नमस्कार मित्रांनो,
मित्रानो तुम्ही आजवर पाहिले असेल कि बरेच लोक आपापल्या घरामध्ये मनीप्लँट लावतात. मनीप्लँट मुळे घराची शोभा तर वाढतेच पण असं देखील मानले जाते कि मनीप्लँट घरात असले की आपल्या घरात धन आकर्षित होते.
सुख समृद्धी सोबतच धनाचे आगमन होते. पण मित्रांनो हे मनीप्लँट लावताना काही गोष्टी आपण आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात. अन्यथा याचा लाभ होण्याऐवजी नुकसानच होऊ शकते.
वास्तू शास्त्रानुसार हे झाड आपल्या घरात लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते. सकारात्मक ऊर्जेमुळे घरातील वातावरण कायम प्रसन्न राहत तसेच आपल्याला प्रत्येक कार्यात सफलता प्राप्त होते. मनी प्लांट लावल्यानंतर कोणती काळजी घ्यायची आहे ते आता आपण जाणून घेऊ.
साफसफाई
आपल्या घरात जे मनी प्लांट आहे ते अगदी स्वच्छ असावे, त्याच्यावर धूळ बसलेली नसावी. बऱ्याचदा असे होते कि आपण घरात मनी प्लांट लावतो पण त्याकडे पुन्हा लक्षच देत नाही. म्हणजे तिथे जाळ्या होणे ,धूळ बसने असे प्रकार होतात.
आणि जर असे घडत असेल तर साकारात्मकते ऐवजी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे आपल्या घरातील मनी प्लांट नेहमी स्वच्छ ठेवावे. त्याला वेळोवेळी साफ करावे.
सुकलेली पाने
बऱ्याचदा असे होते कि जो मनी प्लांट आपण लावला आहे त्याची काही पाने सुकून जातात, पिवळी पडतात. तर मित्रांनो अशी पाने लगेच काढून टाकावीत. कारण हि सुकलेली आणि पिवळी पाने घरात अशांती निर्माण करतात.
तुम्ही जितकं या झाडाला हिरवं गार ठेवाल तितक धन हे मनी प्लांट तुमच्या घरात आकर्षित करेल.
दिशा
बऱ्याचदा असे होते कि आपण मनी प्लांट आणतो आणि आपल्या सोयीनुसार कुठेही ठेवतो. तर मित्रांनो असे करणे अत्यंत चुकीचे आहे. वास्तुशास्त्रा नुसार आपल्या घरामध्ये मनी प्लांट ठेवण्याची एक विशिष्ट दिशा आहे.
आपल्या घरातील दक्षिण पूर्व दिशेला म्हणजेच आग्नेय कोनामध्ये मनी प्लान्ट ठेवावे.त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी येईल.
वरच्या दिशेने वाढ
मित्रांनो आपल्या घरातील मनी प्लांट हे नेहमी वरच्या दिशेने वाढत असावे. काही जण मनी प्लांटची वेल खालच्या बाजूला सोडतात म्हणजेच कुंडीमध्ये लावल्यानंतर तो वेल खालच्या बाजूला पसरत असतो. तर हे अत्यंत चुकीचे आहे.
मनी प्लांट हे नेहमी वरच्या दिशेला वाढणारे असावे. म्हणजेच तुम्ही एखादी रशी बांधून किंवा तुमच्या खिडकी मधून तो वेल वरच्या दिशेने चढवावा.
म्हणजे तुमच्या जीवन प्रवासात सुद्धा अशीच वरच्या दिशेने प्रगती होईल. सफलतेच्या उच्च शिखरावर पोहोचाल. जर हा वेल खालच्या दिशेला वाढत असेल तर तो तुम्हाला अधोगतीला नेईल. त्यामुळे हि गोष्ट अवश्य लक्षात ठेवा.
सकाळचे दर्शन
मित्रांनो असे मानले जाते कि सकाळी उठल्यानंतर मनी प्लांट पाहावं. सकाळी उठल्यानंतर मंगल गोष्टींचे दर्शन करणे शुभ मानले जाते तर मनी प्लांट त्यापैकीच एक आहे. सकाळी उठल्यावर मनी प्लांट कडे बघावं यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल व दिवसभर तुम्हाला प्रसन्न वाटेल.
तर मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या घरा मध्ये मनी प्लांट लावला असेल किंवा लावणार असाल तर वर सांगितलेल्या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला त्या मनी प्लांटचा पुरेपूर फायदा होईल.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
मराठी धिंगाणा कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.