रोज सकाळी उठल्यावर फक्त 3 वेळा म्हणा हा मंत्र… जीवनात येईल पैसाच पैसा…

0
547

मित्रांनो, सकाळ म्हणजे ब्रम्हचैतन्य, सकाळ म्हणजे उत्साह, सकाळ म्हणजे सकारात्मकता नवीन काहीतरी करण्याची उमेद म्हणजेच सकाळ असते.

असं म्हणतात की तुमची सकाळ जशी होते तसाच दिवसही जातो. दिवस त्या सकाळचं फळ असतो म्हणजेच एकतर वाईट किंवा चांगला. म्हणून दिवसाची सुरुवात नेहमीच प्रसन्न करावी.

सकाळच्या वेळी ध्यान, व्यायाम, श्लोक पठन, मंत्रघोष करावेत. आपल्या हिंदू धर्म शास्त्रात आपल्या सुखी जीवनाचा अर्थ लपला आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे जीवन सुखी, समृद्ध करता.

मित्रांनो जीवनातील काही अडचणी, संकटे यांच्यावर मात करण्याचं बळ या सकारात्मक ऊर्जेत मिळतं. सकाळची वेळ ही अत्यंत शुभ व प्रसन्न मानली जाते. अशा या शुभ सकाळचा योग्य उपयोग आपण लाभदायी बनवू शकतो.

त्यासाठी हा मंत्र उठल्याबरोबर 3 वेळा म्हणा, जीवनात सुख, समाधान, ऐश्वर्य येईल सोबतच जीवन आनंदात व्यतीत होईल.

मित्रांनो मंत्रफळ हे खूप मोठं असतं, असं आपलं हिंदू शास्त्र सांगते व बऱ्याच लोकांना याची प्रचिती सुद्धा आलीय. तुम्ही हा मंत्र सुरुवातीला काही दिवस रोज म्हणा जेव्हा फरक जाणवेल तेव्हाच सातत्य ठेवा.

कारण शास्त्राची गोष्ट ही पूर्ण श्रद्धेने केल्याशिवाय फलित होत नसते. कोणताही श्लोक समजून म्हटला तर तो मानवाच्या जीवनात प्रेरणादायक ठरेल.

मित्रांनो लक्ष्मी, विद्या किंवा भगवान प्राप्त करणे ही मानवाच्या हातातील गोष्ट आहे, असा उत्साही अर्थ ह्या श्लोकात लपलेला आहे.

कराग्रे वसते लक्ष्मीः करमूले सरस्वती,
करमध्ये तू गोविंदः प्रभाते करदर्शनम्

या श्लोकामध्ये मंत्राचा अतिशय सुंदर अर्थ लपला असून हाताच्या अग्रभागी लक्ष्मी आहे असे सांगितले आहे. माणसाचे जवळ जवळ सर्वच उद्योग बोटांच्या अग्रभागाने होतात म्हणून तेथे लक्ष्मीचा वास आहे असे सांगितले आहे.

हाताच्या मूळ भागात सरस्वती म्हणजे विद्या आहे. सरस्वती मूळात आहे ह्याचा अर्थ कोणत्याही कार्याच्या पद्धतीत ज्ञान असलेच पाहिजे. खऱ्या ज्ञानाशिवाय संपत्ती किंवा परमेश्वर काहीच मिळत नाही.

यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे मोक्ष, मानवाला विद्येची नशा चढते. तो उन्मत्त बनतो. हाताच्या तळ ठिकाणी  गोविंद वसतो असे सांगून लक्ष्मी आणि सरस्वती मध्ये आपल्या शास्त्रकारांनी समन्वय साधला आहे.

भगवंताच्या उपस्थितीमुळे माणसाला अहंकार चढत नाही. रावणाच्या जीवनात भगवान नसल्यामुळे लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही असूनही त्याचे जीवन दैवी न बनता राक्षसी बनले.

आपल्या हाताची सर्व बोटे असमान आहेत, पण त्यांना जर हाताच्या मध्यभागी आणले तर समान भासतात. एक वेगळी ताकद येते.

त्याचप्रमाणे समाजात असमानता निर्माण करणाऱ्या लक्ष्मीला आणि सरस्वतीला जर प्रभु बरोबर जोडण्यात आले तर त्या समानता निर्माण करतात. म्हणजेच मानवाला अहंभाव, गर्व होत नाही. स्वतःसोबत इतरांचे हित तो जपत राहतो.

शिवाय हातात भगवंताचा वास असल्यामुळे भगवंताला आवडणार नाही असे एकही कार्य न करता, रोज मी केवळ सत्कर्मच करीन असा विचार सकाळी केला पाहिजे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here