नमस्कार मित्रानो,
एप्रिल 2021 या महिन्यात मिथुन राशीच्या लोकांनी काही बाबतीत अत्यंत काळजीपूर्वक पाऊले उचलण्याची गरज आहे. कारण काही ग्रह अशा प्रकारे अशुभ युती निर्माण करत आहेत कि त्याच्या अशुभ प्रभावाने मिथुन राशीवाल्यांना अडचणीचा सामना करावा लागेल.
मित्रांनो जे लोक जॉब करतात, नोकरी करतात, कुठेतरी एखाद्या व्यक्तीच्या हाताखाली काम करतात अशा लोकांच्या जीवनात त्यांच्या कार्यस्थळी एखाद्या स्त्री कडून प्रचंड दगाबाजीचा संभव आहे.
त्यामुळे कोणत्याही स्त्री सोबत व्यवसाय, नोकरीच्या ठिकाणी वादविवाद करणे कटाक्षाने टाळा. या स्त्री कडून तुमच्या बाबतीत अशा काही घटना घडू शकतात, असा एखादा आरोप, आळ तुमच्यावर येऊ शकतो कि तुमचं संपूर्ण जीवन बरबाद होऊ शकत.
एखाद मोठं षडयंत्र या स्त्रीच्या माध्यमांतून तुमच्या बाबतीत होऊ शकत. केवळ पुरुषच नव्हे तुम्ही जर स्त्री असाल तुमची रास जर मिथुन आहे तर कार्यस्थळी स्त्रियांशी वाद विवाद करणे टाळा.
सोबतच या महिन्यात कोणत्याही प्रकारचं नवीन काम अजिबात सुरु करू नये अत्यंत अशुभ काळ आहे. नवीन कामातून तोटा तर होईलच पण नवीन सुरु केलेले कामातून फायदा न होता तोटाच होईल.
एप्रिल महिन्यात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका. हा महिना गुंतवणूक करण्यासाठी अत्यंत अशुभ आहे. कोणालाही या काळात उधार पैसे देऊ नका. अगदी जवळची व्यक्ती असली तरी सुद्धा उधार देण्याचे मनातून काढून टाका.
उद्योग धंद्यात कोणत्याही प्रकारची खोटी कामे करू नका. नीती नियमाने कामे करा. जस व्यवस्थितीत सुरळीत काम चालू आहे तसेच काम सुरु ठेवावे. कोणत्याही प्रकारचा बदल या काळात करू नका. परक्या व्यक्तींच्या सल्ल्यावर विश्वास ठेवू नका.
काही स्त्रिया, मुलींकडे मन आकर्षिले जाऊ शकते. पण मित्रांनो मनावर ताबा ठेवा. सुरवातीला नाते कितीही गोड वाटत असले तरी या काळात जवळीक साधलेल्या स्त्रिया प्रचंड धोका देऊन जातील.
माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करा.
वरील माहीत हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा मराठी धिंगाणाचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.