नमस्कार मित्रांनो
मेष राशी हि राशीचक्रातील पहिली राशी आहे. या राशीचा स्वामी ग्रह मंगळ असून अग्नितत्वाची क्षत्रिय वर्णाची हि राशी आहे. त्यामुळे तडपदार , नेतृत्व , लढाऊपणा आणि स्वभावामध्ये उग्रता हि थोडीशी जास्त प्रमाणात असते. ब्लड प्रेशर , ऍसिडिटी , रक्तदोष असण्याची शक्यता सुद्धा यांच्यामध्ये जास्त असते.
मित्रानो या राशीचे जे चिन्ह आहे ते म्हणजे मेंढा. मेंढा हा असा प्राणी आहे जो डोक्याने लढतो. याची सर्व ताकद त्याच्या डोक्याच्या भागामध्ये असते. डोक्याने मारलेली एकच धडक समोरच्याला गार करून टाकते. अगदी तसाच स्वभाव असतो या मेष राशीच्या मंडळींचा.
मित्रानो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत १७, १८ आणि १९ डिसेंबर २०२१ रोजी च्या मेष राशीच्या भविष्या बद्दल! चला तर मग जाणून घेऊयात हे तीन दिवस मेष राशि साठी कसे राहतील? आयुष्याच्या एकूणच सर्व पैलुंबद्दल जाणून घेऊयात. तुमची अथवा तुमच्या जवळच्या व्यक्तिची राशी मेष असल्यास ही माहिती तुमच्यासाठीच आहे.
मेष राशी साठी सल्ला : हरणाऱ्या व्यक्तीचा सल्ला, जिंकणाऱ्या व्यक्तीचा अनुभव आणि स्वतःचे डोकं तुम्हाला कुठल्याच गोष्टीत अपयश येऊ देणार नाही. लक्षात ठेवा, चर्चा आणि निंदा फक्त सफल व्यक्तीबद्दलच होते. म्हणून तुम्ही कायम कार्यरत रहा.
या राशीच्या व्यक्ती कायम स्थिर राहतात मग परिस्थिती कशीही असू दे. आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर हवे ते मिळवतातच. या दरम्यान तुमच्या मुलांच्या शिक्षणासंबंधीचे प्रश्न मार्गी लागतील. नकारात्मक परिस्थितीमुळे निराश होऊ शकता. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.
पैशांच्या देवाण-घेवाणाबाबत कोणावरही विश्वास ठेवू नका. नातेवाइकांच्या संदर्भात या दरम्यान अप्रिय समाचार मिळेल. उद्योगांत आपल्या विरोधकांवर लक्ष ठेवा. तणावाचे वातावरण निर्माण होईल परंतु तुम्ही संयम राखा. अनुभवी व्यक्तींचा सल्ला मार्गदर्शक ठरेल.
जोडीदाराची साथ लाभेल. ताणतणावामुळे थकवा कमजोरी येईल. प्रेम संबंध मर्यादित राहतील. आपणच बरोबर आहोत हे पटवून देण्याच्या भानगडीत तुम्ही जवळच्या व्यक्तीला गमावून बसू शकता.
अहंकारावर नियंत्रण ठेवा. अनेक असफलता किंवा प्रगती संथगतीने होत असेल तरीही तुम्ही कार्यमग्न रहा. एक एक पाऊल पुढे टाकत राहा. तुमचा भाग्योदय निश्चित आहे.
कोणत्याही गोष्टीची नवीन सुरुवात करायची असल्यास हा वेळ तुमच्या राशीसाठी अत्यंत लाभदायक आहे. नोकरीत बदल संभावतो. व्यापारात रिस्क असली तरी ती घ्या, शेवटी तुम्हाला हवे आहे तसेच होईल.
या दरम्यान तुम्हाला ग्रहांचे पाठबळ लाभल्याने आत्मविश्वासात कमालीचा बदल होईल. मोठे निर्णय घ्याल. या वेळेमध्ये तुम्ही आपल्या जोडीदाराला तुमचं प्रेम कृतीतून दाखवून द्याल.
घर आणि कार्यक्षेत्र या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल राखण्यात कसरत होईल. अडचणींना धैर्याने तोंड द्याल. तुमची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही यामुळे अवघड कामे या दरम्यान उरकण्याचा प्रयत्न करा.
मानसिक संतुलन राखण्यासाठी मेडिटेशन करा. आध्यत्मिक लोकांची संगत धरा. आजकाल तुम्ही लठ्ठपणा किंवा जीवनातील काही गोष्टींनी त्रस्त आहात. त्यामुळे कामात फोकस होत नाही. प्रेम संबंधात प्रॅक्टिकली निर्णय घ्यावेत. तुम्हाला अपेक्षित धनलाभ होईल. कुटूंबासोबत धार्मिक यात्रा योजना आखाल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.