नमस्कार मित्रांनो,
मध्य रेल्वेच्या वांगणी स्टेशनवर आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या लहानग्या मुलाचा जीव वाचवणाऱ्या मयुर शेळकेचे सर्वत्र कौतुक केलं जातंय.
केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल सोबतच मध्य रेल्वेचे डी आर एम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा मयुरच्या या जगावेगळ्या धाडसाचं कौतुक केलं.
शनिवारी मध्य रेल्वेच्या वांगणी स्टेशनच्या प्लॅ ट फॉ र्म वर एक अंध महिला आपल्या मुलासोबत चालत जात होती.
चालत जाणाऱ्या त्या अंध महिलेच्या सोबत असलेले लहान मुल चालत असताना अचानक प्लॅ ट फॉ र्म हून खाली ट्रॅ क वर पडले.
त्याचवेळी दुसऱ्या बाजूने त्या ट्रॅ कवर येणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेकडे पाहून प्रसंगावधान दाखवून अवघ्या 7 सेकंदात ट्रॅ क वर पडलेल्या त्या मुलाचा जी व मयुर शेळकेने वाचवला.
हा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ पहा. मयूरच्या धाडसाला मराठी धिंगाणा चा सलाम.
व्हिडीओ
अशाच अनेक महत्त्वपूर्ण आणि मनोरंजक माहिती आणि व्हिडीओ साठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.