नमस्कार मित्रांनो,
आजच्या काळात मनासारखा जोडीदार मिळण्यास अनेक समस्या येतात. बऱ्याचवेळा लग्नाचं वय निघून जात तरीच विवाह जमत नाही या गोष्टीची सर्वाधिक चिंता मुलामुलींच्या आई वडिलांना असते.
आपलं लग्न लवकरात लवकर जमाव आणि आपल्याला चांगला जोडीदार मिळावा यासाठी अत्यंत सोप्पा उपाय ज्योतिष शास्त्रात दिलेला आहे. हा तोडगा केल्यास तुम्हाला लवकरच चांगले स्थळ मिळेल. आणि अनुरूप जोडीदार मिळेल.
दर गुरुवारी पाण्यामध्ये एक चतुर्थांश चमचा हळद किंवा शक्य झाल्यास केशर टाकून आंघोळ करावी. तसेच गाईला पीठ खायला घालून त्यात थोडी हळद, गूळ आणि भिजलेली चणा डाळ खायला द्यावी.
असे केल्याने विवाहाचे योग लवकर जुळून येण्यास मदत होईल. वास्तू आणि ज्योतिषशास्त्रा नुसार विवाह इच्छुक मुलामुलींनी काळे वस्त्र परिधान करू नयेत.
या मागे कारण असे कि काळ्या रंगला शनी, राहू आणि केतू हे तीन ग्रह प्रतिनिधित्व करतात. जे विवाहात बाधा निर्माण करतात.
जर तुम्ही प्रेम विवाह करत असाल किंवा पारंपरिक पद्धतीने विवाह करत असाल तर या दोन्ही परिस्थितीत या गोष्टींकडे लक्ष देणे जरुरी आहे.
अविवाहित मुलेमुली घरापासून दूर राहून नोकरी किंवा व्यवसाय करत असतात आणि रूम शेयर करून भाड्याने राहतात.
जर तुम्ही या प्रकारे राहत असाल तर तुमच्या लग्नात येणाऱ्या अडचणींना दूर करण्यासाठी आणि मनाप्रमाणे जोडीदार मिळवण्यासाठी झोपण्याचा बेड हा दरवाजाच्या जवळ लावावा.
विवाह इच्छुक लोकांना या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे कि लग्नाची बोलणी करण्यासाठी आलेल्या लोकांना अशा प्रकारे बसवायला पाहिजे कि त्यांचे तोंड घराच्या आतल्या बाजूस असावे. ज्यांना लग्न जमावण्यास अडचण येते त्यांनी या गोष्टीकडे अवश्य लक्ष द्यावे.
विवाह इच्छुक व्यक्तींनी झोपताना आपले पाय उत्तरेकडे आणि डोके दक्षिण दिशेकडे ठेवायला हवे. मनाप्रमाणे जोडीदार आणि लवकर लग्न जमण्यासाठी तरुणांना अशा खोलीत झोपायला हवे जेथे एकापेक्षा जास्त दारे असतील.
वास्तू विज्ञानानुसार विवाह इच्छुक लोकांना आतल्या खोलीत गुलाबी , हलका पिवळा, पांढरा रंग करायला हवा. आपल्या घराच्या दक्षिण पश्चिम भागात लाल फुटांची पेंटिंग लावायला हवी.
लग्न न जमणाऱ्या मुलीवरून तिला दाखवण्याच्या आधल्या दिवशी किंवा शनिवारी सांजवेळी तुरटी ओवाळून विस्तवावर टाकावी.
असे तीन शनिवार करावेत. याने दृष्ट नजरेने जर विवाहात अडचणी येत असतील तर ते नाहीसे होतील.व विवाह चांगल्या ठिकाणी जमेल.
मंगळदोषामुळे विवाह जुळण्यास अडथळा येत असल्यास मंगल चंडिका स्तोत्र नित्य पठण करावे. उमा महेश्वर स्तोत्र, पार्वती स्तुती अविवाहित मुलींनी जरूर करावी. अविवाहित मुलामुलींनी त्रिपुरारी पौर्णिमेला श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे.
विवाह उत्सुक मुलींनी शुक्रवारी देवीला वेणी किंवा गजरा अर्पण करावा. असे पाच शुक्रवार न चुकता करावेत. मित्रांनो हे काही उपाय जे आम्ही सांगितले यातील जे शक्य होतील तेवढे उपाय तुम्ही नक्की करा.
अशाच माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
मराठी धिंगाणा कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.