नमस्कार मित्रानो,
मेष राशीच्या व्यक्तींनी स्वभावातील कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी आवार्जून केल्या पाहिजेत या बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. या राशीच्या व्यक्तींमध्ये आक्रमक वृत्ती थोडी जास्तच आढळून येते.
थोडक्यात काय तर यांच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली तर या व्यक्ती थोड्या आक्रमक होतात. यांचं स्वतःवर नियंत्रण राहत नाही. मेष राशीच्या व्यक्तींनी आक्रमक वृत्तीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
सोबतच या व्यक्तींमध्ये जास्त नाही पण थोड्या फार प्रमाणात उद्धटपणा दिसून येतो. यावर सुद्धा या व्यक्तींनी खास करून नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. या राशीच्या व्यक्ती तापट स्वभावाच्या असतात. उतावळेपणा यांच्या अंगी ठासून भरलेला असतो.
म्हणजे कोणताही निर्णय घाई गडबडीत घेतात. निर्णय घेण्याआधी थोडा सुद्धा विचार करत नाहीत. या उतावीळ स्वभावावर सुद्धा नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कुठलाही निर्णय मेष राशीच्या व्यक्तींनी नीट शांत डोकं ठेवूनच घेतला पाहिजे अन्यथा नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जो निर्णय घेणार त्यात आपले पुढे जाऊन नुकसान तर होणार नाही ना? याची खातरजमा करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच बरोबर या राशीच्या व्यक्तींमध्ये थोडा अहंकारीपणा दिसून येतो. म्हणजे एखादी गोष्ट त्यांच्या बाबतीत चांगली घडली तर यांचा अहंकार थोडा वाढतो. या अहंकारावर पण नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
या अहंकारीपणामुळेच कुटुंबात आणि बहुतेकदा नोकरीवर यांचा वाईट परिणाम दिसून येतो. या व्यक्ती अत्यंत साहसी वृत्तीच्या असतात. पण कधी कधी हाच साहसी पणा यांच्या अंगी भोवतो. उदाहरण सांगायचं झालं तर गाडी वेगाने चालवणे. अशा बाबतीत साहस दाखवून नुकसान आपलेच होते यांचा त्यांना विसर पडतो.
त्यामुळे अशा नको त्या गोष्टीत साहस दाखवणे मेष राशीच्या व्यक्तींसाठी नुकसान दायक ठरू शकते. जिथे गरज नाही तिथे साहसी स्वभाव दाखवणे या राशीच्या व्यक्तींनी बंद केले पाहिजे. जिथे खरच गरज आहे तिथे अवश्य साहस दाखवा. अशाने तुमचे काम देखील होईल आणि समाजात मानसन्मान सुद्धा प्राप्त होईल.
या राशीच्या व्यक्तीमध्ये थोडी भांडखोर वृत्ती दिसून येते. बऱ्याचदा काही कारण नसते तरी भांडत बसतात. त्यामुळे विनाकारण शत्रू निर्माण होतात. म्हणून या भांडखोर वृत्तीवर मेष राशीच्या व्यक्तींनी नियंत्रण ठेवाव. मेष राशीच्या व्यक्ती खूपच अतिउत्साही स्वभावाच्या मानल्या जातात.
परंतु याच अतिउत्साहात हे लोक मागचा पुढचा विचार न करता चुकीचे निर्णय घेऊन बसतात. बऱ्याचदा अति उत्साहात इतरांचे सुद्धा नुकसान करून बसतात. अतिउत्साही स्वभावावर थोडा कंट्रोल ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
मेष राशीच्या व्यक्ती दुसऱ्याच अजिबात ऐकत नाहीत. म्हणजे ऐकून तर घेतात पण स्वतःच्याच मर्जी प्रमाणे करतात. मी म्हणेल ती पूर्व दिशा असं काहीस असत यांच. त्यामुळे जर आपल्या फायद्याचं काही असेल तर दुसऱ्याचं ऐकण्यात काही हरकत नाही.
मेष राशीच्या व्यक्तींमध्ये धर सोड वृत्ती जास्त प्रमाणात दिसून येते. नोकरीच्या बाबतीत म्हणा किंवा व्यवसायाच्या बाबतीत म्हणा. त्यामळे काय होत कि यांच्या जीवनात अनेक प्रॉब्लेम येतात. तर मेष राशीच्या व्यक्तींनी या धर सोड वृत्तीवर कंट्रोल ठेवला पाहिजे.
नोकरीत थोडा धीर धरावा. प्रामाणिक कष्ट कराल तर नक्कीच पगारात वाढ होईल. उतावीळपणा करून नोकरी लगेच सोडू नये. या राशीच्या लोकांनी स्पष्टवक्तेपनावर थोडा कंट्रोल ठेवावा.या स्पष्टवक्तेपणा मुळे बऱ्याचदा गैरसमज होतात, शत्रू निर्माण होतात.
तर मित्रानो अशा काही गोष्टी आहेत ज्यांवर नियंत्रण ठेवणे या राशीच्या लोकांसाठी अत्यंत आवश्यक आहे.
मित्रांनो अशाच प्रकारे रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.