नमस्कार मित्रांनो,
जर तुम्हाला कोणत्याही कामात हवे तितके यश मिळत नसेल किंवा तुमच्या घरात जर सतत एकमेकांचे वाद विवाद होत असतील तर याचा परिणाम तुमच्या घरातील वास्तूवर होत असतो. त्यामुळे हे वास्तूदोष तुमच्या घरात निर्माण होतात. पण हिंदू धर्मातील वास्तूशास्त्रामध्ये या समस्येवर काही उपाय सांगितले आहेत.
मित्रांनो प्रामुख्याने या समस्या कदाचित तुमच्या घरातील वास्तूदोषामुळे किंवा तुमच्या कुंडली दोषामुळे, ग्रह दोष यामुळे निर्माण होऊ शकतात. जर हा उपाय तुम्ही योग्य रीतीने केला तर या सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल.
आपण रविवारी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या झाडाच्या पानांचे तोरण बांधायचे आहे. हा अतिशय साधा सोपा उपाय करायचा आहे. यामुळे घराची शोभा तर वाढणार आहे तसेच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होईल.
त्याचबरोबर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. पैसा घरामध्ये टिकून राहण्यात मदत होईल, कारण आंब्याच्या झाडाची पानं अत्यंत पवित्र मानली जातात. अनेक सण समारंभाच्या वेळी आपण या पानांचा उपयोग करत असतो.
मित्रांनो हे तोरण प्रत्येक रविवारी बदलायचे आहे. कारण आंब्याची पाने ठराविक कालावधी नंतर सुकतात आणि त्याचा परिणाम उलट होण्याची शक्यता असते. आपण सोमवार पासून ते शनिवारपर्यंत नित्यनियमाने सायंकाळी आपल्या घराच्या अंगणातील माता तुळशीची पुजा करून तिचे दर्शन घ्यायचे आहे. तुळशी मातेच्या पुढे गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे कारण गोमाते मध्ये 33 कोटी देवी-देवताचा वास असतो.
असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर माता तुळशीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. माता लक्ष्मीचा किंवा भगवान विष्णू यांचा कोणताही एक मंत्र सतत जप करायचा आहे. माता तुळस ही माता लक्ष्मीचे एक प्रतिरूप मानली जाते. तसेच रविवारी हा उपाय करायचा नाहीये. फक्त सोमवार ते शनिवारपर्यंत दररोज नित्य नियमाने हा उपाय करा.
मित्रांनो तुमच्या घराच्या सभोवताली फुलांची भरपूर झाडे लावा, असं केल्याने मोठ्या प्रमाणात सकारात्मक उर्जेचा प्रवाह घरामध्ये निर्माण होतो, पण यामध्ये काट्याची झाडे लावू नये त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. फक्त गुलाबाचे झाड व कोरफड यासाठी अपवाद आहेत.
आपण लहान मुलांना नेहमी आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण या लहान मुलांना देवाचे रूप मानले जाते, असे केल्यास एक प्रकारे तुम्हाला लहान मुलांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यामुळे तुम्हाला सुख आणि समाधान आपोआप मिळत राहील.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.