंतु ही माहिती वाचल्यानंतर अशी चूक करू नका.
तुम्हाला धन संबंधीच्या समस्या असतील तर मंगळवार आणि शनिवारी नखं अजिबात कापू नयेत. केवळ बुधवार आणि शुक्रवारी नखं कापावेत. आणि ही नख आपल्या अंगणातील झाडांच्या मुळाशी टाका.
अस केल्याने तुमचे आरोग्य नेहमीच उत्तम टिकून राहील. सोबतच त्या झाडाचा प्रभाव तुमच्यावर पडू लागतो. वडाचे झाड असल्यास अतिउत्तम. जीवनातील समस्या आणि धन समस्या ठीक होऊ लागतात. वडाच्या झाडाची वाढ कोणीच थांबवू शकत नाही.
तुमचे कोणी शत्रू असतील तुमच्या मनामध्ये विनाकारण भीती, बैचेनी असेल, चिंता असेल तर या सर्व गोष्टी सकारात्मक दिशेने बदल घेऊ लागतील. बऱ्याचदा आपल्या जीवनात काय घडत असते हे आपल्यालाच कळत नाही.
असे तुमच्या बाबतीत घडत असेल तर मन सकारात्मक ठेवा. शुक्रवारी सर्व नख कापून लवंग सोबत कापराच्या मदतीने शनिवारी संध्याकाळी जाळा. याची राख बनेल याची काळजी घ्या. आणि ही राख कोणत्याही झाडाच्या कुंडीत मुळाशी टाका.
तुमच्या सर्व चिंता, भिती, ताण जाईल. फरक तुम्ही स्वतःच अनुभवाल. तुमचे अग्नीतत्त्व वाढेल. शुभं भवतु!
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.