नमस्कार मित्रांनो,
मानवी जीवनात प्रत्येकाला सुख आणि दुःखाचा सामना करावा लागतो. प्रत्येकाचे आयुष्य हे एकसारखे नसते. प्रत्येक दिवस हा काही वेगळे शिकवुन जातो.
मित्रांनो कधी कधी आपल्या जीवनात आनंद मिळतो तर कधी दुख मिळत असते. सुख आणि दुःख हे एकामागुन एक येतच असतात त्याने निराश, खचून चालत नाही त्याचा धैर्याने सामना करावा लागतो.
प्रत्येकाला वाटतं की आपल्या जीवनात कायम सुख समृद्धी राहावी त्यासाठी काही उपाय आहेत ते पूर्ण श्रद्धा ठेवून केले तर तुमच्या अडचणी दूर होतील.
मित्रांनो सर्वात आधी आपली परमेश्वरावर भक्ती असायलाच पाहिजे. म्हणजे आपला प्रत्येक दिवस चांगला जाईल आणि प्रत्येक अडचण दूर होऊन काम यशस्वी होण्यासाठी मदत होईल.
आजच्या आपल्या या उपायासाठी आपल्याला गरज आहे की पुरातन काळापासून चालत आलेल्या उपाययोजनेची.
मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये किती तरी मंत्र असे आहेत की ज्यांचा वापर केल्याने आपले जीवन सुखाने भरून जाईल. परंतु या मंत्राचा उपयोग योग्य वेळी योग्य ठिकाणी केल्याने जास्त फायदा होत असतो.
मित्रांनो देवांचे देव महादेव हे या दुनियेचे स्वामी आहेत. त्यांच्या फक्त मंत्राचे नित्यनियमाने जप केल्याने आपल्या जीवनात कष्ट दूर करण्यासाठी मदत होते. त्यांचे वास्तव्य या पृथ्वीच्या अगदी कणाकणात बसले आहे. म्हणून त्यांच्या शक्तीला जागरूक करण्यासाठी आणि त्याना प्रसन्न करण्यसाठी त्यांच्या मंत्राचा जप एका विशिष्ट पद्धतीने करणे आवश्यक आहे.
ओम नमः शिवाय
हा मंत्र आपण सर्वांनी ऐकला आहे. दिवसातून कितीतरी वेळा आपण याचे जप करतो. ओम शब्दात आपले संपुर्ण जग सामावले आहे.
ओम हा शब्द ब्रम्हा, विष्णू, महेश याचे पूर्ण रूप आहे. यांना वंदन केल्यासारखं आहे. म्हणून या मंत्राचा रोज उत्तरेकडे म्हणजेच कैलास पर्वताकडे तोंड करून जप करावे.
मित्रांनो यामुळे आपण त णाव मुक्त होऊ. महादेवाच्या कृपेने आपल्याला सुख मिळेल.
ओम जुं स्वाहा:
हा मंत्र देखील महादेवाना प्रसन्न करणारा, हा खुप प्रभावी मंत्र आहे. यामुळे मान सि क व शारीरिक कष्ट या पासून आपली सुटका होते.
मित्रांनो यामध्ये आणखी तीन शब्द वापरले तर मंत्राचा फायदा वेगवेगळ्या प्रकारे मिळतो. त्यामध्ये
ओम जुं स्वाहा:
या मंत्र प्रभावामुळे आपल्या जीवनातील दुःख नाहीसे होतील. आपले जीवन सकारात्मक होण्यास मदत होते. त्यामुळे घरातील गरिबी नष्ट होईल.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
मराठी धिंगाणा पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.