मिथुन राशी : सप्टेंबर महिन्यात तुमच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणार

0
498

नमस्कार मित्रानो

मित्रानो मिथुन हि राशीचक्रातील तिसरी राशी असून बुध हा वायुतत्वाचा ग्रह या राशीचा स्वामी ग्रह आहे. जो अतिशय बुद्धिमान ग्रह मानला जातो. या राशीचे बोधचिन्ह म्हणजे एकमेकांशी संवाद साधत असलेली स्त्री पुरुष जोडपे.

संवाद , बोलणं , प्रचार , प्रसार या सर्वांचा अर्थ या बोथ चिन्हातून आपल्याला ठळकपणे जाणवतो. मित्रानो अगदी तसाच स्वभाव असतो मिथुन राशीच्या मंडळींचा. संवाद साधन , बोलणं हा नैसर्गिक स्थायी स्वभाव जो आहे तो आहे मिथुन राशींच्या मंडळींचा.

हि वायुतत्वाची राशी असल्यामुळे व्यवहारामध्ये अत्यंत हुशार आणि दक्ष समजली जाणारी हि राशी आहे. विविध विषयांची माहिती घ्यायला यांना प्रचंड आवडत. यांच्याकडे भरपूर माहिती असते , परंतु ज्ञान असेलच असे नाही. म्हणजे एखाद्या विषयातली संपूर्ण जाणकारी असेलच असे नाही.

कोणताही विषय यांना वर्ज नसतो. अगदी क्रीडा क्षेत्रा पासून राजकारण ते समाजकारण अशा कोणत्याही विषयावर अगदी आत्मविश्वासाने चर्चा करू शकणारी या राशीची मंडळी असतात. शूद्र वर्णाची हि राशी असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे काम करण्याची यांची तयारी असते.

एखाद्याला मदत करायला हि मंडळी सदैव तत्पर असतात. बुध हा या राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळे व्यापारामध्ये सुद्धा हि मंडळी यशस्वी होताना दिसतात. बुध ग्रहाचा अमल मिथुन राशीवर असल्यामुळे एखादी गोष्ट कशी सादर करावी हे यांच्याकडून शिकण्यासारखं असत.

हि मंडळी उत्कृष्ट नकलाकार असतात त्यामुळे नाटक , सिनेमा या क्षेत्रात सुद्धा अगदी लवकर नावारूपाला येताना दिसतात. मित्रानो सप्टेंबर महिन्यात १४ तारखेला बदलणारा गुरु ग्रह मिथुन राशीला आठवा येत आहे. जे विशेष शुभकारक समजलं जात नाही. त्यामळे या महिन्यात विशेष सावधानता बाळगावी लागणार आहे.

पंचम स्थानातून जाणारा शुक्र ग्रह काही महत्वाचे लाभ सुद्धा मिळवून देणारा आहे. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात गुरूच १४ सप्टेंबर पर्यंत भ्रमण हे नवम स्थानातून राहणार आहे. त्याला रवी , मंगळ ग्रहाची साथ अगदी चांगली लाभत असल्यामुळे आर्थिक बाबतीत काही निर्णय घ्यायचे असतील तर १४ तारखेच्या आत घ्या.

पहिले १५ दिवस नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. १४ तारखे नंतर गुरु ग्रहाचा भ्रमण हे आठव्या घरातून होणार आहे. म्हणजेच तो पुन्हा एकदा मकर राशीत येत आहे. त्यामुळे जीवनात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. महिन्याचा दुसरा पंधरवडा मात्र निर्णय घेताना काळजी घ्यावी लागेल.

नोकरदार वर्गाने संपूर्ण महिन्यात नोकरीच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही याची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. मंगळाची दृष्टी सहाव्या स्थानावर असल्यामुळे नोकरीत काही अडचणी , वाद निर्माण होऊ शकतात.

तसेच २२ तारखेपर्यंत बुधाची साथ सकारात्मक असल्यामुळे घरामध्ये नवीन वस्तू खरेदी करण्याचे योग निर्माण करत आहेत. थोडेसे कामानिमित्त बाहेर फिरण्याचे योग सुद्धा जुळून येत आहेत. घर किंवा वाहन खरेदीचा विचार करत असाल तर हा काळ अत्यंत फलदायी आहे.

हाताखालील लोक व शेजारच्यांकडून सावध राहावे लागेल. शेजाऱ्यांशी बारीक सारीक गोष्टींतून वाद वाढणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक महिन्यातील ५ तारखे नंतर करायला काही हरकत नाही. सोन्यात केलेली गुंतवणूक पुढे जाऊन लाभकारी ठरू शकते.

१४ तारखे नंतर बदलणारा गुरु काहीसा अडचणी आणू शकतो त्यामुळे शेतीच्या व्यवहारात थोडीशी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीचे व्यवहार हे नुकसान देणारे ठरतील. त्यामुळे व्यवहार अतिशय काटेकोरपणे करायचे आहेत.

शुक्राची साथ या महिन्यात उत्तम लाभणार असल्यामुळे उधारी , उसनवारी यांची वसुली होण्याचे योग शुभकारक आहेत. कला , मीडिया या क्षेत्रांत काम किंवा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा महिना अत्यंत शुभकारक ठरणार आहे.

मंडळी शुक्राची साथ राशीच्या पंचम स्थानातून मिळत असल्यामुळे प्रेम प्रकरणात यशस्वी ठरणार आहात. विवाह इच्छुक मंडळींना मनाप्रमाणे जोडीदार मिळण्याचे संकेत सुद्धा हाच शुक्र देत आहे. आरोग्याचा विचार केला तर रोग स्थानातून जाणारा मंगळ उष्णतेचे विकार , ब्लड प्रेशर , मूळव्याध किंवा स्त्रियांना मासिक पाळीचे आजार या महिन्यात बऱ्यापैकी त्रास देऊ शकतात.

शरीरावर शस्त्र क्रियेचे योग सुद्धा या मंगळ ग्रहामुळे बनत आहेत. अर्थात योग्य डॉक्टरी सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. या महिन्यातील अशुभ ग्रहांचे परिणाम आणि शुभ ग्रहांमुळे होणारा लाभ अजून प्रभावी करण्यासाठी शनिवारी ओम शनिदेवाय नमः या मंत्राचे एक माळ पठण अवश्य करा.

तसेच विष्णू सहस्त्र नामावली बुधवारी अवश्य पठण करा. या महिन्यातील आपल्यासाठी शुभ तारखा १ ते ११ , १५ , १६ , १९ ते २५ , २९ , ३० .

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here