मासिक पाळी नियमित येण्यासाठी काही घरगुती उपाय…

0
1469

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो मासिक पाळी नियमित असणे आरोग्यासाठी चांगले असते. बऱ्याच महिलांना पाळी वेळेवर येत नाही परिणामी अनेक समस्यांना या महिलांना समोरे जावे लागते. काही महिलांना लवकर पाळी येते तर काहींना उशिरा येते.

काहींना तर दोन तीन महिने उलटले तरी पाळी येत नाही. पाळी वेळेवर येणे हे निरोगी असल्याची लक्षणे असतात. मासिक पाळी नियमित येण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ कोणते आहेत ते उपाय.

आलं

मित्रांनो आले हे सहज बाजारात उपलब्ध होते. आल्याचा चहा पिल्याने मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते. पूर्वीच्या काळी महिला पाळी यावी यासाठी चहामध्ये आल्याचा वापर करत असत.

हळद

मित्रांनो कोमट दुधात एक चमचा हळद टाकून पिल्याने पाळी नियमित होण्यास मदत होते. पूर्वी आणि आजही पारंपरिक उपचारासाठी हळदीचा सर्रास वापर केला जातो.

ओवा आणि गूळ

ओवा आणि गुळाचे सेवन केल्याने मासिक पाळी नियमित व्हायला मदत होते. रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा थोडा गूळ टाका आणि ते पाणी सकाळी उपाशी पोटी घ्या. असे केल्याने पाळी लवकर येईल. नक्कीच तुम्हाला या उपायाने मदत होईल.

पपई

मित्रानो कच्ची पपई खाल्ल्याने किंवा कच्च्या पपईचा ज्यूस घेतल्याने मासिक पाळी नियमित आणि वेळेवर येण्यास मदत होते.

दूध हळद

दुधात हळद टाकून एक आठवडा भर सेवन केल्याने मासिक पाळी नियमित आणि वेळेवर येण्यास मदत होते.

दालचिनी

एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर टाकून काही आठवडे सेवन केल्याने पाळी नियमित येईल. या उपायाने सुद्धा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

बडीशेप

एक ग्लास पाण्यात दोन चमचे बडीशेप मिसळून रात्र भर ठेवा. आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी गाळून सकाळी उपाशी पोटी याचे सेवन करा. काही आठवडे याचे सेवन केल्याने मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते.

तर माता भगिनींनो वर दिलेले उपाय तुम्ही नक्की करून बघा. या उपायांचा कोणताही साईड इफेक्ट नाहीये. मासिक पाळीच्या समस्या तुम्हाला सुद्धा असतील तर एक वेळा जरूर हे उपाय करून बघा.

मित्रांनो हे उपाय आवडले असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here