सोमवारी बोला हा 1 मंत्र… पैसा, वैभव, ऐश्वर्य आयुष्यभर कमी पडणार नाही…

0
558

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो सोमवार म्हणजे महादेवाची आराधना करण्याचा वार. प्रत्येक कामासाठी सोमवार हा शुभ मानला गेला आहे. सोमवारच्या दिवशी जर आपण काही धार्मिक कार्य केले, काही वस्तूंचे दान केले तर प्रत्येक क्षेत्रात आपल्या यश प्राप्त होऊ शकते.

आपण ज्या क्षेत्रात काम करत असून त्या ठिकाणी आपल्याला सफलता प्राप्त होते. मित्रांनो जर तुम्हाला मानसिक, शारीरिक किंवा आर्थिक त्रास असेल, घरात आजारपण असेल तर या दिवशी आपल्या कुलदैवताची पूजा करावी.

जर तुमच्या कुंडली मध्ये चंद्र कमजोर आहे तर या दिवशी तांदूळ आणि दूध अशा वस्तूंचे दान करावे. सोमवारी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. भगवान शिवशंकर हे भोळे दैवत असून भक्तांनी केलेल्या छोट्या छोट्या उपायांनी ते प्रसन्न होतात.

आज आपण पाहणार आहोत कि आपल्या घरात शांती राहावी, सुख शांती नांदावी, जीवनात आपल्याला यश प्राप्ती व्हावी यासाठी काही उपाय जे आपल्याला सोमवारच्या दिवशी करायचे आहेत.

मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये वादविवाद होत असतील, कुटुंबातील सदस्यांमध्ये कलह होत असतील तर सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर सव्वा किलो तांदूळ आपण अर्पण करायचे आहेत. शिवलिंगा जवळ तुपाचा दिवा लावून ओम साम्ब सदाशिवाय नम: या मंत्राचा जप करायचा आहे.

तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळेस मंत्र जाप करू शकता. पण कमीत कमी 21 वेळा तरी हा मंत्र जाप करायचा आहे. हा मंत्र जाप करण्यासाठी तुम्हाला रुद्राक्षाची माळ वापरायची आहे. हा उपाय पती पत्नीने एकत्र बसून केल्यास त्याचे अत्यंत शुभ आणि त्वरित फल प्राप्त होते.

मित्रांनो प्रत्येक महिलेला असं वाटत असत कि आपले सौभाग्य नेहमीच सुरक्षित राहावे. आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे. तर यासाठी सोमवारच्या दिवशी आपल्याला देवी पार्वतीला सौभाग्य अलंकार अर्पण करायचा आहे.

सौभाग्याच्या वस्तू म्हणजे कुंकू, हळद, हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी यासारखे काही सौभाग्य अलंकार आहेत ते आपल्याला देवी पार्वतीला अर्पण करायचे आहेत. आणि तिच्या समोर मागणी करायची आहे कि माझे सौभाग्य अंखड राहो, माझ्या पतीला दीर्घायुष्य मिळो.

मित्रांनो जर तुमच्या नोकरी मध्ये काही अडथळे येत असतील प्रमोशन मिळत नसेल, मनासारखी नोकरी नसेल तर सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर बेलाचे पान, धोतरां, गुलाब, रुद्राक्ष, चंदन, मध, दूध यामधील जितक्या वस्तू तुम्हाला शक्य आहेत तितक्या वस्तू शिवलिंगावर अर्पण करायच्या आहेत.

या वस्तू अर्पण करण्याआधी तांब्याच्या कलशामधून शिवलिंगावर जल अर्पण करायचं आहे. आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जाप करायचा आहे. तर मित्रांनो तुमच्या जीवनात सुद्धा वरील समस्या असतील तर जो उपाय सांगितला आहे तो तुम्ही अवश्य करा.

भगवान शिव शंकराच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होतील. घरात सुख समृद्धी आणि शांती येईल. आर्थिक अडचणी दूर होतील. जर तुमच्या घरात पैशाच्या अडचणी असतील तर त्या देखील दूर होतील.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here