नमस्कार मित्रानो
मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत कि मेष राशीच्या व्यक्तींची कुठल्या राशींच्या व्यक्तींशी उत्तम मैत्री जुळते. मेष राशीच्या व्यक्ती साहसी, ऊर्जावान आणि आत्मविश्वासू असतात.
या राशीचा स्वामी मंगळ या व्यक्तींना स्पष्टवक्ता बनवतो. ताबडतोब निर्णय घेण्याच्या वैशिष्टय़ामुळे या व्यक्ती इतरांपेक्षा वेगळ्या असल्याचे जाणवते. मेष राशीचा माणूस म्हणजे एक घाव दोन तुकडे.
प्रकृती काटक असते. ही माणसं अत्यंत चपळ असतात. अत्यंत कमी वेळात अधिक कामे करण्याकडे कल असतो. देहयष्टी मध्यम उंचीची. त्यांना केस विरळ असतात.तुमच्याकडे खूपच स्पष्टवक्तेपणा, उतावळेपणा आहे. स्वभाव हट्टी असतो. स्वतः घेतलेल्या निर्णयात सहसा बदल करीत नाही.
खेळतांना प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनासारखी करून घेतात.मूड खराब झाला तर तसेच सहन करण्यापेक्षा या व्यक्ती स्पष्ट भांडून, बोलून विषय संपवतात.या व्यक्ती धार्मिक वृत्तीच्या असतात, पण अंधविश्वासू कधीच नसतात. स्वत:चे भाग्य स्वत: घडवण्यावर विश्वास ठेवतात.
आई-वडील म्हणून या व्यक्ती आपल्या अपत्यांबद्दल अतिशय जागरूक असतात. त्यांना आपल्या मुलांबद्दलचे सगळे निर्णय स्वत:च घ्यायचे असतात. ते आपली मनमानी करतात. विद्यार्थी वर्गाचा शास्त्र, गणित विषयांकडे अधिक ओढा असतो. त्यांची आकलनशक्ती तीव्र असते या राशीच्या व्यक्ती उच्च अधिकार पदावर जाऊन पोहचतात.
या राशीच्या व्यक्तींचा उत्कर्ष वय 28 पासून सुरु होतो.तुम्ही प्रेमाच्या बाबतीतही तितकेच अग्रेसर आहात. एकतर्फी प्रेम करणार्यांमध्ये मेष राशीचे प्रमाण अधिक आढळते. प्रेमात, प्रणयात या राशीच्या व्यक्ती आपले वर्चस्व गाजवतात.
तिखट, चमचमीत पदार्थ खाण्याकडे अधिक कल असतो.सुरुवातीला त्यांचे आरोग्य चांगले असते पण जसे वय वाढते तशा आरोग्याच्या समस्या वाढतात. पोटाशी निगडित अनेक व्याधी त्यांना जडतात. हाडांचे विकार, सांधेदुखी यामुळेच या व्यक्ती त्रासतात.
मेष राशीच्या व्यक्तींचे सिंह रास , धनु रास आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींशी उत्तम जुळते. यांचे विचार एकमेकांशी उत्तम रित्या जुळतात. यांना शौर्य , धाडस , रुबाब इत्यादी गोष्टींची प्रचंड प्रमाणात आवड असते. मेष राशीच्या व्यक्तीचे मिथुन राशीच्या व्यक्तींशी , कर्क राशीच्या व्यक्तींशी , तूळ राशीच्या व्यक्तींशी , मकर किंवा कुंभ राशीच्या व्यक्तींशी पटत नाही.
कारण त्यांना बौद्धिक , प्रेमळ , दयाळू , सुस्त अशा गुणांची अजिबात आवड नसते. मीन आणि मेष यांचे सुद्धा उत्तम रित्या विचार जुळत असतात. वृषभ आणि मेष या दोघांचे पटत असते पण अगदी जेमतेम. असे अनेकदा अनुभव आलेले आहेत.
मित्रानो माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयक पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक आणि फॉलो करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक.