नमस्कार मित्रानो,
मीन राशीच्या जातकांनो तुम्ही जीवनात सफल होण्यास पराभूत का होत आहात? कसे आपले नशीब आपण घडवू शकतो? असा कोणता उपाय आहे जो तुमचे यशाचे दरवाजे उघडेल? आज आम्ही तुम्हाला याच गोष्टींची माहिती देणार आहोत. हि संपूर्ण माहिती चंद्र राशीवर आधारित आहे. मित्रानो हे मीन राशीचे लोक यशस्वी होऊ इच्छितात पण दोन्ही हातानी खर्च करणे सुद्धा यांना आवडते.
आयुष्यात यांना एखादा मोठा फटका बसत नाही तोपर्यंत या राशीचे लोक पैसे बचत करण्याचा विचार सुद्धा करत नाहीत. मित्रानो आयुष्य असच जगत राहिलात तर सावरायला वेळ भेटणार नाही आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा खूप उशीर झाला असेल. मीन राशीचे लोक बहुतेकदा दोन्ही बोटींवर पाय ठेवून प्रवास करणे पसंद करतात.
या राशीचे चिन्ह सुद्धा माश्याची जोडी आहे. दोन रस्त्यांवर चालणे हे लोक पसंद करतात. बऱ्याचदा लग्न एका सोबत होते आणि मन मात्र दुसऱ्या व्यक्ती मध्ये गुंतलेले असते. दुसऱ्यांना मदत करता पण स्वतःच काय? तुम्ही आजवर प्रत्येकाची किंमत केली पण आयुष्यचा नियम आहे कि ज्या व्यक्तीला तुम्ही जास्त किंमत द्याल तीच व्यक्ती तुमची किंमत शून्य करून टाकते.
तुमच्यासोबत बऱ्याचदा असं होत कि आनंदाच्या क्षणी तुमची आठवण काढली जात नाही परंतु जेव्हा तुमची गरज भासते तेव्हा मात्र तुमची आठवण काढली जाते. किंवा जर कोणी अडचणीत आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला बोलवलं जात. याचा सोप्पा अर्थ असा होतो कि तुम्ही किंमत फक्त त्यांना गरज असते तेव्हाच केली जाते इतर वेळी तुमची किंमत शून्य असते.
तुम्हाला तुमचे स्वतःचे महत्व टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या तोंडावर तुम्ही स्तुती कोणी केली तर याचा अर्थ असा नाही कि तुम्ही खूप महान आहात. तुमच्या अनुपस्थित तुमची स्तुती कोण करत याने खूप मोठा फरक पडतो. कोणी पण यावं आणि टपली मारून जावं अशी परिस्थिती बिल्कुल होऊन देऊ नका. यात तुमचेच नुकसान आहे.
जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या सुखात जी व्यक्ती स्वतःचे दुःख विसरून जाईल त्या व्यक्ती पेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर कोणीच करू शकणार नाही. कदाचित अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात कधीच आली नाहीये. आणि जी व्यक्ती भेटली त्या व्यक्तीची तुम्ही कदर नाही केली. मित्रानो अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्हाला पैशाचा माज नाही पण तुम्ही धनाची कदर पण करत नाही.
मित्रानो तुमच्या आयुष्यात नेहमीच अडचणी येत राहतात. कारण जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याच्या जीवनात संकटे हि येतच राहतात. मित्रानो हि दुनिया त्यांचीच आठवण काढते जो सुखात आयुष्य जगतो. नेहमी परिस्थितीला दोष देऊन रडणारे लोक कोणाच्याच लक्षात राहत नाहीत. पण जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येईल तेव्हा तुम्हाला विचारणार कोणी नसेल.
मीन राशीचे लोक खूप जास्त भोळे असतात. आणि हि दुनिया भोळ्या व्यक्तींचा व्यवस्थित फायदा उचलते. जो तो आपल्या स्वार्थासाठी अशा व्यक्तींनी जवळ करतो. मित्रानो तुम्ही प्रेम करता ते 100 टक्के खरच करता पण जेव्हा एखादी गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त होते तेव्हा त्याचे दुष्परिणाम दिसायला सुरवात होते.
मीन राशीच्या व्यक्ती बुद्धिमान असतात. परंतु एखादा मोठा निर्णय घ्यायची वेळ आली कि त्यांची गडबड होते. तुम्ही बऱ्याचदा एकच गोष्ट इतक्या वेळा खोदून खोदून काढता कि समोरचा व्यक्ती तुमच्याशी फक्त कामासाठी बोलणे पसंद करतात. या व्यक्ती आकर्षक असतात पण बऱ्याच गोष्टींची त्यांना वेळेवर किंमत कळत नाही.
मित्रानो तुम्ही नेहमीच भगवान भोलेनाथाची सेवा करा. त्यांची पूजा अर्चा करा. ओम नमः शिवाय चा जप करा. सूर्याला जल अर्पण करा. हळदीचा टीका कपाळी लावा. असं केल्याने आयुष्यात येणाऱ्या अडचणी बऱ्यापैकी कमी होतील.
मित्रांनो अशाच राशिभविष्य विषयक पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.