मीन रास : सप्टेंबर महिन्यात तुमच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणार

0
140

नमस्कार मित्रानो

मित्रानो मीन हि राशीचक्रातील सर्वात शेवटची म्हणजेच बारावी राशी असून या राशीच बोध चिन्ह म्हणजे विरुद्ध दिशेला तोंड करून पोहणारे दोन मासे. मासे सौंदर्य आणि शांततेचे प्रतीक असणारे परंतु विरुद्ध दिशेला तोंड करून पोहणारे म्हणजे स्वभावातील विरोधाभासाच प्रतीक आहे. ज्याला आपण द्विधा मनस्थिती असे म्हणू शकतो.

मानवीय स्वभाव हा फार अनाकलनीय आहे. आपलेच विचार बऱ्याचदा अगदी दुसऱ्याच क्षणी आपल्यालाच पटत नाहीत. सकाळी घेतलेला निर्णय संध्याकाळी आपल्याला योग्य वाटत नाही , तर मंडळी अशा वेळेला दुसऱ्याचे विचार आपल्याला कसे पटतील ? अशा काहीशा स्वभावाची हि मीन राशीची मंडळी असतात.

शुक्र हा या राशीमध्ये उच्च राशीचे फळ देतो. म्हणजेच सौंदर्य , कला या विषयांमध्ये सुद्धा यांना अतिशय चांगला रस असतो किंबहुना करियर सुद्धा असत. या राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे. ब्राह्मण वर्णाची हि राशी असल्यामुळे उच्च शिक्षण घेण्याकडे यांचा विशेष कल असतो. स्वतः शिकायचं आणि लोकांना देखील शिकवायचं.

गुरु ग्रह हा राशीचा मालक ग्रह असल्यामुळे सामाजिक आणि धार्मिक कार्याची आवड अगदी मनापासून असते. गुरु ग्रहाची ज्ञानी राशी असल्यामुळे अंधश्रद्धेला मात्र आपल्यापासून लांब ठेवतात. जल आणि स्त्री राशी असल्यामुळे व्यवहारात अत्यंत हुशार या राशीचे लोक असतात. त्यामुळे अकाउंट , कॉमर्स सारख्या विषयांत यांना गोडी असते.

भावनिक स्वरूपाची राशी असल्यामुळे व्यवहार आणि भावना हे वेगळे ठेवले तर बऱ्यापैकी यशस्वी होताना हि मंडळी दिसतात. भावनेच्या आहारी जाऊन व्यवहारातील निर्णय घेतल्यामुळे मात्र हमखास अयशस्वी होताना दिसतात.

मित्रानो कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी तुमचे जुने मतभेद असतील, तर ते मतभेद या महिन्यात संपुष्टात येतील आणि परिवारात प्रेम वाढेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि प्रत्येकजण तुमचा आदर करेल. भावंडांसोबत तुम्ही काहीतरी नवीन उद्योग सुरू करण्याचा विचारही करू शकता, ज्यात पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

जर घरातील कोणताही सदस्य परदेशात अभ्यास करत असेल किंवा बाहेर काम करत असेल तर या महिन्यात त्याला घरी यावे लागेल आणि त्याच्या आगमनाने काही चांगली बातमी देखील भेटेल. एकूणच हा महिना तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी चांगला असण्याची शक्यता आहे.

हा महिना तुमच्या व्यवसायासाठी खूप चांगला आहे. जुने एखादे काम रखडले असेल तर ते या महिन्यात पूर्ण होईल , त्याचा तुम्हाला लाभ मिळेल. अडकलेले पैसे परत येण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत, आपल्या आजूबाजूला विशेष लक्ष ठेवा आणि कोणतीही संधी हातून जाऊ देऊ नका.

सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे कारण या महिन्यात उच्च पदाची बढती मिळू शकते. तुमची काम करण्याची पद्धत बघून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला प्रोत्साहनही मिळेल. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी कामात राजकारण करू नये , अन्यथा परिणाम वाईट होण्याची शक्यता आहे.

जर तुम्ही महाविद्यालयात शिकत असाल तर तुमच्या शिक्षणाबाबत तुमच्या मनात संशय निर्माण होऊ शकतो. तुम्ही सतत तुमच्या भविष्याबद्दल विचार कराल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी एखाद्या गोष्टीबद्दल भयभीत राहतील, ज्यामुळे त्यांचे मन अभ्यासात कमी लागेल. अशा वेळी तुमच्या वरिष्ठांचे मार्गदर्शन तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकते.

जर तुमच्या लग्नाला 10 वर्षांपेक्षा कमी कालावधी झाला असेल, तर या महिन्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून एखादी भेट मिळू शकते, ज्यामुळे मन प्रसन्न होईल. ज्यांच्या लग्नाला 10 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे, त्यांना त्यांच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि दोघेही कुठेतरी फिरायला जाण्याची योजना करू शकता.

जर तुम्ही तुमच्या जोडीदारापासून दूर असाल तर या महिन्यात भेटीचे योग जुळून येत आहेत , परंतु अशा परिस्थितीत पूर्ण काळजी घ्या. लग्नाची वाट पाहणाऱ्या लोकांना या महिन्यात निराशा पदरी पडेल.

आरोग्याच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ राहील आणि कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. जर तुम्ही आधीच कोणत्याही रोगाशी झुंज देत असाल तर या महिन्यात तुम्हाला त्यातून आराम मिळेल. तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने हा महिना खूप उच्च असण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला नेहमीपेक्षा अधिक ताजेतवाने वाटेल.

मानसिकदृष्ट्या, तुमच्या मनात नवीन कल्पना येतील आणि तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक उत्साही वाटेल. आजूबाजूला सकारात्मक वातावरण असेल जे तुमचे मन अधिक आनंदी करेल.

हा महिना तुमच्यासाठी चांगला असला तरी , विद्यार्थ्यांसाठी चिंतेची बाब आहे कारण या महिन्यात त्यांच्या अभ्यासाबद्दल आणि त्यांच्या कारकीर्दीबद्दल त्यांच्या मनात शंका निर्माण होतील. अशा परिस्थितीत, तुमचे मन शांत ठेवा आणि एखाद्या वरिष्ठाने किंवा तुम्ही स्वतः योग्य चर्चा करा आणि त्यानंतरच निर्णय घ्या.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here