ज्या व्यक्तीच्या अंगावर इथे तीळ असते ती व्यक्ती असते अत्यंत भाग्यवान…

0
706

नमस्कार मित्रानो,

प्रत्येकाच्या शरीरावर कुठे ना कुठे तीळ असते. तीळ जर चेहऱ्यावर कुठेही असेल तर सौंदर्य अजूनच खुलून येते. शरीराच्या प्रत्येक भागावर असलेले तीळ आपल्याला वेगवेगळे फळ देत असते. हे तीळ फक्त आपले सौंदर्यच वाढवत नाहीत तर आपल्या भविष्याचे सूचक देखील असतात. चला तर मग जाणून घेऊया शरीरावर कोणत्या ठिकाणी असलेले तीळ शुभ आणि कोणत्या ठिकाणी असलेले तीळ अशुभ मानले जाते.

मित्रांनो जर तुमच्या कपाळावर उजव्या बाजूला तीळ असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. पण जर तुमच्या कपाळावर डाव्या बाजूला तीळ असेल तर अशा व्यक्तींचे जीवन निराशेने भरलेले असते. सोबतच अशा लोकांकडे पैसा सुद्धा टिकत नाही. जर तुमच्या उजव्या डोळ्यात तीळ असेल तर तुम्ही खूप उच्च विचार सरणीचे आहात. पण जर डाव्या डोळ्यात तीळ असेल तर तुम्ही नकारात्मक विचारांचे आहात. प्रत्येक कामात नाही नाही करत असता.

ज्या व्यक्तींच्या ओठांच्या वरच्या भागात तीळ असते त्या व्यक्ती खूप प्रेमळ व दयाळू असतात. परंतु ज्यांच्या ओठांच्या खालच्या भागात तीळ असते त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असून उत्पन्न खूप कमी असते. गालावरील लाल तीळ हे शुभ फळ देणारे असते. डाव्या गालावरील तीळ व्यक्तीला निर्धन तर उजव्या गालावरील तीळ व्यक्तीला धनवान बनवते.

व्यक्तीच्या कानावरचे तीळ त्याच्या दीर्घायुष्याचे संकेत आहेत. तर मुखमंडलाच्या आसपासचे तीळ स्त्री असो वा पुरुष दोघांचे सुखी व सज्जन असण्याचे सूचक आहेत. नाकावर तीळ असणाऱ्या व्यक्ती प्रतिभा संपन्न आणि सुखी असतात. स्त्रियांच्या नाकावर असलेले तीळ त्यांचे सौभाग्यशाली असल्याचे सुचक असतात.

डाव्या दंडावर तीळ असणाऱ्या व्यक्ती भांडखोर असतात त्यामुळे सर्वत्र त्यांचा अनादर होतो. याउलट उजव्या दंडावर तीळ असलेले व्यक्ती प्रतिष्ठित व बुद्धिमान असतात म्हणून त्यांना सर्वत्र आदर मिळतो. उजव्या हातावर तीळ असलेली व्यक्ती बलवान व धनवान असते तर डाव्या हातावर तीळ असलेली व्यक्ती खर्चिक असते.

ज्या व्यक्तीच्या अनामिकेवर तीळ असते ती व्यक्ती ज्ञानी, यशस्वी, धनी आणि पराक्रमी असते. तर मित्रानो तीळ फक्त शरीराचे सौंदर्यचं वाढवत नाही तर भविष्यातील घटनांचचे सूचक देखील असतात. तुमच्या शरीरावर देखील या ठिकाणी तीळ आहेत का याचे निरीक्षण एकदा नक्की करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here