नमस्कार मित्रानो,
मित्रांनो नशीब जेव्हा कलाटणी घेते तेव्हा भाग्य बदलायला वेळ लागत नाही. दुःखाचा कठीण काळ संपून सुखाचे दिवस यायला वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्रांची कृपा बरसते तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनू शकतो.
जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा दुःखाची अंधारी रात्र संपून सुखाची सकाळ यायला वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही कठीण काळ चालू असुद्या जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा परिस्थिती मध्ये बदल घडून आल्याशिवाय राहत नाही.
दिनांक 16 मार्चच्या उत्तर रात्री असाच काहीसा शुभ आणि सुदंर काळ मीन राशीच्या जीवनात येणार असून यांच्या नशिबाला कलाटणी प्राप्त व्हायला सुरवात होणार आहे. दुःख आणि यातनांचा कठीण काळ संपून सुखाचे सुंदर दिवस आपल्या जीवनात येणार आहेत.
मित्रांनो भाग्याचे कारक शुक्र देव आता राशी परिवर्तन करणार आहेत. शुक्राचे होणारे हे राशी परिवर्तन आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. शुक्र हे वृषभ आणि तुळ राशीचे स्वामी असून धन संपत्तीची देवी माता लक्ष्मीचे कारक आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र हा अतिशय शुभ ग्रह मानला जातो.
शुक्राच्या शुभ प्रभावाने मनुष्याच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येते. शुक्राच्या कृपेने कुंडलीमध्ये विवाह आणि संतान प्राप्ती योग बनतात. फाल्गुन शुक्ल पक्ष आश्विन नक्षत्र दिनांक 16 मार्चच्या उत्तररात्री 2 वाजून 50 मिनिटांनी शुक्र देव कुंभ राशीतुन मीन राशीत प्रवेश करणार आहेत.
10 एप्रिल पर्यंत ते याच राशीत राहणार आहेत. सूर्यदेव अगोदरच आपल्या राशीत विराजमान असून आता शुक्राचे आपल्या राशीत होणारे आगमन आपला भागोद्य घडून आणणार आहे. शुक्राच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आपल्या जीवनात कशाची म्हणून उणीव राहणार नाही.
मित्रांनो शुक्र हे धनसंपत्ती आणि भोग विलासितेचे कारक मानले जातात. शुक्राचा शुभ प्रभाव आपल्या जीवनात खूप मोठी प्रगती घडून आणू शकतो. उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रावर याचा अतिशय शुभ परिणाम दिसून येईल.
करियर मध्ये मनाप्रमाणे प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. या काळात समाजात मानसन्मानाची प्राप्ती होणार असून आपल्या जीवनातील नकारात्मक काळाचा अंत होणार आहे. अनेक दिवसांपासूनची पूर्ण स्वप्ने या काळात पूर्ण होणार आहेत.
शुक्र आपल्या राशीच्या प्रथम भावामध्ये प्रवेश करणार असून याचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या उद्योग व्यापार आणि आर्थिक परिस्थितीवर पडणार आहे. आपली आर्थिक स्थिती अतिशय मजबूत बनणार असून आत्मविश्वासात भरपूर वाढ होणार आहे.
लोक आपल्या शब्दाने प्रभावित होतील. आपल्याकडे आकर्षिले जातील. प्रेमी युगलांच्या जीवनात प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. आपल्या जीवनात एखाद्या खास व्यक्तीचे आगमन होऊ शकते.
कार्यक्षेत्रात अचानक धन लाभाचे योग बनत आहेत. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने हा काळ अतिशय चांगला असला तरी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कुटुंबातील लोकांचे चांगले सहकार्य आणि पाठिंबा आपल्याला लाभणार आहे.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.