कवी मंगेश पाडगावकर यांची कविता प्रेम म्हणजे प्रेम असतं, ते तुमचं आमचं सेम असतं, प्रेमाची सुंदर व्याख्या सांगते. पण याच सुंदर अशा प्रेमात मोठा गेम सुद्धा होऊ शकतो हेही चुकीचं नाही.
प्रेम जर खरं असेल तर प्रेमामध्ये रंग, रूप, वय, धर्म काहीही पाहिलं जात नाही. प्रेम हे ठरवून केलं जात नाही, प्रेम कधीही आणि कोणावरही होऊ शकतं. बऱ्याच वेळा आपण अशा व्यक्तीवर प्रेम करायला लागतो जी व्यक्ती आपल्या नशिबात येणं शक्यच नसते.
बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं नवीन नाही. आजपर्यंत बॉलिवूड आणि क्रिकेटच्या दुनियेने खूप जोड्या पाहिल्या आहेत. अनेक क्रिकेटर्स बॉलिवूड अप्सरांच्या प्रेमात पडतात. काही जण फक्त डे टिं ग करून वेगळे होतात. तर अगदी काही जण अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या सारखे आपल्या नात्याला नाव देतात.
काही जणांचे प्रेम हे आयुष्यभर टिकत, तर काही जण मधेच आपल्या प्रेमाचा शेवट करतात. तर आज आपण बघणार आहोत अशाच एका प्रेमाचा झोलझाल…
आज आपण अशा भारतीय क्रिकेटर बद्दल जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या मित्राच्या बायकोला सुद्धा सोडलं नाही. अहो शब्दशः अर्थ नका घेऊ. सोडली नाही म्हणजे पकडून ठेवलं असा अर्थ नका घेऊ.
ज्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात प्रेम निर्माण होतंय ती व्यक्ती आपल्या मित्राची बायको आहे हे माहीत असून सुद्धा या खेळाडूने प्रेम करणं बंद केलं नाही. हा खेळाडू म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय कसोटी सलामीवीर मुरली विजय. सध्या मुरली विजय आयपीएल च्या तेराव्या हंगामासाठी दुबई मध्ये आहे.
मुरली विजय सध्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज कडून खेळत आहे. मागच्या वर्षी मुरली विजय काही खास कमाल करू शकला नव्हता. पण यंदा तो पूर्ण तयारीत आहे. चेन्नई च्या टीमची कामगिरी खराब असली तर मुरली विजय आपल्या कामगिरीसाठी सज्ज आहे.
हे झालं क्रिकेटच्या बाबतीत. पण मुरली विजयची पर्सन ल लाई फ सुद्धा खूपच मसालेदार आहे. चला तर मग जाणून घेऊया कशी मुरली विजय ने आपल्याच मित्राची बायको पळवली.
कोणाच्या संसारात मीठ कालवून आपला संसार बसवला हे चुकीचं आहे. पण शेवटी ते घडलंच. मुरली कार्तिक आपल्या स्वतःच्या खास मित्राच्या बायकोच्या प्रेमात पडला.
मित्राच्या नात्यात या गोष्टीला कोणीही समर्थन देणार नाही. पण त्या दोघांनी जगाची कोणतीही पर्वा न करता एकमेकांशी लग्न केलं. पण या कारणामुळेच मुरली विजय ला आपला मित्र कायमचा गमवावा लागला.
आपण आपल्या आयुष्यात स्वार्थ साठी अनेक गोष्टी करतो. त्या करताना आपण मागचा पुढचा कोणताही विचार करत नाही. पण त्यामुळे आपण आपले जवळचे लोक गमावून बसतो. मुरली विजय सोबत तेच घडलं.
मुरली विजय ने जिच्या सोबत लग्न केलं ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याचाच एकेकाळचा खास मित्र आणि भारताचा भरवशाचा यष्टी रक्षक दिनेश कार्तिक ची पत्नी होती.
दिनेश कार्तिक सध्या आयपीएल च्या तेराव्या हंगामात शाहरुख खान च्या कोलकाता नाईट राय डर चं नेतृत्व करत आहे.
एक काळ असा होता की मुरली विजय आणि दिनेश कार्तिक दोघे एकमकांचे सख्खे मित्र होते. प्रत्येक जण त्यांच्या मैत्रीचं उदाहरण द्यायचे. त्यांच्या नात्याचं कौतुक करायचा.
पण नंतर असं काही घडलं की त्यांच्या मधून विस्तव सुद्धा जात नाही. दोघांच्या मैत्रीत आली निकिता वंजारा. आणि याच मुले दोघांची मैत्री तुटली ती कायमची.
निकिता ही दिनेश कार्तिक ची पत्नी होती. पण मुरली विजय पडला ना भाऊ तिच्या प्रेमात. आणि इथेच माशी शिंकली. आता दुसऱ्याच्या वस्तूंपर्यंत ठीक आहे पण बायको वरच डल्ला मारणे हे काय बरोबर नाही ना.
नजरे मिली और प्यार हो गया…
मुरली विजय आणि निकीताची भेट झाली ती 2012 च्या आयपीएल हंगामाच्या वेळी. तो आयपीएल चा पाचवा हंगाम होता. निकिता आयपीएल चे सामने पाहण्यासाठी मैदानात हजर असायची. पण तिकडेच मोठा घोळ झाला ना ओ बाप्पा.
सामने पाहायला यायला लागल्यानंतर निकिता आणि मुरली विजय मध्ये जवळीकता निर्माण व्हायला लागली. नजरे मिली और प्यार हो गया अशीच काहीशी अवस्था दोघांची झाली.
त्या दोघांना कळलंही नाही की कधी त्यांची एकमेकांना लाईन देणं दोघांना एकमेकांची लाई फ लाइ न बनवून गेली.
दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. जेव्हा त्यांना वाटलं की ते आता लग्न करू आणि त्यांनी तसा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी जगाची पर्वा न करता आपलं नातं जगासमोर आणलं.
निकिता आणि मुरली च तिकडे सगळं ठरलं पण इकडे दिनेश कार्तिक ला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा भाऊला मोठा धक्काच बसला.
बिचारा डोक्याला हात लावून बसला. या गोष्टीचा परिणाम त्याच्या कामगिरी वर सुद्धा झाला. तो आयपीएल हंगामात खेळला पण कामगिरी काही खास नाही झाली.
नंतर सत्य परिस्थिती जाणून घेतल्या नंतर दिनेश आणि निकिताचा घटस्फो ट झाला.
जेव्हा या घडामोडी घडत होत्या त्यावेळी निकिता आई बनणार होती.
एका रिपोर्ट नुसार दिनेश आणि मुरली मध्ये त्यावेळी मोठा वा द सुद्धा झाला होता.
दिनेश कार्तिक ने झालेल्या गोष्टी मागे टाकत 2015 मध्ये दीपिका पल्लीकल सोबत लग्न केले. दुसरीकडे निकिता आणि मुरली विजय आजही एकमेकांसोबत सुखी जीवन जगत आहेत.
प्रेमात मुरली विजय आणि निकिता ने मिळून दिनेश कार्तिकच्या प्रेमाचा गेम केला असला तरी दोघांनी महत्वाच्या व्यक्तीला कायमच गमावलं.
तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर शेयर करा, ही पोस्ट लाइक करा आणि आमचे पेज लाइक करायला विसरू नका…