नमस्कार मित्रांनो,
मित्रानो मेष राशी हि राशीचक्रातील पहली राशी असून या राशीचा स्वामी मंगळ आहे. मित्रांनो या राशीच्या व्यक्तींमध्ये जबरदस्त ऊर्जा भरलेली असते. महत्वकांक्षी आणि धाडसी असतात या राशींचे लोक. नेहमीच उत्साही आणि प्रत्येक मन लावून करणे पसंद करतात.
एखादी गोष्ट हाती घेतली तर ती पूर्ण करूनच दाखवणार अशी जिद्द या राशीच्या लोकांमध्ये असते. या राशीचे लोक कधीही स्थिर बसत नाहीत, नेहमी काहीना काही करण्याच्या मागे असतात. जे यांच्या मनात असते तेच त्यांच्या ओठात असते. हे लोक दुटप्पी वागत नाहीत.
लपवाछपवी करणारी हि रास नाहीये. जर यांच्याकडे पैसे असतील तर ते बिनधास्त खर्च करतील. जीवनाचा आनंद घेण्यात या राशीचा हात कोणीच धरू शकत नाही. या राशीच्या लोकांमध्ये धैर्य आणि चिकाटी सुद्धा दिसून येते.
जर का या राशीच्या लोकांना एकदा समजलं कि आपल्याला कोणत्या गोष्टीकडे फोकस करायचा आहे त्यानतंर संपूर्ण उत्साहाने हे लोक त्या क्षेत्रात काम करतात आणि यशस्वी होतात. करियरच्या दृष्टीने या राशीचे लोक आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर चांगल्या पैकी सेटल झालेले असतात.
यांचं बोलणं अगदी सरळ सरळ असत. फिरून फिरून बोलणे यांना पसंद नसते. यांच्या वागण्यात, बोलण्यात पारदर्शकता असते. जे काही असेल ते समोरा समोर. पाठीमागून निंदा करणे, स्तुती करणे यांना जमत नाही. जे काही असेल ते तोंडावर.
आपण जे काही काम करतो त्यातून झटकन रिझल्ट यायला हवा अशी या राशीच्या लोकांची अपेक्षा असते. या राशीच्या लोकांना कोणावर प्रेम असेल तर ते लगेच सांगून मोकळे होतात. मग समोरून होकार येवो किंवा नकार येवो. दोन्ही गोष्टी झेलण्याची तयारी यांच्यात असते.
यांच्याकडे पेशन्स लेव्हल खूपच कमी असते. जे काही आहे ते यांना झटकन हवे असते. पेशन्स कमी असल्यामुळे राग सुद्धा यांना लगेच येतो. एखाद्या गोष्टीतुन रिझल्ट लवकर येत नसेल तर यांची चिडचिड व्हायला सुरवात होते.
समजा मेष राशीच्या व्यक्तीवर तुमचं प्रेम आहे तर तुम्हाला खूप काही करायची गरज नाहीये. सरळ सरळ जाऊन तुम्ही तुमच्या प्रेमाची बाजू मांडू शकता. मेष राशीची व्यक्ती लगेच तुम्हाला सांगेल कि तुमच्याबद्दल त्यांचे काय मत आहे.
मित्रांनो समजा मेष राशीची व्यक्ती रागावली किंवा प्रेमामध्ये काही अडचणी आल्या तर मित्रांनो यांचा जो राग आहे तो जास्त काळ राहत नसतो. काही वेळातच ते नॉर्मल होतात. मेष राशीवाले जेव्हा रागावतात तेव्हा त्यांची समजून काढत बसू नका. राग शांत झाल्यावर तुम्ही सांगितलेल्या गोष्टी त्यांना लगेच पटतील.
जर का या राशीच्या लोकांना तुम्ही पटवून दिले कि हि गोष्ट अशी अशी आहे तर ते याचा स्वीकार करून स्वतः मध्ये बदल घडवून आणतात फक्त तुम्हाला त्यांना पटवून देता आलं पाहिजे. या राशीचे लोक मनाने फार चांगले असतात.
या राशीच्या लोकांना कुठल्याही गोष्टी पटकन करणे पसंद असते. प्रेमामध्ये सुद्धा या राशीचे लोक लवकरच फिजिकल होण्याची शक्यता जास्त असते. फिजिकल रिलेशन बद्दल यांच्या भावना थोड्या तीव्र असतात.
मित्रांनो मेष राशी वाल्यानी एखादी गोष्ट समोर मांडली आणि त्यात जर त्यांचा आत्मविश्वास उच्च लेव्हलचा असेल तर त्यांना तुम्ही क्रॉस जाऊ नका. चार चौघात केलेला त्यांचा अपमान या राशीचे लोक कधीच सहन करत नाहीत.
जर चुकून जरी तुम्ही त्यांचा चार चौघात अपमान केला तर या राशीचे लोक तुम्हाला उलट फिरून बोलू शकतात. जर तुम्हाला काही गोष्टी यांना समजवायच्या असतील तर चार चौघात अजिबात समजवू नका. एकांतात जर तुम्ही सांगितले तर त्या गोष्टी यांच्या पचनी पडतील.
यांना लगेच क्रॉस जाऊ नका. तुम्हाला त्यांच्या काही गोष्टी पटत नसतील तर त्यावर चर्चा करा. प्रचंड उत्साही असणारी हि रास वेळेला भडकते सुद्धा. त्यामुळे यांनी मांडलेल्या मुद्दयांवर लगेच क्रॉस जाऊ नका. त्यावर चर्चा कराल तर नक्कीच मार्ग निघेल.
तर मित्रांनो तुमचं सुद्धा मेष राशीच्या व्यक्तीवर प्रेम असेल तर वर दिलेल्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. प्रेमात जर तुमच्या चुकीमुळे दुरावा निर्माण होत असेल तर या राशीच्या लोकांची फक्त माफी मागा ते लगेच माफ करतील.
माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करा.
वरील माहीत हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा मराठी धिंगाणाचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.