हातावर इथे तीळ असेल तर 2 लग्न होणारच…सामुद्रिक शास्त्र

0
315

नमस्कार मित्रांनो,

आपल्या प्रत्येकाच्या शरीरावर कुठे ना कुठे तीळ नक्की असतात. सामुद्रिक शास्त्रानुसार काही तीळ अत्यंत शुभ असतात, तर काही तीळ मात्र अशुभ समजले जातात. आज आपण आपल्या हाताच्या बोटांवर, हातावर , मनगटावर, कोपरावर, बगलेत, खांद्यावर जे तीळ असतात त्यांचे नक्की अर्थ काय होतात हे सामुद्रिक शास्त्रानुसार जाणून घेणार आहोत.

सुरुवात करुया आपल्या हाताच्या बोटांपासून. मित्रानो ज्या व्यक्तीच्या यामध्ये पुरुषही आले आणि स्त्रिया सुध्दा आल्या. ज्या व्यक्तीच्या बोटावरती तीळ असतो त्या व्यक्ती विश्वासास पात्र नसतात. आपण अनेकदा पाहतो कि समाजात अनेक लोक आपल्याला धोका देतात ,आपला विश्वास घात करतात.

लक्षात घ्या जर एखाद्या व्यक्तीच्या बोटांवरती तीळ असेल तर अशा व्यक्तीवर शक्यतो विश्वास ठेवू नये. अशांपासून सतर्क रहा , सावध रहा.अशा व्यक्ती बेईमान असतात. एखाद मोठं संकट आलं कठीण प्रसंग आला तर त्या संकटाशी त्या सामना करत नाही. आपल्यावर आलेल्या संकटाच रड गाण गाण्यातच त्यांना सार्थकता वाटते.

आता पाहुयात कि आपल्या हातावर जर तीळ असेल तर त्याचा काय अर्थ होतो. ज्या व्यक्तींच्या हातावर तीळ असतो त्या व्यक्ती अत्यंत सौभाग्यशाली असतात. त्यांना त्यांच्या संपूर्ण जीवनात आरोग्याची प्राप्ती होते. यांना धन म्हणजेच पैसा मोठ्या प्रमाणत मिळतो. त्यांची संतती म्हणजेच मुलं बाळ अतिशय गुणी निघतात.

सर्व प्रकारच्या सुखांची प्राप्ती अशा व्यक्तींना होते. हातावर तीळ असणाऱ्या व्यक्ती प्रतिभासंपन्न असतात. ज्या व्यक्तींच्या मनगटावर तीळ असतो अशा व्यक्ती कशा असतात ? तर मित्रानो या व्यक्ती कमीत कमी खर्च करणाऱ्या म्हणजेच अनावश्यक गोष्टी वर या व्यक्ती खर्च करत नाहीत.

या व्यक्ती प्रचंड बुद्धिमान असतात तसेच विश्वसनीय असतात. तुम्ही डोळे झाकून अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू शकता मात्र ज्या पुरुषांच्या मनगटावरती तीळ असतो त्यांचे शक्यतो दोन विवाह होतात. महिलांच्या बाबतीत मात्र हा अपवाद आहे. म्हणजेच त्यांचे दोन विवाह होत नाहीत.

मित्रानो कोपरावर तीळ असणाऱ्या व्यक्ती या शक्यतो यात्रा करण्याची इच्छा बाळगतात. यात्रा म्हणजे दूर देशी कुठेतरी प्रवास करावा. लांबचा प्रवास करावा अशी त्यांची मनोमन इच्छा असते. अशा व्यक्ती चंचल स्वभावाच्या असतात. महत्वाच्या प्रसंगी त्यांना योग्य तो निर्णय घेता येत नाही.

या व्यक्ती एक अथवा दोन कलांमध्ये अत्यंत प्रतिभा संपन्न असतात. कोणती ना कोणती कला यांच्या अंगी असलेली तुम्हाला दिसून येईल. अशा व्यक्ती धनवान , श्रीमंत बनू शकतात मात्र त्यांची अडचण अशी आहे कि या व्यक्ती कुठलेच काम मन लावून करत नाहीत. थोडक्यात त्यांना त्यांच्या कामात शंभर टक्के योगदान देता येत नाही कारण त्यांचा स्वभाव चंचल असतो.

मित्रानो ज्या व्यक्तींच्या उजव्या बगलेत तीळ असतो अशा व्यक्ती त्यांच्या जीवनात अनेक दुःखांचा, कष्टांचा आणि अनेक कठीण प्रसंगांचा सामान करतात. अशा व्यक्तींनी थोडंसं सावधान रहावं.

जी काही संकटे जीवनात येणार आहेत ती संकटे येण्यापूर्वी जर ती व्यक्ती सतर्क असेल तर अशा व्यक्ती स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करू शकतील. सोबतच कल्याण देखील नक्कीच होईल. असावधानता जर बाळगाल , सतर्क जर नसाल तर मात्र खूप मोठे दुःखद प्रसंग अशा व्यक्तीच्या जीवनात सातत्याने येत राहतात.

मित्रानो डाव्या बगले मध्ये जर तीळ असेल तर अशा व्यक्तीच्या जीवनातील सुरुवातीची काही वर्ष प्रचंड संघर्षमयी असतात. मात्र नंतर त्यांना खूप मोठ्या प्रमाणत पैसा प्राप्त होतो. कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा मिळून या व्यक्ती जीवनात अत्यंत सुखी बनतात.

मित्रानो भुजा म्हणेजच आपल्या खांद्यापासून मनगटापर्यंतचा जो भाग आहे त्यावर जर तीळ असेल तर त्याचा अर्थ काय ? तर मित्रानो अशा व्यक्ती अत्यंत विनम्र असतात. परिश्रमी म्हणजेच अत्यंत कष्टाळू असतात. सोबतच त्यांचे वैवाहिक जीवन सुद्धा सुखी असत.

परंतु जर कोपराजवळ तीळ असेल तर अशा पुरुषांना जीवनात अनेक युद्धांचा , संघर्षाचा सामना करावा लागतो आणि कमी वयातच ते विधुर बनू शकतात. म्हणजेच त्यांच्या पत्नीचा मृत्यू होण्याची संभावना असते. याउलट स्त्रियांचे असे असेल तर त्यांना नोकरीच्या , व्यवसायाच्या बाबतीत संघर्ष करावा लागतो.

ज्या व्यक्तींच्या दोन्ही खांद्याच्या बरोबर मध्ये तीळ असतो अशा व्यक्तीचा स्वभाव चंचल असतो , अस्थिर असतो आणि कौटुंबिक जीवनात अशा व्यक्तीला रस नसतो. शक्यतो घराच्या बाहेरच त्यांचं जास्त लक्ष्य असत.

ज्या व्यक्तींच्या उजव्या खांद्यावर तीळ असेल ती व्यक्ती चतुर असते. विवेकी म्हणेजच विवेकशील असते. सोबतच नितिवान देखील असते. ती आपल्या जोडीदाराला कधीच फसवत नाही.

जोडीदाराप्रती नेहमीच विश्वास पात्र हि व्यक्ती ठरते. तीच चरित्र चांगलं असतं आणि प्रत्येक काम विचारपूर्वक करते. अगदी बारकाईनं प्रत्येक काम ती व्यक्ती करत असते.

मात्र ज्या व्यक्तींच्या डाव्या खांद्यावर तीळ असतो अशा व्यक्ती आपल्या व्यवसायामध्ये आणि समाजात प्राप्त असणाऱ्या स्थिती मध्ये संतुष्ट राहतात. थोडक्यात ठेविले अनंते तैसेचि रहावे असा त्यांचा स्वभाव असतो.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here