पतीचा जीव घेतात या रंगाच्या बांगड्या… वेळीच व्हा सावध…

0
426

नमस्कार मित्रानो,

ज्योतिषशास्त्रावर कितपत विश्वास ठेवावा हा मोठा प्रश्न आहे. मात्र ज्योतिषशास्र असं मानत कि विवाहित महिलांनी काही विशिष्ट रंगाच्या बांगड्या चुकूनही आपल्या हातात परिधान करू नयेत. या रंगाच्या बांगड्या परिधान केल्याने पतीच नशीब कमकुवत बनत. भाग्य साथ सोडून निघून जात. परिणामी पती गरीब आणि दरिद्री बनू शकतो. बऱ्याच ठिकाणी हा सुद्धा उल्लेख आहे कि पतीचा जीव देखील जाऊ शकतो.

मित्रांनो हिंदू धर्म शास्त्र असं मानत कि प्रत्येक विवाहित महिलेने हातात बांगडया अवश्य घालायला हव्यात.किमान एक तरी बांगडी विवाहित स्त्रीच्या हातात असायला हवी कारण हे सौभाग्याचं लेणं असत. ज्या प्रकारे विवाहित स्त्रीला गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणं बंधनकारक आहे अगदी त्याच प्रकारे तिच्या हातात एक तरी बांगडी असायलाच हवी.

मित्रानो हातात ज्या बांगड्या घातल्या जातात, गळयामध्ये मंगळसूत्र परिधान केलं जात, माथ्यावर सिंदूर लावला जातो या सर्वांना सोळा शृंगाराच साहित्य अस म्हणतात. आणि स्त्रीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी सोबतच स्त्री ज्या घरात लक्ष्मी म्हणून वावरत असते त्या घराच्या भरभराटीच्या संबंधित असतात. ज्योतिषशास्त्रावर जर तुमचा विश्वास असेल तर दोन गोष्टी बांगड्यांच्या संबंधित सांगितल्या गेल्या आहेत.

मित्रांनो आजकाल बाजारात वेगवेगळ्या रंगांच्या बांगड्या मिळतात आणि या बांगड्या अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतात. स्त्रीच सौंदर्य खुलवण्याचं काम या बांगड्या करत असतात. मात्र मित्रांनो काही रंग असे आहेत कि जे अत्यंत अशुभ मानले जातात.या रंगांच्या बांगड्या कोणत्याही स्त्रीने अजिबात घालू नयेत. मित्रांनो जर लाल रंगांच्या बांगड्या एखाद्या स्त्रीने घातल्या असतील तर ती स्त्री अतिशय सुंदर दिसते.

लाल रंग हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असल्याने या रंगाच्या बांगड्या घालणाऱ्या स्त्रिया साक्षात माता लक्ष्मीचं रूप असतात.अशा घरामध्ये सदैव सकारात्मक वातावरण राहत. लाल रंगांच्या बांगड्या ज्या स्त्रियांच्या हातामध्ये असतात त्या स्त्रिया घराला नंदनवन बनवतात. अशा स्त्रियांच्या घरी सुख शांती आणि समाधान सोबतच पैसा, संपत्ती आणि वैभव नांदत असत.

पहिली गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे रंगांसंबंधी. सफेद रंगांच्या म्हणजेच पांढऱ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही घालू नयेत. सोबतच काळा रंग सुद्धा अशुभ मानण्यात आलेला आहे. त्यामुळे काळ्या आणि सफेद या दोन्ही रंगाच्या बांगड्या घालणे ज्योतिषशास्त्रात वर्ज मानले आहे. पांढरा रंग ज्या विधवा स्त्रिया असतात ज्यांच्या पतीचा मृत्यू झालेला असतो अशा स्त्रिया पांढरा रंग वापरतात.

मित्रानो आणि काळा रंग तासाही अशुभ मानण्यात आलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कधीही फुटलेल्या बांगड्या, कचकलेल्या बांगड्या अशा बांगड्या स्त्रियांनी घालू नयेत. असे केले तर पतीच्या आर्थिक स्थरावर मोठा प्रभाव पडतो. पतीला जो काही पैसा प्राप्त होत असतो त्यात खंड पडू शकतो. सोबतच दोन दिवस असे सांगितले आहेत कि अशा प्रकारच्या बांगड्या खरेदी करण्यासाठी अशुभ मानले जातात.

शास्त्रानुसार मंगळवारचा दिवस आणि शनिवारचा दिवस या दोन दिवस विवाहित महिलानी आपल्या पतीवर दुर्भाग्य ओढवू नये म्हणून या दोन दिवशी बांगड्या खरेदी करणे कटाक्षाने टाळावे. मित्रांनो या सर्व गोष्टी ज्योतिषशास्त्र आणि बाकी शास्त्रांत देखील वर्णित आहेत. आपण या गोष्टींशी सहमत आहात कि नाही ते कमेंट मध्ये आम्हाला अवश्य कळवा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणाचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here