शास्त्रानुसार पूजेमध्ये घंटी कधी आणि कशी वाजवावी…? 99% लोकांना माहीत नाही…

0
1528

नमस्कार मित्रांनो,

आपल्याकडे जसे मंदिर प्रवेशाबाबत अनेक रीति-रिवाज आहेत, तसेच घरातील देवघराचे काही नियम आपल्या शास्त्रात सांगितले आहेत. हिंदू धर्मशास्त्रानुसार देवघरातील सर्वच वस्तुमागील शास्त्रीय कारण सांगितले आहे.

आपण घरात रोजची देवपूजा करताना घरामध्ये घंटी वाजवत असतो, त्यामागे देखील शास्त्रीय कारण आहे. आपल्या घरामध्ये दररोज सकाळ-संध्याकाळ पूजा अवश्य करावी.

पूजा करताना घंटी अवश्य वाजवावी, तसेच एकदा संपूर्ण घरात फिरून घंटी वाजवावी. असे केल्याने घंटीच्या आवाजाने नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते.

आपल्या प्रत्येकाच्या घरी पूजास्थळ असते आणि त्या ठिकाणी देवी-देवतांच्या पूजेसाठी आवश्यक सामग्री ठेवली जाते. यातील पूजेमधील घंटी नादामुळे घरातील वातावरणात प्रसन्नता राहण्यास मदत होते.

शास्त्रानुसार ज्या घरामध्ये अथवा मंदिरात घंटी नसते, त्या ठिकाणी देवी-देवतांचा वास नसतो, त्या ठिकाणी नकारात्मकता वाढते तसेच वाईट शक्‍ती प्रवेश करतात.

मित्रांनो खरे तर शास्त्रानुसार पूजा करत असतांना अनेक वेळा अनेक विधीच्या वेळी घंटी वाजवावी लागते. शास्त्रांनुसार देवी-देवतांना आवाहन करण्यासाठी घंटी वाजवली जाते. घंटी वाजवल्यामुळे देवी-देवतांचे आगमन होऊन ते पूजा स्थळी येतात.

घंटी वाजवल्या मुळे घरातील नकारात्मकता, वाईट शक्‍ती या घंटीच्या नादामुळे निघून जाऊन घरात प्रसन्नता येते. तसेच घंटीचे पुजन केल्याशिवाय घंटी कधीच वाजवु नये. कालिका पुराणानुसार घंटी विषयी सांगितले आहे.

पूजेमध्ये देवीदेवतांच्या स्नानाच्या वेळी घंटी वाजवावी. तसेच देवीदेवतेला धूप आणि नैवेद्य दाखवतेवेळी घंटानाद करावा आणि शेवटी आरतीच्या वेळेस  घंटी वाजवली पाहिजे.

याचबरोबर देवी-देवतांना जागे करण्यासाठी देवघरात शंखनाद केला जातो, परंतु शंखाच्या बाबतीत बरेच नियम आहेत. त्यामुळे याऐवजी घंटानाद केला तर चालते कारण घंटी ही सर्व वाध्यामध्ये पवित्र मानली जाते. त्यामुळे घंटी  पूजेमध्ये अवश्य असली पाहिजे.

मित्रांनो घंटानाद शिवाय पूजा ही अपुरी ठरते. त्यामुळे आपण पूजेमध्ये आवाहना पासून स्नान, वस्त्रालंकार, मुख्य दीपक लावताना तसेच आरतीच्या वेळी घंटी नक्की वाजवावी. घंटानाद हा आपल्या आरोग्यासाठी देखील अतिशय चांगला असतो. त्यामुळे सकाळी , सायंकाळी घंटा नाद जरुर करावा.

घंटा नाद हा आपल्या मनाला प्रसन्न बनवतो, आपल्या मनातील त णावातून आपल्याला देवाची आरती व घंटानाद केला तर बाहेर निघण्यास मार्ग दाखवेल. ईश्वराला प्रसन्न करून घेण्याचा अगदी सोपा मार्ग व उपाय म्हणजे घंटानाद होय, म्हणूनच मंदिरात व घरातील देवघरात घंटा ही असतेच.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here