नमस्कार मित्रानो,
आज आम्ही तुम्हाला महिलांच्या मासिक पाळीत येणाऱ्या ज्या समस्या असतात त्या बद्दल सांगणार आहोत. अनेक महिलांना मासिक पाळी वेळेवर येत नाही अनेकांना या काळात खूप त्रास होतो. तर यावर आज आम्ही तुमहाला घरगुती रामबाण उपाय सांगणार आहोत.
मित्रानो हा उपाय तुम्हाला मासिक पाळी येण्याच्या दोन दिवस अगोदर चालू करायचा आहे. मासिक पाळी गेल्यानंतर सुद्धा पुढचे दोन दिवसापर्यंत हा उपाय करत राहायचा आहे. म्हणजे संपूर्ण आठ दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
मित्रानो या उपायाने तुमची मासिक पाळी जी अनियमितता आहे ती वेळेवर होणार आहे. जर मासिक पाळीत त्रास होत असेल तर या उपायाने होणारा त्रास देखील निघून जाईल. चला तर मग जाणून घेऊया कसा करायचा आहे उपाय.
मित्रानो उपाय करण्यासाठी आपल्याला जास्वंदाचे फुल लागणार आहे. हे फुल तुम्हाला तुमच्या आजूबाजूला सहज उपलब्ध होईल. जर तुमच्या आजूबाजूला हे फुल मिळत नसेल तर आयुर्वेदिक दुकानात या फुलांची पावडर देखील उपलब्ध असते. ऑनलाईन देखील या फुलांची पावडर विकत मिळते.
आता आपल्याला एका टोपात एक ग्लास पाणी घ्यायच आहे आणि ते गॅस वर गरम करायला ठेवायचं आहे. त्या पाण्यात पाव चमचा एवढ्या मापाची जास्वंदाच्या फुलाची पावडर टाकायची आहे. तुम्ही जर या उपायासाठी ताजे फुल वापरणार असाल तर सर्वप्रथम एक फुल मिठाच्या कोमट पाण्याने धुवून घ्यायच आहे.
या प्रमाणे पाणी घेऊन त्यात आपल्याला त्या फुलाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. मिश्रण चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचं आहे. यामुळे उत्साह, एन र्जी देखील तयार होते. रोगप्र तिकारक शक्ती देखील वाढते. ज्या महिला प्रे ग्नें ट आहेत त्यांनी हा उपाय करू नये.
आता त्या उकळलेल्या मिश्रणात दोन खडीसाखरेचे तुकडे टाकायचे आहेत. तुकडे थोडे मोठे असतील तरी चालतील. केमिकल युक्त खडी साखरेचे तुकडे इथे वापरू नका. 10 मिनिट उकळून झाल्यानंतर ते मिश्रण गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचे आहे.
10 मिनिट उकळल्यानंतर एका ग्लास पाण्याचे अर्धा ग्लास पाणी राहिलेले तुम्हाला दिसेल. मित्रानो तुम्हाला जर वजन देखील कमी करायचे असेल तर त्यात तुम्ही अर्धा लिंबू रस टाकू शकता किंवा चवीसाठी सुद्धा तुम्ही लिंबू रसाचा वापर करू शकता.
तयार झालेले पेय पाळी येण्याच्या दोन दिवस अगोदर पासून प्यायला सुरु करायचे आहे. दिवसभरात एक वेळ ठरवा आणि त्या वेळेस रोज हे पेय प्यायचे आहे. सकाळी उपा शीपोटी घेतले तरी चालेल किंवा दिवसभरात कधीही घेतले तरी चालेल. फक्त वेळ नियमित ठेवा.
असे जर तुम्ही फक्त आठ दिवस जरी केले तरी अनियमित पाळी येणे बंद होऊन पाळी रेग्युलर यायला सुरवात होईल. या उपायाने शरीरातील र क्त आहे ते देखील शुद्ध होते. या पेयाचा साठा करून ठेवू नका. पेय तयार केल्यानंतर गरम असतानाच चहा प्रमाणे प्यायचे आहे.
तर मित्रानो उपाय आवडला असेल तर माहिती शेयर करायला विसरू नका. अशा आरोग्य विषयक पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील माहिती हि सर्वसामान्य माहितीवर आधारित असून कोणताही निर्णय घेण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.