असा असतो मेष राशीच्या लोकांचा स्वभाव…

0
969

नमस्कार मित्रांनो,

मेष राशीच्या व्यक्ती साहसी, ऊर्जावान आणि आत्मविश्वासू असतात. या राशीचा स्वामी मंगळ या व्यक्तींना स्पष्टवक्ता बनवतो. ताबडतोब निर्णय घेण्याच्या वैशिष्टय़ामुळे या व्यक्ती इतरांपेक्षा वेगळ्या असल्याचे जाणवते. मेष राशीचा माणूस म्हणजे एक घाव दोन तुकडे.

प्रकृती काटक असते. ही माणसं अत्यंत चपळ असतात. अत्यंत कमी वेळात अधिक कामे करण्याकडे कल असतो. देहयष्टी मध्यम उंचीची. त्यांना केस विरळ असतात.तुमच्याकडे खूपच स्पष्टवक्तेपणा, उतावळेपणा आहे. स्वभाव हट्टी असतो. स्वतः घेतलेल्या निर्णयात सहसा बदल करीत नाही.

खेळतांना प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनासारखी करून घेतात.मूड खराब झाला तर तसेच सहन करण्यापेक्षा या व्यक्ती स्पष्ट भांडून, बोलून विषय संपवतात.या व्यक्ती धार्मिक वृत्तीच्या असतात, पण अंधविश्वासू कधीच नसतात. स्वत:चे भाग्य स्वत: घडवण्यावर विश्वास ठेवतात.

धैर्य, साहस, समजूतदारपणा या बळावर संकटांचा सामना करतात. त्यांच्याकडे नेतृत्वगुण असतो. घर, कुटुंब आणि समाज यांना दिशा देण्याचे काम करतात. तुम्ही खूपच उत्साही आहात.जिद्द, महत्वाकांक्षा तुमच्याकडेआहे.प्रयत्नावरती तुमच्या विश्वास आहे.

कोणत्याही प्रसंगामध्ये न डगमगता मार्ग काढतात. कठिणातल्या कठीण परिस्थितीमध्येही तुमची हिंमत टिकून राहते. खूपच धाडस, धैर्य, कार्यतत्परता, निर्णय तत्परता अधिक असते.

आई-वडील म्हणून या व्यक्ती आपल्या अपत्यांबद्दल अतिशय जागरूक असतात. त्यांना आपल्या मुलांबद्दलचे सगळे निर्णय स्वत:च घ्यायचे असतात. ते आपली मनमानी करतात. विद्यार्थी वर्गाचा शास्त्र, गणित विषयांकडे अधिक ओढा असतो. त्यांची आकलनशक्ती तीव्र असते या राशीच्या व्यक्ती उच्च अधिकार पदावर जाऊन पोहचतात.

आपल्या कुटुंबीयांशी फारशा मृदुभाषी नसल्याने कुटुंबीयांशी भांडणे होत राहतात. एकत्र कुटुंबात फारशी रमत नाही. वडील, भावंडे यांच्याशी फारसे पटत नाही. या व्यक्तीना घरकोंबडेपणा आवडत नाही.

स्वभावात उतावळेपणा, लहरीपणा असतो. तुम्ही अतीशय तापट आहात. चंचल वृत्ती असते. प्रवासाची आवड असते. ही माणसं स्वातंत्र्यप्रिय असतात. या माणसांचा अहंभाव खूप झटकन दुखावला जातो.लहान मुलांमध्ये चिडचिड्या स्वभावाचे प्रमाण अधिक असते.

या राशीच्या व्यक्तींचा उत्कर्ष वय 28 पासून सुरु होतो.तुम्ही प्रेमाच्या बाबतीतही तितकेच अग्रेसर आहात. एकतर्फी प्रेम करणार्यांमध्ये मेष राशीचे प्रमाण अधिक आढळते. प्रेमात, प्रणयात या राशीच्या व्यक्ती आपले वर्चस्व गाजवतात.

वैवाहिक जीवनात मेष राशीची मंडळी सहसा तडजोड करीत नाही. आपला वैवाहिक साथीदार क्षणोक्षणी आपल्यासमोर आणि आपण म्हणू तसेच वागेल अशी अपेक्षा या मंडळींची असते. पती-पत्नी म्हणून या अतिशय रोमँटिक असतात. त्यांचा रोमँटिकपणा आत्मिक कमी आणि शारीरिक जास्त असतो.

या स्वत:चे सगळे निर्णय स्वत: घेतात.मेष राशीच्या व्यक्तींनी मेष, मिथुन, सिंह, वृश्चिक, मकर व कुंभ राशींच्या व्यक्तीशी लग्न करणे टाळावे. नाहीतर घरात बर्‍याचवेळा तलवारींचा खणखणाट व ठिणग्या उडताना दिसतील.

मेष राशींच्या आक्रमक व्यक्तींनी विशेषत: कर्क, तूळ, मीन इ. सौम्य व आध्यात्मिक राशींचा जोडीदार निवडावा कारण या राशींचे पुरूष बरेचसे शांत असल्याने त्यांना मेष राशीची खमकी बायको मिळाल्यास त्यांच्या प्रपंचाची नौका भरकटत नाही कारण सुकाणू मेष जोडीदाराच्या हातात असते.

तिखट, चमचमीत पदार्थ खाण्याकडे अधिक कल असतो.सुरुवातीला त्यांचे आरोग्य चांगले असते पण जसे वय वाढते तशा आरोग्याच्या समस्या वाढतात. पोटाशी निगडित अनेक व्याधी त्यांना जडतात. हाडांचे विकार, सांधेदुखी यामुळेच या व्यक्ती त्रासतात.

भूमी आणि घर याच्याशी संबंधित क्षेत्रामध्ये त्यांना लाभ होऊ शकतो. बिल्डर किंवा बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरच्या रूपात त्यांना प्रतिष्ठा आणि धनप्राप्ती होऊ शकते. पोलिस, प्रशासन आणि राजकारणामध्ये त्यांना यश मिळू शकते. इंजिनीअरिंग आणि तांत्रिक क्षेत्रामध्ये त्यांचे करिअर चांगले आकाराला येऊ शकते.

खेळामध्येही त्यांना यश मिळू शकते. नृत्य दिग्दर्शक म्हणून नाव मिळू शकते. शेती, मार्केटिंग, कंत्राटदार या कार्यामध्येही त्यांना यश मिळू शकते.

यशप्राप्तीसाठी : मेष ही मंगळाची रास आहे. त्यामुळे मंगळवारी उपास करावा. काळ्या रंगाचा वापर करू नये.

सूर्योपासना, गुरूची उपासना, श्री गणपतीची उपासना मेष राशीला भाग्यकारक ठरतात. वृश्चिक, कर्क, सिंह, धनु, अथवा मीन, राशीवर जन्मलेल्या माणसांच्या सहायाने त्याने धंदा चालविल्यास तो यशस्वी होतो.

माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करा.

वरील माहीत हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा मराठी धिंगाणाचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here