नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आपल्या आयुष्यात पैशांची बरकत असावी, लक्ष्मी आपल्या घरात सुखाने नांदावी, घरात नेहमी ऐश्वर्य रहावे असे प्रत्येकाला वाटते.
हे सर्व होण्यासाठी तुम्ही हा एक उपाय करा ज्याने तुमच्या घरावर माता लक्ष्मी आणि भगवान श्री कुबेर यांचा आशिर्वाद कायम राहील.
मित्रांनो घरात काही वेळेस पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, काहीवेळेस नाहक पैसा खर्च होतो, तर काही वेळेस आजा रपणासाठी खर्च होतो.
घरात भरपूर नकारात्मक ऊर्जा वाढली की त्याचे परिणाम असे दिसतात. त्याच बरोबर जर आपल्या हातून वेळी अवेळी काही चुका होतात त्याचेही परिणाम होतात व काही गोष्टी या वास्तूच्या दोषांमुळे होत असतात.
मित्रांनो त्यासाठी आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार काही उपाय सांगितले आहेत जे आपण आपल्या सुखी जीवनासाठी नक्कीच करू शकतो.
पण मित्रांनो हा उपाय तुम्ही गुप्तपणे केला पाहिजे आणि हा उपाय नियमित केला तरी चालतो ते आपल्याला अधिक लाभदायी ठरते.
मित्रांनो तुम्ही तुमची आर्थिक प्रगती होण्यासाठी फक्त शनिवारी घरातील धान्य दळून आणायचे आहे इतर कोणत्याही दिवशी तुम्ही दळायला जायचे नाही.
मित्रांनो जर या धान्यामध्ये गहू असतील तर त्यामध्ये आपण 3 वस्तू टाकायच्या आहेत , एक म्हणजे काळे चणे किंवा काळा हरभरा.
तुम्ही मूठभर काळे चणे घ्या, यानंतर 11 तुळशी पत्र घायचे आहेत. ही पाने तोडताना आपण मनोभावे तुळशीला हा उपाय सांगायचा, तिला सुखासाठी प्रार्थना करावी, हे उपाय करताना ओम नमो नारायणा हा खूप प्रभाव टाकणारा मंत्र म्हणायचा आहे आणि तिसरी वस्तू 2 केसरच्या काड्या लागणार आहेत.
मित्रांनो केसर कोणत्याही प्रकारची चालते. या 3 वस्तू गव्हामध्ये नीट मिक्स करून घेऊन हे गहू शनिवारी दळून आणायचे आहेत.
मित्रांनो इथून पुढे फक्त शनिवारी कोणत्याही प्रकारचे धान्य दळून आणायचे आहे. तुम्ही जसे देव पूजा करता, त्याच्या बरोबरच हा देखील एक साधा उपाय करून पहा त्याने तुम्हाला कधीच पैशाची चणचण भासणार नाही.
हा उपाय तुम्ही करताना किंवा कोणताही उपाय तुम्ही करताना कोणालाही सांगू नका.
ज्योतिष शास्त्रानुसार आपण आपल्या उत्तम जीवनासाठी अनेक उपाय करतो ते जर तूम्ही गुप्त ठेवले तरच ते अधिक प्रभावी होतात. म्हणून कोणताही उपाय पूर्ण श्रद्धेने करा. कारण उपायांचे फळ हे तुमच्या निष्ठेत व विश्वासात असते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.