नमस्कार मित्रानो
मित्रानो मेष राशी हि राशी चक्रातली पहिली राशी असून या राशीचा स्वामी मंगळ आहे. तर अग्नी तत्वाची आणि क्षत्रिय वर्णाची हे मेष राशी आहे. त्यामुळे तडफदारपणा , नेतृत्व , लढाऊपणा आणि स्वभावामध्ये असलेली उग्रता हि थोडीशी जास्त आढळते. ब्लडप्रेशर , ऍसिडिटी , रक्तांचे दोष , रक्ताभिसरण क्रिया या बद्दल तक्रारी असण्याची शक्यता या राशींच्या लोकांमध्ये सर्वात जास्त असते.
मित्रानो या ऑगस्ट महिन्यामध्ये रवी , शुक्र , बुध या ग्रहांच भ्रमण चतुर्थ , पंचम आणि षष्ठ स्थानांतून होत असल्यामुळे आर्थिक बाबतीत नोकरदार आणि व्यावसायिक मंडळींना या महिन्यातील पहिले १५ दिवस विशेष लाभकारी ठरणार आहेत. कामाच्या ठिकाणी नवीन व्यवहाराला चांगली गती प्राप्त होईल.
या संपूर्ण महिन्यात रवी आणि बुधाची साथ तुम्हाला असल्यामुळे कामे अगदी सहज मार्गी लागतील. कोर्ट कचेऱ्याची कामे सुरळीत पार पडताना तुम्हाला दिसतील. १५ तारखेनंतर रवी स्वतःच्या राशीमध्ये येत असल्यामुळे सरकारी जी कामे आहेत यांच्या हालचालीचा वेग बऱ्यापैकी वाढणार आहे.
या महिन्याच्या ११ तारखेनंतर कामात जर दुर्लक्ष केले तर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. व्यावसायिकांनी शक्यतो उधार देणे या काळात टाळावे. कितीही जवळचा व्यक्ती असुद्या उसने पैसे देऊ नका. दिले तर ते पैसे बुडीत खात्यात जमा झालेच म्हणून समजा.
नोकरदार वर्गाला शुक्राच्या भ्रमणामुळे थोडा फार त्रास जाणवू शकतो. कारण शुक्राचे भ्रमण नोकरीच्या वर्गातून होत आहे. त्यामुळे कदाचित महिन्याचा पगार रखडू शकतो. रवी ,बुध , मंगळ यांच साहाय्य असल्यामुळे जागेच्या व्यवहारांना चांगले दिवस येतांना दिसतील.
जागेच्या खरेदी विक्रीला खूप सुंदर योग येईल. तसेच व्यवहार सुद्धा फायद्याचे ठरतील. आर्थिक व्यवहार ११ तारखेच्या आतच करणे योग्य ठरेल त्यानंतर पैशांची कामे रखडू शकतात. सोन्याची गुंतवणूक १५ तारखेच्या आत केली तर फायद्याची ठरेल. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांसाठी हा महिना संपूर्ण फायदेशीर आहे.
गुरु , शनी , मंगळ ,रवी यांची साथ शुभकारक असल्यामुळे शेतकरी वर्गाला सुद्धा आर्थिक फायद्याची गणितं जुळताना दिसतील. विद्यार्थी वर्गाला सुद्धा गुरुची साथ या महिन्यात असल्यामुळे महत्वाचे निर्णय घ्यायला चांगलीच मदत मिळणार आहे.परदेशात जाऊन ज्या विद्यार्थ्यांना शिकायची ईच्छा आहे त्यांना सुद्धा हा महिना लाभ मिळवून देणारा ठरणार आहे.
विवाह इच्छुक मंडळींना शुक्र , गुरुची साथ या महिन्यात उत्तम आहे परंतु ११ तारखेनंतर शुक्राचे साहाय्य नाही म्हणून या आधी विवाहाचे निर्णय अवश्य पक्के करावेत. भावंडांच , जोडीदाराचं , मित्र परिवाराचं साहाय्य तुमच्या कामामध्ये मिळणार आहे. अतिशय सुंदर सहकार्य या मंडळींकडून मिळेल.
यांच्यासोबत आधी काही वाद विवाद , मतभेद झाले असतील तर याच महिन्यात पुन्हा नात्यात गोडवा प्रस्थापित करता येईल. प्रेम प्रकरणात ११ तारखे नंतर छोटे मोठे वाद , रुसवे फुगवे निर्माण होताना दिसतील. त्यामळे हि नाती थोडी जास्त काळजीने हाताळण्याची गरज भासेल.
आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर पोटाचे दुखणे , ऍसिडिटी , कफ यासारखे आजार डोकं वर काढताना दिसतील. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. अचानक आलेल्या या आजरपणामुळे खर्चात वाढ होऊ शकते.
बाकी ग्रहांचा त्रास कमी व्हावा यासाठी रोज तीन वेळा दुर्गा स्तोत्र , महालक्ष्मी अष्टकाचे पाठ अवश्य पठणात ठेवावेत. जमलंच तर मंगळवारी गणपती बाप्पांचे दर्शन घेता आले तर उत्तमच. ओम गं गणपतेय नमः या मंत्राचा जप करत घरातील मूर्तीवर दुधाचा अभिषेक करू शकता.या महिन्यातील शूभ तारखा म्हणजे १ ते ११ , १४ , १५ , १८ ते २९ या आहेत.
मित्रानो माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशिभविष्य विषयक पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याची प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक.