मेष राशी : सप्टेंबर महिन्यात तुमच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणार

0
435

नमस्कार मित्रानो

मेष राशी हि राशीचक्रातील पहिली राशी आहे. या राशीचा स्वामी ग्रह मंगळ असून अग्नितत्वाची क्षत्रिय वर्णाची हि राशी आहे. त्यामुळे तडपदार , नेतृत्व , लढाऊपणा आणि स्वभावामध्ये उग्रता हि थोडीशी जास्त प्रमाणात असते. ब्लड प्रेशर , ऍसिडिटी , रक्तदोष असण्याची शक्यता सुद्धा यांच्यामध्ये जास्त असते.

मित्रानो या राशीचे जे चिन्ह आहे ते म्हणजे मेंढा. मेंढा हा असा प्राणी आहे जो डोक्याने लढतो. याची सर्व ताकद त्याच्या डोक्याच्या भागामध्ये असते. डोक्याने मारलेली एकच धडक समोरच्याला गार करून टाकते. अगदी तसाच स्वभाव असतो या मेष राशीच्या मंडळींचा.

स्वतःच्या बुद्धीवर आणि मनगटात असलेल्या जोरावर यांचा सर्व जास्त विश्वास असतो. स्वतःच्या कर्तृत्वावर , मेहनतीवर , बुद्धीवर काम करून यश मिळवण्यावर यांचा अधिक जोर असतो. या सप्टेंबर महिन्यामध्ये रवी , शुक्र , मंगळ आणि बुध या ग्रहांच भ्रमण हे पाचव्या , सहाव्या आणि सातव्या स्थानातून होणार आहे.

त्यामुळे आर्थिक बाबतीत व्यावसायिक आणि नोकरदार मंडळींना हा संपूर्ण महिना विशेष शुभकारक तर राहीलच तर आर्थिक बाबतीत सुद्धा फायद्याचा ठरणार आहे. नवीन कामकाज किंवा एखादा मोठा व्यवहार या महिन्यात पूर्ण करायला काही हरकत नाही. तशी संधी चालून आपल्याकडे येणार आहे त्या संधीच सोन करून घेणे जरूरी आहे.

गुरुचे होणारे भ्रमण व्यापाराला अजून शुभकारक बनवत आहे त्यामुळे व्यापाराचे नवीन नियोजन , नवीन मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा संपूर्ण महिना आपण उपयोगात आणू शकता. कारण ग्रहांची चांगली साथ तुम्हाला मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन व्यवहाराला चांगली गती प्राप्त होईल.

या संपूर्ण महिन्यात बुध आणि रवीची साथ असल्यामुळे नवीन व्यवहारांची , कागदपत्रांची काम हि मार्गी लागतील. विशेष म्हणेज कोर्ट कचेरी , सरकारी कामे हि सुरळीत पार पडताना दिसतील. या आधी या कामांत येणाऱ्या अडचणी समाप्त होतील. योग्य मार्गदर्शन मिळेल. योग्य मदत भेटल्यामुळे कामे लवकर होण्याकडे कल राहील.

नोकरीच्या ठिकाणी सुद्धा रखडलेली पगार वाढ या महिन्यात होऊ शकते. चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर या महिन्यात प्रयत्न करायला हरकत नाही. रवी आणि बुध , मंगळ आणि शुक्र यांचं जे साहाय्य आहे त्याच्यामुळे जागेच्या व्यवहाराला चांगले दिवस या महिन्यात मिळतील.

जागेच्या खरेदी विक्रीला वेग येईल. व्यवहार फायद्याचे ठरतील. नवीन घर घेण्याच्या विचारात असाल तर गुरू ग्रहाची साथ १६ सप्टेंबर पर्यंत अतिशय उत्तम आहे. त्यानंतर सुद्धा उत्तम आहे परंतु १६ पर्यंत खूप चांगली साथ मिळेल. बँकेत किंवा शेयर मार्केट मध्ये नवीन खाते बनवणे , व्यवहार सुरु करणे यासाठी बुध आणि शुक्राचे साहाय्य उत्तम आहे.

विशेष करून व्यापार करत असाल तर बँकेत व्यापाराचे करंट अकाउंट सुरु करायचे असेल तर त्यासाठी सुद्धा हा महिना अत्यंत शुभकारक राहणार आहे. शेयर मार्केट मध्ये सुद्धा नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा संपूर्ण महिना आल्याची शुभ परिणाम देईल.

इलेकट्रोनिक , आयटी , बँकिंग , फार्मा या क्षेत्रात काम करण्याऱ्या व्यक्तींसाठी हा महिना अत्यंत शुभ ठरेल. या महिन्यात सोन्यात केलेली गुंतवणूक पुढे जाऊन लाभदायक ठरेल. शेतकरी वर्गासाठी सुद्धा हे ग्रहमान शुभ राहणार आहे. गुरु , शनी , मंगळ , रवी या ग्रहांची साथ शुभ कारक असल्यामुळे शेतकरी वर्गाला सुद्धा या महिन्यात उत्तम लाभ प्राप्त होतील.

विद्यार्थ्यांचा विचार केला तर गुरूची साथ असल्यामुळे महत्वाचे निर्णय सहज घेता येतील. उच्च शिक्षणाचे योग सुद्धा उत्तम असल्यामुळे परदेशी जाण्यासाठी जर तुमची इच्छा असेल तर या विद्यार्थ्यांना हा महिना विशेष लाभ मिळवून देणारा ठरणार आहे. त्यामुळे प्रयत्न करायला काही हरकत नाही.

विवाह इच्छुक मंडळींना शुक्र आणि गुरु ग्रहाची साथ संपूर्ण महिनाभर अतिशय उत्तम राहणार आहे. शुक्राची साथ असल्यामुळे सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. कुटुंबासोबत शेवटच्या आठवड्यात बाहेरगावी जाण्याचे संकेत आहेत. या महिन्यात भावंडांच किंवा मित्र परिवाराचं साहाय्य तुमच्या कामात मिळेल.

या महिना आरोग्याच्या दृष्टीने उष्णतेचे विकार , रक्तदाब असल्यास जास्त प्रमाणात काळजी घेणे गरजेचे आहे. महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जास्त काळजी घ्या. या महिन्यातील अशुभ ग्रहांचे त्रास कमी करण्यासाठी महालक्ष्मी अष्टक , गणपती अथर्वशीर्ष या स्तोत्रांचे पाठ रोज तीनवेळा नक्की करा.

मंगळवारी गणपती बाप्पांचे दर्शन घेता आले तर सोन्याहून पिवळे. या महिन्यातील शुभ तारखा म्हणजे १ ते ११ , १५ ते २० आणि २४ ते ३०.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here