लग्न झालेल्या पुरुषांनी गपचूप वाचा हि माहिती.

0
321

नमस्कार मित्रांनो

मित्रानो स्त्रियांच्या अशा काही सवयी पतीला रातोरात करोडपती पासून रोडपती बनवू शकतात. या सोबतच जेव्हा घरात या चुका होऊ लागतात तेव्हा तुम्ही गरीब होण्यापासून स्वतःला वाचवू शकत नाही.

प्रत्येक व्यक्तीची सुख समृद्धी एक अशा स्त्रीवर बहुतांशी अवलंबून असते, जी सर्व काम करेल आणि सर्वांची काळजी घेईल. परंतु अशी काही काम आहेत की जे महिलांनी केले नाही पाहिजे. कारण असे केले तर महालक्ष्मी घरात कधीच येत नाही.

प्राचिन काळापासूनच घरातील लेकी बाळींना माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. अशी मान्यता आहे कि एक स्त्री संपूर्ण घराला स्वर्ग किंवा नरक बनवू शकते.

आपल्या शास्त्रांमध्ये मुलींच्या अशा काही सवयी सांगितल्या आहेत ज्यामुळे संपूर्ण घरदार नरका समान होते. घरात दरिद्रता येते. चला तर मग जाणून घेऊया महिलांच्या काही चुका ज्यामुळे कसा करोडपती परिवार देखील भिकारी बनू शकतो.

पाय हालवणे

ज्या घरातील स्त्रिया जेवण करताना पाय हलवत राहतात त्या घराला कधीही माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभत नाही. असे घर कधीही बरबाद होऊ शकते. महालक्ष्मी रुष्ट होऊ शकते. कुटुंबात कलह होतात आणि कुटुंबप्रमुखाचा व्यवसाय अथवा नोकरी जाऊ शकते.

पायाने झाडू ढकलणे

ज्या घरातील महिला झाडूला लाथाडतात त्या घरात कधीही लक्ष्मी वास करत नाही. अशा घरात कायम आजारपण आणि नैराश्यमय ऊर्जा पसरते. असं मानलं जात कि झाडू मध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. झाडूला लाथाडून आपण तिचा अपमान करतो.

स्वयंपाक घरात खरकटी भांडी ठेवणे

जर घरातील महिला खरकटे उष्टे भांडी शेगडीवर तसेच ठेवत असेल आणि झोपत असेल तर अशा घरात लक्ष्मी फिरकत देखील नाही. हे गरिबी आणि दुःखाचे खूप मोठे कारण आहे. म्हणून रात्री उष्टे खरकटे भांडे ठेवू नयेत. त्वरित भांडी घासून स्वच्छ करा.

लाथेने दरवाजा उघडणे

लाथेने दरवाजा उघडणे अथवा लोटणे असे ज्या घरातील महिला करते तिकडे देखिल धनलक्ष्मी नाराज होते. जर तुमच्या घरात असे होत असेल तर ते त्वरित थांबवा. हे विनाशकारी ठरू शकते. कारण महालक्ष्मीचे आगमन हे दरवाजातूनच होत असते.

उंबरठ्यावर बसून जेवण करणे

जर तुमच्या घरातील महिला उंबर्‍यावर बसून जेवण करत असेल तर ते त्वरित थांबवा. यामुळे घराच्या बरबादीचे कारण वाढते. हिंदू शास्त्रानुसार याला अशुभ मानले जाते.

सायंकाळच्या वेळी झाडून घेणे

ज्या घरातील महिला सायंकाळच्या वेळी झाडून घेतात त्या घरात दरिद्रता नांदते. म्हणून ही वाईट सवय सोडून द्या. खास करून गुरुवारी असं करू नये. नाहीतर घरामध्ये विनाशकारी गरिबी येईल.

उशिरा पर्यंत झोपणे

जर कोणत्या स्त्रीला उशिरापर्यंत झोपायची सवय असेल तर ते घर आणि घरातील लोकांसाठी अशुभ ठरू शकते. अशी स्त्री आपल्या परिवारातील लोकांसाठी असफलतेचे कारण ठरते.

शिव्या देणे

घरातील स्त्रीने मोठ्याने ओरडून बोलणे अथवा शिव्या देणे अशुभ मानले जाते. अशा घरात अनेक आरोग्याच्या तक्रारी येतात. अशा घरातून महालक्ष्मी दूर जाते.

सकाळी अंगण साफ न करणे

ज्या घरातील महिला सकाळी उठल्यानंतर अंगण साफ करत नाही अशा घरात देवी लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही.

विवाहित स्त्रीने अलंकार काढणे

एक विवाहित महिलेने आपले मंगळसूत्र, बांगड्या, पैंजण, कानातले, जोडवी कधीच काढुन ठेवू नये. असं केल्याने पतीचा मृत्यू होऊ शकतो आणि माता लक्ष्मी उलट्या पायाने माघारी जाते.

तर या होत्या काही गोष्टी ज्या पुरुषांनी लक्ष देऊन आपल्या घरात होत आहेत का बघायच्या आहेत. जर असतील तर त्या त्वरित बदलाव्यात. माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहो.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here